रायगडवरील तिकीट घराचा शिवभक्तांनी केला कडेलोड, 'हे' आहे कारण

February 02, 2021 0 Comments

रायगडः किल्ले रायगडावर पुरातत्व विभागानं बसवलेली तिकीट खिडकी शिवभक्तांनी हटवली आहे. कराच्या नावाखाली रायगडावर पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांकडून जबरदस्ती पैशांची लूट केली जात असल्याचा आरोप शिवभक्तांनी केला आहे. आणि म्हणूनच शिवप्रेमींनी रायगडावरील तिकीट घराचाच कडेलोड केला आहे. रायगडाजवळील चित्त दरवाजाजवळ पुरातत्व विभागानं हे तिकीट घर उभारलं होतं. रायगडावर येणाऱ्या पर्यटकांकडून २५ रुपये तिकीटाची अकारणी करण्यात येत होती. मात्र, कर भरुनही गडावर कोणत्याही सुविधा पुरातत्व खात्याकडून उपलब्ध नव्हत्या. त्यामुळंच शिवभक्तांनी आक्रमक भूमिका घेत तिकीट घर हटवले आहे. यावेळी महाडचे आमदार भरत गोगावलेही उपस्थित होते. वाचाः दरम्यान, लॉकडाऊननंतर सध्या रायगडावर संवर्धनाची कामे सुरु झाली आहेत. रायगडावर येणाऱ्या पर्यटकांकडून शुल्क वसूल करण्याकरिता उघडण्यात आलेली तिकीट खिडकी रायगडाच्या सुशोभीकरणाला बाधा आणणारी आहे. तसंच, ती योग्य प्रकारची नसल्याची तक्रार शिवप्रेमींनी खासदार संभाजीराजे यांच्याकडे केली होती. या तक्रारीनंतर संभाजीराजेंनी पुरातत्व विभागाला पत्र लिहलं असून ती खिडकी तात्काळ काढावी अशी मागणी केली होती. मात्र, त्यापूर्वीच शिवभक्तांनी ती खिडकी हटवली आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: