धनंजय मुंडेंवर आरोप; शक्ती कायद्यासंदर्भात अजितदादांचे मोठे विधान
पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्याविरोधात केलेली बलात्काराची तक्रार रेणू शर्मानं मागे घेतली आहे. रेणू शर्मानं तक्रार मागे घेतल्यामुळं धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. तसंच, महाराष्ट्रात नव्यानं मंजूर झालेल्या शक्ती कायद्याबाबतही त्यांनी महत्त्वाच विधान केलं आहे. पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली आहे. 'महिलेनं तक्रार मागे घेतल्याची माहिती मिळाली. खरं तर ही फार विचार करण्याची गोष्ट आहे. तक्रार मागे घेतल्यानंतर शक्ती कायद्यासंदर्भात बारकाईने विचार करण्याची गरज वाटते, आजा जॉइंट सिलेक्ट कमिटीकडं ते आम्ही दिलंय,' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 'एखादा राजकीय व्यक्ती सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांच नाव लोकांच्या मध्ये चांगलं होण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. पण असा कोणी आरोप केला तर एका झटक्यात त्याची बदनामी होतात. विरोधक हा मुद्दा हाताशी ठेवतात. राजीनामाच्या मागणी होती. ज्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनामाच्या मागणी केली, ते काय उत्तर देणार?,' असा सवाल अजित पवारांनी केला आहे. 'धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर आम्ही त्यांना पाठीशी घालत आहोत, असं आरोप करण्यात आले. पण आम्ही नेहमीच संपूर्ण तपास होऊ द्यात, सत्य बाहेर येऊ द्या, असं आमचं नेहमीच म्हणणं होतं. याच धनंजय मुंडे यांच्या कुटुंबाला त्रास झाला. आमच्या पक्षाचीही बदनामी झाली,' असा टोला विरोधकांना हाणला आहे. 'धनंजय मुंडेंना मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं आहे. विधानसभेत पंकजा मुंडेंसारख्या कॅबिनेट मंत्र्यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला. आजही सरकारमध्ये ते महत्त्वाच्या पदावर काम करत आहेत. बहुजन समाजाच्या नेतृत्वाला शरद पवारांनी संधी दिली. पण, अशा आरोपांमुळं हे नेते आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब अडचणीत आलं आहे,' असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: