मुंबईत भाजप-मनसे युती?; 'कृष्णकुंज'वर प्रथमच खलबतं

January 23, 2021 0 Comments

मुंबईः मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं आत्तापासूनच तयारी केली आहे. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप मनसेसोबत युती करणार असल्याच्या चर्चां जोर धरु लागल्या आहेत. या चर्चा असतानाच भाजपचे आमदार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना- भाजपा युती तुटल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस- राष्ट्रवादीला सोबत घेऊन राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर भाजपनं मुंबई महापालिका निवडणुक जिंकण्याचा निर्धार केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपनं हालचाली सुरु केल्या असून त्यानिमित्तानंच प्रसाद लाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतली असल्याची चर्चा आहे. प्रसाद लाड हे जवळपास अर्धा तास राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर होते. यावेळी कृष्णकुंजवरुन बाहेर पडल्यानंतर मुंबई महानगरपालिकेत भाजपचाच महापौर बसेल आणि योग्य वेळी उत्तर दिलं जाईलं, असं सूचक वक्तव्य केलं आहे. 'भाजप मुंबई महानगरपालिका निवडणूक ताकदीनं लढणार हे निश्चित आहे. योग्य वेळी योग्य ते उत्तर दिले जाईल. भाजपचा झेंडा हा महनगरपालिकेवर फडकणार हा निश्चय केला आहे. शिवसेनेची परंपरागत असलेली सत्ता आम्ही काढून घेणार आहोत. आमच्यासोबत जे लोकं येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. मनसेसोबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. आजची भेट ही केवळ वैयक्तिक आणि मैत्रीची भेट होती. राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळेच त्यांची भेट घेतली,' अशी माहिती प्रसाद लाड यांनी दिली. तसंच, राज ठाकरेंसोबतची भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, असंही त्यांनी नमूद केलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: