Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्वाचे तेजस्वी रुप होते: उद्धव ठाकरे

January 23, 2021 0 Comments

मुंबई: () आणि भगवा यांनाच जीवन मानणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय () एक महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्वाचे तेजस्वी रुप होते, अशा शब्दात मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्याकडून त्यांनी पुरोगामित्व आणि सामान्य माणसाच्या व्यथांना आवाज देण्याची शिकवण दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो किंवा सीमाप्रश्नासारख्या आंदोलनांमध्ये बाळासाहेब ठाकरे नेतत्वाची परिसीमा गाठली. केवळ राज्याच्याच नाही, तर देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात चैतन्य फुलवणारे बाळासाहेब हे लेखक, पत्रकार, व्यंगचित्रकार, परखड वक्ते आणि मनस्वी कलाकार असे बहुआयामी होते, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दांत समावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या, हिंदुत्व आणि मराठी माणसाचा बुलंद आवाज असलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन केले आहे. क्लिक करा आणि वाचा- बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे आज होणार अनावरण मुंबईतील कुलाबा येथे उभारण्यात आलेला बाळासाहेब ठाकरे यांचा पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. कुलाबा परिसराकील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात हा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा ९ फूट उंच असून तो १२०० किलो ब्राँझ धातूपासून तयार करण्यात आला आहे. प्रबोधन प्रकाशनाने हा पुतळा उभारला आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: