शिर्डी: बगाटे व ग्रामस्थ बैठकीत वाद - 3 नंबर गेट प्रकरण
आज दि.शुक्रवार 22/1/2021 रोजी शिरडी ग्रामस्थाचे शिष्टमंडळाने खा.सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कान्हुराज बगाटे याची भेट घेऊन गेट नं तीन व चार सुरु करण्यात यावी अशी आग्रही मागणी केली. तसेच दर्शन साठी येणाऱ्या साईभक्तचे लहान मुले व जेष्ठ नागरिक यांना बसण्यासाठी व्यवस्था व अल्पोपहार व ग्रामस्थची सुलभ दर्शन व्यवस्था, संस्थान कर्मचारी तिलक बागवे याची अन्याय कारक निलंबन मागे घ्यावे या विषयी भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत अनेक विषयांवर कार्यकारी अधिकारी व ग्रामस्थ मध्ये मतभेद झाले.
कार्यकारी अधिकारी यांनी गेट खुले करण्या बाबत नकारात्मक चर्चा केली, तसेच ग्रामस्थ च्या दर्शन ना बाबतीत नियमावली तयार करून शासना समोर माडणार असल्याचे सागितले. त्याला गावकऱ्यांनी कडाडून विरोध केला. गावकऱ्यांनी या बैठकीत कार्यकारी अधिकारी यांना चुकीचे सल्ला दिला जात असल्याचे म्हटले.
बैठक की नंतर खा सदाशिव लोखंडे, बगाटे व ग्रामस्थ यांनी गेट नं 3 ची व दर्शन रागेची पाहणी केली. तरी बगाटे यांना येत्या सोमवार पर्यंत निर्णय घेण्याचे आवाहन ग्रामस्थानी केले आहे.
या बैठकीला उप कार्यकारी अधिकारी ठाकरे, कैलास बापु कोते, कमलाकर कोते, अभय शेळके, सुधाकर शिंदे, रमेश गोंदकर, निलेश कोते, नितिन कोते, दिगंबर नाना कोते, भानुदास गोंदकर, सदिप पारख, संजय शिंदे, राहुल गोंदकर, सचिन कोते, विजय जगताप, रविंद्र गोंदकर, धंनजय गाडेकर,निलेश गंगवाल,सदिप लुटे,योगेश ओस्तवाल,मनोज लोढा आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments: