सुजय विखे पाटील भडकले! म्हणाले, आता राजीनामाच देतो!

January 03, 2021 0 Comments

नगर: लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. यांचा विजय सुकर करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या राहुरीतील सहकारी साखर कारखान्यापुढील अडचणी संपायला तयार नाहीत. कर्जपुरठा आणि अन्य प्रश्न सोडवून गाळप हंगाम सुरू केला खरा पण त्यातही अडचणी येऊ लागल्या आहेत. कारखाना वारंवार बंद का पडतो, याची पाहणी करण्यासाठी विखे गेले असता बॉयलरमध्ये चक्क साखरेची पोती आढळून आली. हा खोडसाळपणा पाहून विखे संतापले आणि ७२ तासांत कारभार सुधारला नाही तर आपण संचालक मंडळासह राजीनामा देऊ अशी घोषणाच त्यांनी केली. ( ) वाचा: येथील हा कारखाना विविध कारणांमुळे बंद पडला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी डॉ. विखे यांनी त्यामध्ये लक्ष घातले. कामगारांचे प्रश्न सोडविले, जिल्हा सहकारी बँकेत विरोधकांशी जुळवून घेत कर्ज मिळवून दिले. निवडणुकीत लक्ष घालून आपले मंडळ निवडून आणले. बंद पडलेला कारखाना सुरू झाला. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. विखे यांना राहुरी तालुक्यात चांगला फायदा झाला. त्यानंतरही विखे यांनी हा कारखाना सुरळीत चालू ठेवण्यावर भर दिला. पदाधिकाऱ्यांमध्ये अवश्यक ते बदल केले. स्वत: विखे तज्ज्ञ संचालक म्हणून कार्यरत आहेत. वाचा: यावर्षीही कारखाना सुरू झाला आहे. मात्र, वारंवार व्यत्यय येऊन गाळप बंद पडून नुकसान होत आहे. पुढील वर्षी कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. त्यावेळी याचा फटका बसू शकतो. शिवाय विखे यांनी लोकसभा निवडणुकीपुरतेच लक्ष घातले होते, असे आरोपही मधल्या काळात होऊ लागला होता. त्यामुळेच नेमकी काय अडचण होत आहे, याची पाहणी करण्यासाठी डॉ. विखे यांनी शनिवारी कारखान्याला भेट दिली. पदाधिकारी आणि कामगारांची बैठक घेतली. त्यानंतर बॉयलरमध्ये त्यांना साखरेची पोती आढळून आली. हा प्रकार आपोआप किंवा तांत्रिक बिघाडामुळे मुळीच होऊ शकत नाही. हा कोणी तरी केलेला खोडसाळपणा आहे. याची चौकशी करा, संबंधितांवर कारवाई करा, कारखाना सुरळीत सुरू करा, अन्यथा आपण कारखान्याच्या पदाधिकारी, संचालक मंडळासह राजीनामा देऊ, अशा इशाराच विखे यांनी दिला आहे. एवढे प्रयत्न करूनही कारखाना सुरळीत चालत नसल्याने विखे यांचा हा संताप झाल्याचे पहायला मिळाले. वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: