अयोध्येतील राम मंदिरासाठी मनसेच्या आमदाराने दिला 'एवढा' निधी

January 23, 2021 0 Comments

ठाणे: अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी सध्या देशभरातून निधी संकलन सुरू आहे. सर्वसामान्य व्यक्तीपासून ते मान्यवरांपर्यंत सर्वच जण यात योगदान देत असून सोशल मीडियावर याबाबत पोस्टही केल्या जात आहेत. राजकीय नेतेही यात मागे नाहीत. मनसेचे एकमेव आमदार यांनी देखील राम मंदिरासाठी आर्थिक मदत केली आहे. त्यांनी २ लाख ५१ हजारांचा धनादेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द केला आहे. ( Donates Rs. 2.51 Lakhs for ) वाचा: राजू पाटील यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, 'आज जगभरातील सकल हिंदू समाज एकवटून अयोध्येतील ‘श्रीराम मंदिर निर्माण निधी’ संकलन करून यथाशक्ती योगदान देत आहे. काल मला सुद्धा या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले. गणेश मंदिराचे ट्रस्टी अच्युत कराडकर, संघाचे प्रांताचे कार्यकर्ते उदय कुलकर्णी, संघाचे कल्याण जिल्हा संपर्कप्रमुख अण्णा गाणार, संघाचे कार्यकर्ते सुरेश फाटक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला व प्रभू श्रीराम मंदिराची छोटी प्रतिकृती भेट दिली.' राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी आतापर्यंत राम मंदिरासाठी निधी दिला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमार, गुरमीत चौधरी, क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचाही यात समावेश आहे. तसंच, या सेलिब्रिटींनी इतरांनीही निधीमध्ये योगदान देण्याचं आवाहन केलं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: