मुंबईत दिवसाढवळ्या थरार; ४ जण अचानक फ्लॅटमध्ये घुसले अन् बेडरूममध्ये...

January 22, 2021 0 Comments

मुंबई: मुंबईतील अंधेरीत दिवसाढवळ्या थरकाप उडवणारी घटना घडली. चार जणांनी घरात घुसून दाम्पत्याला सेलो टेपने बांधले आणि पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवून घरातील दागिने आणि रोकड असा १७ लाख रुपयांचा ऐवज लुटला. रविवारी ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी गुरुवारी माहिती दिली. एका आरोपीला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. इब्राहिम चौधरी (वय ५०) हे पत्नी अंजुम (वय ४५) हिच्यासोबत पूर्वेकडील रुस्तमजी एसआरए सोसायटीत राहतात. त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. रविवारी दुपारी साधारण साडेबाराच्या सुमारास ३० ते ३५ वयाच्या एका व्यक्तीने दरवाजा ठोठावला. त्यानंतर दरवाजा उघडला. फ्लॅट भाड्याने हवा आहे असे त्या व्यक्तीने सांगितले. सोसायटीतील एका व्यक्तीचा त्याने संदर्भ दिला. त्यानंतर त्याने पाणी मागितले. अचानक तो घरात घुसला. त्याच्यासह इतर तीन जणही घरात घुसले. त्यांनी चौघांनी मास्क घातले होते. त्याने पिस्तुल काढले. तर दुसऱ्याने चाकू बाहेर काढला. त्यांनी बेडरूममध्ये दोघांना बांधले. त्यांनी दहा लाखांची मागणी केली, अशी माहिती त्यांनी दिली. चौधरींनी सांगितले की, माझ्याकडे इतके पैसे नाहीत, असे त्यांना सांगितले. त्यांनी घरात झडती घेण्यास सुरुवात केली. त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी मला मारहाण केली. त्यांनी पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवला. त्यांनी घरातील किंमती वस्तू, दागिने आणि रोकड असा एकूण १७ लाखांचा ऐवज लुटला, अशीही माहिती त्यांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, आम्ही चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोसायटीत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. आम्ही चोरट्यांचा शोध घेत आहोत. पालघरमधील हत्या प्रकरणातील आरोपी नुकताच तुरुंगातून बाहेर आला आहे. तो या लुटीमागे असल्याचा संशय आहे. चौधरी राहत असलेल्या मजल्यावरच तो राहत होता. त्याला संशयावरून ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: