डी. एस. कुलकर्णी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; केली 'ही' मागणी
म. टा. प्रतिनिधी, बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी () यांच्यावर दाखल असलेल्या सर्व दाव्यांची सुनावणी एकाच कोर्टात व्हावी, यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून दाखल असलेल्या गुन्ह्यात डीएसके सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. डीएसके यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या ४५०च्या पुढे आहे. त्यामुळे त्यांना एका पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात जामीन मिळाला, तरी दुसऱ्या पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक होऊ शकते; तसेच दाखल असलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यात त्यांना कोर्टात हजर व्हावे लागेल. त्यामुळेच डीएसके यांचे वकील अॅड. प्रतीक राजोपाध्ये आणि अॅड. आशिष पाटणकर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. वाचा: डीएसके यांच्यावर दाखल असलेल्या सर्व खटल्यांची सुनावणी मुंबर्इ किंवा पुण्यातील विशेष न्यायालयात घेण्यात यावी. याचिकेवर निकाल होत नाही, तोपर्यंत त्यांची जामिनावर सुटका करावी, अशी मागणी करणारी याचिका केली आहे. डीएसके, त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आणि त्यांच्या विविध कंपन्यांवर ठेवीदारांची फसवणूक व इतर विविध कलमांनुसार देशात सुमारे ४५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत; तसेच त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, अंमलबजावणी संचलनालय (ईडी), सिरीअस फ्रॉड इनव्हेस्टिगेटिंग एजन्सी अशा तपास यंत्रणा करीत आहेत. 'डीएसकें'ना जामीन देण्याची मागणी 'रेरा', 'व्हॅट', 'चेन बाउन्स' असे वगवेगळे गुन्हे दाखल आहेत. या सर्व प्रकरणांची स्वतंत्र सुनावणी झाल्यास प्रत्येक पोलिस ठाणे व कोर्टात हजर होणे अवघड आहे. गुन्ह्याची व्याप्तीदेखील मोठी आहे. त्यामुळे एकाच कोर्टात सुनावणी झाल्यास कोर्टाचा वेळ वाचेल. या याचिकेचा निकाल होत नाही, तोपर्यंत डीएसकेंचे वय आणि आजारपण यांचा विचार करता त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली असल्याचे अॅड. आशिष पाटणकर यांनी सांगितले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: