राज्यात करोना लढ्याला यश; रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर

January 20, 2021 0 Comments

मुंबईः राज्यात सलग दुसऱ्या दिवशी करोना बाधित बरे होण्याचे प्रमाण मोठ्या संख्येनं वाढले असून, आज राज्यात ४ हजार ५८९ करोना बाधित बरे होऊन परतले आहेत. राज्यात आजपर्यंत १८ लाख ९९ हजार ४२८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील करोना संसर्ग कमी होत चालला असून त्यात लसीकरण मोहिमेची साथ लाभत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. राज्यातील गेल्या काही महिन्यांपासून करोना संसर्गानं थैमान घातलं होतं. राज्यात करोना संसर्गाला वेसण घालण्यासाठी राज्याचे आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आज अखेर हळूहळू त्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. आज राज्याचा रिकव्हरी रेट ९५.०७% इतका झाला आहे. राज्यात आज ३ हजार ०१५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या १९ लाख ९७ हजार ९९२ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत ५९ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात करोनामुळं ५० हजार ५८२ इतकी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या राज्यात जस जसा रिकव्हरी रेट वाढतोय तसाच सक्रिय रुग्णांची संख्या घटताना दिसतेय. राज्यात फक्त ४६ हजार ७६९ अॅक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. तर, मुंबई शहरात सध्या ६ हजार ६५६ इतके अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत असून ठाण्यात ८ हजार ६८८ व पुण्यात सर्वाधिक १३ हजार ८०७ रुग्ण उपचार घेत आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: