ahmednagar crime : भावाच्या मदतीने पतीचा खून, पत्नीचा बनाव 'असा' झाला उघड

February 22, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, : सतत होणाऱ्या घरगुती वादातून भावाच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या महिलेने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. भांडणावेळी पाय घसरून पडल्याने पतीचा मृत्यू झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मात्र, मृताला झालेली जखम आणि एकूण परिस्थिती पाहून पोलिसांना संशय आला. शेवटी सत्य बाहेर आले आणि पोलिसांनी तिला आणि तिच्या भावाला अटक केली. नगर तालुक्यातील वाळूंज शिवरात ही घटना घडली. तेथे संतोष दत्तात्रय मोरे (वय ४२) याचा खून झाला. नगर तालुका पोलिसांनी संतोष याची पत्नी प्रियंका आणि तिचा भाऊ रामेश्वर विठ्ठल दशवंत (रा. ताहाराबाद, ता. राहुरी) यांना अटक केली आहे. या घटनेची माहिती अशी, संतोष आणि प्रियंका यांच्यात भांडणे होत होती. अनेकदा तिचा भाऊ रामेश्वर येऊन मध्यस्थी करीत असे. रविवारीही त्यांच्यात भांडण झाले. त्यावेळी प्रियंकाने भावाला फोन करून बोलावून घेतले. त्या दिवशी रात्री त्यांचे पुन्हा भांडण झाले. संतोष ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. त्यामुळे रामेश्वर यालाही राग आला. त्याने जवळची कुऱ्हाड उचलून संतोषवर वार केले. त्यामध्ये संतोषचा मृत्यू झाला. यामुळे घाबरलेल्या रामेश्वरने तेथून पोबारा केला आणि थेट आपल्या गावाला निघून गेला. संतोषचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप पथकासह घटनास्थळी पोहोचले. सानप यांनी प्रियंकाकडे विचारणा केली असता, रात्री भडणावेळी पाय घसरून पडल्याने संतोष याचा मृत्यू झाल्याचे तिने सांगितले. मात्र, घटनाक्रमातील विसंगती आणि संतोषच्या डोक्यावरील जखमा यामुळे ती खोटे बोलत असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी तिची कसून चौकशी सुरू केली. तेव्हा तिने घडलेला खरा प्रकार सांगितला. दरम्यान, संतोष याचा खून करून रामेश्वर रात्रीच आपल्या गावाला निघून गेला होता. पोलिसांनी तेथे जाऊन त्याला अटक केली.


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: