कोकणवासीयांसाठी खूषखबर! मुंबई-गोवा हायवेचे निम्मे काम पूर्ण

January 05, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, मुंबई मुंबईतील कोकणवासियांच्या वेगवान प्रवासाचे स्वप्न हळूहळू दृष्टिक्षेपात येत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामांनी वेग घेतला असून जवळपास निम्मे (४४ टक्के) चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२२ अखेर या महामार्गाचे संपूर्ण काम होणार असून यांनतर चाकरमान्यांना वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येईल. खासदार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री यांना मुंबई-गोवा महामार्गाच्या सद्यस्थितीबाबत पत्रातून विचारणा केली होती. या पत्राला उत्तर देताना मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे पॅकेजनुसार आढावा प्रभू यांना पाठवला. हा आढावा प्रभू यांनी ट्विट केला. ४५० किलोमीटर लांबीच्या मुंबई-गोवा महामार्गापैकी पनवेल ते झाराप (सिंधुदुर्ग) दरम्यान २३० किमी लांबीच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण झालेले आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे संपूर्ण काम (अरवली ते वाकड वगळता) करण्यासाठी 'मार्च २०२२' लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. अरवली ते वाकड हा ९१ किलोमीटरचा टप्पा डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, असे गडकरी यांनी पाठवलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग संयुक्तपणे हा महामार्ग उभारण्यात येत आहे. बांधकामाला वेग करोनामुळे महामार्ग बांधणीच्या कामांना ही फटका बसला होता. अनेक ठिकाणी मजूर गावी गेले. अनलॉकमध्ये कामे सुरू झाली मात्र बांधकाम साहित्या विलंबाने पोहचत होते. यामुळे महामार्ग बांधणीच्या कामांचा वेग मंदावला होता. मुंबई-गोवा महामार्गाची सद्यस्थिती पॅकेज - लांबी किलोमीटर - काम पूर्ण (टक्क्यांमध्ये ) - अपेक्षित काळमर्यादा पनवेल ते इंदापूर-८४- ८६.१४ -डिसेंबर २०२१ इंदापूर विभाग- २४.४३०- २६.२८ - मार्च २०२२ वीर ते भोगाव - ३९.५७०- ४५.६९ -डिसेंबर २०२१ भोगाव ते खावटी - १३.६००- ३३.२४- मार्च २०२२ कशेडी ते परशूराम घाट - ४३.८००-८० - जून २०२१ परशुराम घाट ते अरवली - ३५.९०० - २४ - डिसेंबर २०२१ अरवली विभाग - ४० - ८.६१- डिसेंबर २०२२ वाकड विभाग- ५०.९०० - १२ - डिसेंबर २०२२ वाकड ते तळेगाव - ३५ - ८५.६ - मार्च २०२१ तळेगाव ते कंठे - ३८.८३०-९२ - अंशत पूर्ण कलमठ ते झरप -४४.१४० -९८ - अंशत पूर्ण मुंबई गोवा चौपदरी महामार्ग एकूण लांबी - ४५०.१७ किमी काम पूर्ण - ४३.७५८ टक्के


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: