'घरकाम करणाऱ्या महिलांना लोकल प्रवासाची मुभा द्या'

January 19, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, मुंबई 'माझे कुटुंब माझीच जबाबदारी' आहे. त्यांचा सांभाळ करण्यासाठी, परिवाराचा आर्थिक गाडा सुरळीत चालू राहावा, यासाठी लोकलमुभा मिळावी, असे आर्जव , बाजारपेठांमध्ये राबणारा करीत आहे. आधीच तुटपुंजे उत्पन्न, त्यात महागडा रस्ते प्रवास शक्य नसल्याने हातावर पोट असलेल्यांसमोर पुन्हा आहे. मुंबईतील कपडाबाजार, भांडी बाजार, मोबाइल मार्केट ही सर्व क्षेत्रे सुरू झाली आहेत. या बाजारपेठांमध्ये राबणारा श्रमिक ठाणे, कल्याण भागातून येतो. 'काम तर दाम' हाच नियम असल्याने लोकलअभावी त्यांची रोजीरोटीही बुडत आहे. प्रवास खर्च टाळण्यासाठी बाजारपेठांजवळच एखादी खोली भाड्याने घेऊन राहण्याची नामुष्की ओढवल्याचे क्रॉफर्ड मार्केटमध्ये काम करणारे आणि दिवा येथे राहणारे शांताराम जाधव यांनी सांगितले. मुंबई-ठाण्यातील मध्यम आणि उच्च मध्यवर्गीय, सधन कुटुंबीयांमध्ये घरकाम करणाऱ्या महिलाही कल्याणसारख्या लांबच्या भागातून लोकलने रोज ये-जा करतात. अनेकदा काही कुटुंबांकडून त्यांना महिन्याच्या पासाचे पैसे दिले जातात. लोकलमुभा नसल्याने काहींवर धुणी-भांडीची कामे सोडून घरीच बसण्याची वेळ आली आहे. मासेविक्रेते, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, उल्हासनगरमधून कच्चा माल पुरवणारे मजूर हा समाजातील मुख्य घटक आहे. आधी सुविधांपासून वंचित असलेला हा घटक आज प्रवासहक्कापासूनही लांब आहे. लोकलमधील मालडब्यातून प्रवास करून दोनवेळच्या भाकरीची सोय लावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांनाही सध्या प्रवासमुभा नाही. लोकलच्या मालडब्याइतकी स्वस्त आणि वेगवान सेवा देण्यास पर्यायी व्यवस्था सक्षम नसल्याने हा वर्ग मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाला आहे. लॉकडाउनमधून उभारी घेण्याचा प्रयत्न करत असताना सरकारने लागू केलेली लोकलबंदी नेमकी केव्हा दूर होणार, याकडे तमाम श्रमिक, रोजंदार आणि कष्टकरी वर्गाचे डोळे लागलेले आहेत. तुमच्याही व्यथा मांडा लोकलबंदीमुळे केवळ कष्टकरीच नव्हे, तर मध्यमवर्गीय, व्यावसायिक, व्यापारी, नोकरदार यांचेही हाल सुरू आहेत. खरेदीसाठी मुंबईला येणारा ते आजारी कुटुंब सदस्याला मुंबईतील रुग्णालयात न्यावा लागणाराही तितकाच हवालदिल आहे. तुमच्या अशाच व्यथा 'महाराष्ट्र टाइम्स'कडे matapratisad@gmail.com या ईमेलवर मांडा.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: