शिर्डी : आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राचे देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उद्घाटन.

December 17, 2020 0 Comments


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या महामारी मध्ये देशाची बिघडलेली अर्थव्यवस्थेचा टक्का उंचवण्यासाठी तसेच डबघाईला आलेले उद्योग व्यवसाय पुनर्जीवित करण्यासाठी ऐतिहासिक असे सुमारे वीस लाख कोटी रु चे पॅकेज आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत जाहीर केले.या योजनेची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. या योजनेअंतर्गत अधिकाधिक व्यवसायिकांना या योजनेची माहिती मिळावी व सहजपणे लाभ घेता यावा या उद्देशाने भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा स्तरावर आत्मनिर्भर माहिती केंद्र सुरू करण्याचा उपक्रम युवा मोर्चाने हाती घेतला आहे.



आज मुंबई येथे भाजपा कार्यालयांमध्ये या उपक्रमाचा व्हर्च्युअल उद्घाटन शुभारंभ मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ,प्रदेशाध्यक्ष .चंद्रकांत दादा पाटील सरचिटणीस ,चंद्रशेखरजी बावनकुळे व संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्या हस्ते पार पडले.

या कार्यक्रमामध्ये शिरडी शहर युवा मोर्च्याने दूर दृष्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदविला. यावेळी  आत्मनिर्भर अभियान चे उत्तर नगर जिल्हा सह-संयोजक अमोल कोते यांनी कार्याकार्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि, "आत्मनिर्भर भारत हि एक योजना नसून एक मोठे अभियान आहे. आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत देशाशी प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मोदी सरकारच्या आर्थिक योजनांचा जसे की, मुद्रा योजना, पी एम स्वनिधी योजना आणि भविष्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देणे हा  मुख्य उद्धेश आहे." 

तसेच युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश गोंदकर यांनी सांगितले की, आत्मनिर्भर भारत योजना हि मोठ्या उद्योग व्यवसायापासुन ते सर्वसामान्य व्यावसायिकांसाठी सुद्धा अत्यंत लाभदायी आहे. या योजनेअंतर्गत युवा मोर्चा शिरडी शहराच्या माध्यमातुन सुमारे १८० पथ्य विक्रेत्यांची नोंदणी करून १२० पथविक्रेत्यांना लाभ मिळवुन दिला व यापुढेही या योजना युवा मोर्च्या च्या माध्यमातुन सर्वसामान्यापर्यंत पोहणविणार.

या कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार ,उत्तर भारतीय सेल जिल्हाध्यक्ष राजेश जी शर्मा, शहराध्यक्ष सचिन शिंदे युवा मोर्चा प्रदेश सदस्य किरण बोराडे ,उपाध्यक्ष सुधीर शिंदे , आत्मनिर्भर भारत उत्तर नगर जिल्हा सहसंयोजक -अमोल कोते, संघटक राजेंद्र ह. गोंदकर, स्वानंद रासने यांची प्रमुख उपस्थिती होती.

युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस लखन बेलदार , उपाध्यक्ष प्रसाद शेलार, विकास गोंदकर, अमोल बडे, सचिन घुले ,सचिव-राजेंद्र बलसाने,गणेश सोनवणे, कोषाध्यक्ष-अक्षय मुळे, सोशल मोडिया प्रमुख-आकाश आडांगळे,सागर जाधव ,प्रसिद्धीप्रमुख- विशाल नागपुरे, सदस्य-श्याम गायके, राजेंद्र बर्डे, नरेश सुराणा,सोमराज कावळे,लक्ष्मण पेटारे, सागर भुईर, नितीन घुले,राहुल घुले, आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: