लोकल ट्रेन सर्वांसाठी खुली झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोठी बातमी

February 02, 2021 0 Comments

मुंबई: करोना लॉकडाऊननंतर सर्वसामान्यांसाठी तब्बल १० महिने बंद असलेली मुंबई उपनगरीय लोकल सेवा कालपासून सर्वांसाठी खुली झाली. मात्र, ते करताना करताना वेळेची मर्यादा घालण्यात आली. त्यामुळं चाकरमान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून सरकारच्या निर्णयावर मुंबईकरांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सर्वसामान्यांची या नाराजीची सरकारनं गंभीर दखल घेतल्याचं आरोग्यमंत्री यांनी सांगितलं आहे. ( on Timing) वाचा: करोनाच्या संसर्गाची तीव्रता कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल खुली करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय घेताना तीन टप्प्यांत प्रवासाचे निर्बंध घातले आहेत. त्यानुसार, पहाटेच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ ते सायंकाळी ४ व रात्री ९ वाजल्यानंतर या वेळेत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं आहे. मात्र, त्याचा उलटा परिणाम दिसून येत आहे. वेळेच्या मर्यादा घालूनही गर्दी कायम आहे. तसंच, सुमारे २५ लाख चाकरमान्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचणं अजूनही अशक्य असल्याचं स्पष्ट झालं आहे. वाचा: या सगळ्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आज महत्त्वाची माहिती दिली. मुंबईकरांच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार लोकलच्या वेळेत लवकरच बदल करण्यात येतील, असं टोपे यांनी सांगितलं. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. 'लोकल सेवा ही सर्वांसाठी महत्त्वाची आहे. मुंबईकरांची सोय लक्षात घेऊन वेळेच्या बाबतीत काही करता येत असेल तर ते नक्की केलं जाईल. त्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा केला जाईल. शेवटी सरकारसाठी जनतेचं हित महत्त्वाचं आहे. त्यामुळं राज्य सरकार लवकरच या संदर्भात निर्णय घेईल, असं ते म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: