'शरद पवार अनावधानाने बोलले असतील, पण तो अहिल्यादेवींचा अपमानच'

February 15, 2021 0 Comments

अहमदनगर: 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म आपल्या नातवाच्या () मतदारसंघात झाला आहे, असं बोलून नातवाचा मतदारसंघ अहिल्यादेवींपेक्षा श्रेष्ठ आहे, असं यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केलं आहे. त्यांनी असं बोलणं हा अहिल्यादेवी यांचा अपमान आहे. शरद पवार यांची जीभ घसरलीय असं मी म्हणेन,' अशी टीका भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. यांनी केली. वाचा: जेजुरी येथे पुण्यश्लोक यांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या भाषणाचा काही अंश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामधील वाक्य पकडत आता प्रा. शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. वाचा: शिंदे म्हणाले की, 'जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पवार यांनी नातवाच्या प्रेमापोटी एक वक्तव्य केले. अहिल्‍यादेवींचा जन्म रोहित पवार यांच्या मतदारसंघात झाला आहे, असं सांगून, नातवाचा मतदारसंघ श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून झाला आहे. शरद पवार हे राजकारणात, लोकशाहीत अर्धशतक पूर्ण करणारे नेते आहेत. त्यांच्या तोंडातून जे वाक्य गेले, ते अनावधानाने गेले असेल किंवा त्यांची जीभ घसरली असेल, असे मला वाटते. परंतु अहिल्यादेवींचा असा नामोल्लेख करणे ही गंभीर चूक असून हा अवमान आहे,' असं शिंदे यांनी म्हटलं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: