मुंबई महापालिकेचा थकबाकीदारांना मोठा दणका

January 03, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मालमत्ता कराचा भरणा करण्याची वारंवार विनंती करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शेकडो मुंबईकरांच्या मालमत्ता महापालिकेने जप्त केल्या आहेत. या मालमत्ता दंडासह कर भरून सोडवण्यासाठी काही मालमत्ताधारक पुढे न आल्यामुळे मुंबई महापालिकेने या करून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही लिलाव प्रक्रिया सुरू केली जाणार असून यासाठी स्थायी समितीची मंजुरी मागितली जाणार आहे. करोनाच्या संकटामुळे यंदा मालमत्ता कराची वसुली घटली आहे. त्यामुळे थकीत कराच्या वसुलीकडे पालिका प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. वारंवार नोटिसा पाठवूनही मालमत्ता कर न भरणाऱ्या मुंबईकरांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाते. सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात ज्या मालमत्ताधारकांनी थकीत कराची रक्कम भरली नाही, त्यांना नोटीस बजावून त्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये तीन हजार ५६४ मालमत्तांवर अटकावणीची प्रक्रिया करण्यात आली. यामध्ये शहर भागातील नऊ विभागांमध्ये माटुंगा 'एफ उत्तर' विभागात सर्वाधिक, म्हणजे १४७ मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. पूर्व उपनगरातील सहा विभागांमध्ये सर्वाधिक कारवाई मुलुंड 'टी' विभागात, ४८१ मालमत्तांवर करण्यात आली. पश्चिम उपनगरातील नऊ विभागांमध्ये दहिसर 'आर उत्तर' विभागात सर्वाधिक, म्हणजे ३२९ मालमत्ता जप्त करण्यात आल्या. जप्तीमुळे मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध आणण्यात आले होते. यानंतरही काही मालमत्ताधारकांनी शिल्लक कराचा भरणा न केल्याने त्या मालमत्तेवरील जप्ती हटवण्यात येऊन पालिकेने थकीत रक्कम वसूल करण्यासाठी या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये अनेक महागड्या गाड्यांचा समावेश असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. करवसुलीचे आव्हान कायम करोनामुळे पालिकेच्या तिजोरीला मोठा फटका बसला असून मालमत्ता कर, विकास नियोजन शुल्क व प्रीमियम तसेच पाणी आणि मलनि:सारण कर यासह विविध प्रकारचे कर रखडले आहेत. परिणामी पालिकेचे हजारो कोटींचे उत्पन्न वसुल झालेले नाही. मालमत्ता कर हा महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत असून मागील डिसेंबर २०२०पर्यंत मालमत्ता करापोटी फक्त ७०० कोटी रुपयांची वसुली झाली आहे. याच कालावधीत मागील वर्षी पालिकेने १,८०० कोटी रुपये वसूल केले होते. मार्च २०२१पर्यंत ६,७६८ कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी पालिकेने सुमारे पाच हजार कोटी रुपयांची दोन लाख ५१ हजार देयके करदात्यांना पाठवली आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: