'मुख्यमंत्रिपदाचं सोडा, भविष्यात राष्ट्रवादी हा पक्ष तरी राहील का?'
सांगली: जलसंपदामंत्री यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झालेली चर्चा थांबायचे नावच घेत नाही. या मुद्द्यावर बोलताना भाजपचे विधान परिषदेचे आमदार यांनी जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसवरही तोफ डागली आहे. 'जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदाचं सोडाच, भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राहील का हीच शंका आहे,' असा घणाघात पडळकर यांनी केला आहे. ( Taunts ) वाचा: पडळकर हे बेधडक मतं मांडण्यासाठी ओळखले जातात. जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेबाबत बोलताना त्यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. इथं ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते. ते म्हणाले, 'जयंत पाटील हे अनावधानानं राजकारणात आलेलं पात्र आहे. राजाराम बापूंच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर त्यांना राजकारणात संधी मिळालीय. अनुकंपा तत्वावर भरती करताना गुणवत्ता तपासली जात नाही. पाटील यांची गुणवत्ता नसताना लोकांनी त्यांना भरभरून दिलंय. पण ते स्वत:च्या जिल्ह्यातही काही करू शकले नाहीत.' वाचा: 'राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल अशी परिस्थिती निर्माण होईल असं वाटत नाही. मुळात हा पक्षच भविष्यात राहील की नाही याची मला शंका आहे,' असा टोला पडळकर यांनी हाणला. 'जयंत पाटील हे फार बुद्धिमान आहेत असा त्यांचा व त्यांच्या पक्षाचा समज आहे. मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना 'युनो'मध्ये पाठवण्याचा विचार करायला हवा,' असं पडळकर म्हणाले. वाचा: 'मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न बघायला हरकत नाही. मात्र, १९९० पासून जयंत पाटील राजकारणात करताहेत. एवढ्या वर्षात केलेलं एक मोठं काम किंवा प्रकल्प ते सांगू शकत नाहीत. जिल्ह्यासाठी येईल ते सगळं मतदारसंघात न्यायचं एवढंच ते काम करतात. मग राज्याची अवस्था काय होईल याचा विचार करा,' असंही पडळकर यांनी सांगितलं.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: