ओबीसी मुख्यमंत्री? पंकजा मुंडे यांनी दिलं 'हे' उत्तर

January 25, 2021 0 Comments

औरंगाबाद: ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी रविवारी जालना येथे काढण्यात आलेल्या मोर्चाच्या निमित्तानं '' या नव्याच चर्चेला तोंड फुटलं आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ( on ) वाचा: मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या तापला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे, अशी एक मागणी पुढं आली आहे. त्यामुळं ओबीसी नेते सतर्क झाले आहेत. जालन्यात काल निघालेल्या मोर्चातही या मुद्द्यावरून सरकारला इशारा देण्यात आला. राज्यातील अनेक ओबीसी नेते या मोर्चात सहभागी झाले होते. पंकजा मुंडे मात्र मोर्चाला अनुपस्थित होत्या. त्याबद्दल आज त्यांना विचारलं असता, 'कार्यक्रमात असणं हेच महत्त्वाचं नाही. त्या चळवळीचा भाग आम्ही अनेक वर्षे आहोत,' असं पंकजा म्हणाल्या. वाचा: जालन्यातील ओबीसी मोर्चात 'ओबीसी मुख्यमंत्री व्हावा' असे बॅनर झळकवण्यात आले होते. तशा घोषणाही दिल्या जात होत्या. याबाबत विचारलं असता पंकजा यांनी सावध प्रतिक्रिया दिली. 'मला यापासून थोडं मुक्त ठेवा. ही चळवळ कुठल्याही पदावर नसताना मला पुढं न्यायची आहे. माझं ते महत्त्वाचं ध्ये आहे. मुंडे साहेबांचं ते एक अपूर्ण ध्येय आहे, ते मला पूर्ण करायचं आहे,' असं पंकजा यांनी सांगितलं. ओबीसी जनगणना व्हावी! 'ओबीसी जनगणना व्हावी ही आमची जुनी मागणी आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांनी ही भूमिका वेळोवेळी मांडली आहे. खासदार प्रीतम मुंडे यांनीही याबाबत संसदेत आवाज उठवला आहे. आता नव्यानं जनगणना होणार आहे. त्यावेळी त्याबाबत सकारात्मक पावलं उचलली गेली पाहिजेत. जातीनिहाय जनगणना झाल्यास सर्व गोष्टी रडारवर येतील. त्यामुळं संबंधित समूहांना न्याय देण्यास मदत होईल,' असंही त्यांनी सांगितलं. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: