पक्षातील नाराजांना खूश करण्यासाठी भाजपची मोठी खेळी

February 17, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष यांच्यासह मंगळवारी नव्या आठ सदस्यांची नियुक्ती स्थायी समितीवर करण्यात आली. कार्यकाल पूर्ण होऊनही रासने यांची पुनर्नियुक्ती त्यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकण्यासाठी झाल्याची चर्चा महापालिकेत आहे. सत्ताधारी भाजपने महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाराजांना खूश करण्यासाठी स्थायी समितीसह विषय समित्यांवर नियुक्ती करण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येत आहे. वाचा: भाजपच्या दहापैकी सहा सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने रिक्त झालेल्या जागांवर रासने, मनीषा कदम, राजाभाऊ लायगुडे, महेश वाबळे, अर्चना पाटील आणि राहुल भंडारे यांची नियुक्ती करण्यात आली. रासने वगळता उर्वरित पाचही नगरसेवक मूळचे भाजपचे नाहीत. भंडारे यांनी २०१२मध्ये भाजपकडून महापालिका निवडणूक लढवली होती. तत्पूर्वीची निवडणूक ते अपक्ष म्हणून लढले होते. उर्वरित चौघांनीही गेल्या निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मूळ भाजपच्या नसलेल्या नगरसेवकांना पदांचे वाटप करताना अन्याय होत असल्याची पक्षात भावना होती. ती दूर करण्यासाठी स्थायी समितीसह विषय समित्यांवर नाराजांची वर्णी लावण्यात येत आहे. रासने इतिहास रचणार? स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता आहे. कार्यकाल पूर्ण होऊनही त्यांना स्थायी समितीच्या सदस्यपदी नियुक्त केले आहे. पक्षातील ज्येष्ठांच्या मते रासने यांची सदस्यपदी झालेली नियुक्ती त्यांना पुन्हा अध्यक्षपदावर बसविण्यासाठीच आहे. भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे यादेखील अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. पुढील महिन्यात अध्यक्षपदाची निवड होणार आहे. रासने यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली तर, सलग दुसऱ्यांचा अध्यक्षपदाचा मान मिळविणारे महापालिकेच्या इतिहासातील ते पहिलेच सदस्य ठरतील. दोन स्वतंत्र अर्थसंकल्प मांडून त्यांची अंमलबजावणी करण्याचा मानही त्यांना मिळणार आहे. यापूर्वी अनेक नगरसेवकांनी दोन अर्थसंकल्प मांडले असले तरी, अंमलबजावणी करण्याचा मान फारसा मिळालेला नाही. एकाच घरात सदस्यत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा कार्यकाल पूर्ण होत असल्याने त्यांच्या जागी बंडू उर्फ सुनील जयवंत गायकवाड आणि प्रदीप गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गायकवाड यांचे पुतणे आणि भाजपचे नगरसेवक उमेश गायकवाड दोन वर्षे स्थायी समितीवर सदस्य होते. त्यानंतर आता त्यांचे काका बंडू गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थायी समितीवर नियुक्त झाले आहेत. एकाच घरात तीन वर्षे स्थायी समितीचे सदस्यपद दोन पक्षांतून आले आहे. काकडे गटाला प्राधान्य स्थायी समितीवर नवीन सदस्यांची नियुक्ती करताना 'काकडे गटा'ला प्राधान्य देण्यात आल्याने माजी खासदार संजय काकडे यांनी समाधान व्यक्त केले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काकडे गटातील तीन नगरसेवकांची स्थायी समितीवर नियुक्ती झाल्याचा दावा करण्यात आला आहे. काकडे गटाने केलेल्या दाव्यानुसार नगरसेवक राहुल भंडारे, राजाभाऊ लायगुडे, अर्चना पाटील या काकडे गटातील नगरसेवकांना स्थायी समितीवर संधी मिळाली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: