ऐन दिवाळीत CM ठाकरे यांचे महत्त्वाचे निर्देश; 'कोविड अद्याप गेला नसून...'

मुंबई: विक्रमी संख्येने दर दिवशी देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री यांनी महत्त्वाची सूचना केली आहे. या ३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिला डोस १०० टक्के नागरिकांना दिला गेला पाहिजे, हे उद्दीष्ट डोळ्यापुढे ठेवून तसे नियोजन करा, असे मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आज सांगितले. अद्याप गेलेला नाही, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी यावेळी महत्त्वाचे आवाहनही केले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे हे आवाहन महत्त्वाचे ठरले आहे. ( ) वाचा: प्रधानमंत्री हे उद्या (३ नोव्हेंबर) कोविड लसीकरण आढावा घेणार असून यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे पूर्वतयारी बैठक झाली. बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री दूरदृश्यप्रणालीद्वारे जालना येथून सहभागी झाले. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. करोना संसर्गाची साथ अजून गेलेली नाही. ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून अशांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आपापल्या जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्वस्तरातील व धर्मांतील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्याची सूचना केली. वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, कोविड संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. असे असले तरी नागरिकांनी बेफिकीर होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी टेस्टिंगचे प्रमाण कमी होता कामा नये. राज्यातील विविध ठिकाणी आपण प्रयोगशाळा विकसित केल्या. त्याचा वापर करायला हवा. कोविडचे संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप कोविड गेलेला नाही, याची जाणीव नागरिकांना सतत करून द्यायला हवी. लस घेण्याबरोबरच कोविड सुसंगत वर्तन ठेवण्यासाठी सतत जनजागृती मोहीम राबवावी. चित्रपटगृह सुरू केली जात आहेत. प्रत्येक चित्रपटगृहात लसीकरणाबाबत संदेश दाखविण्यात यावेत, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. वाचा: सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण मोहिमेत स्थानिक पदाधिकारी यांचा सहभाग घ्यावा. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर यांना लसीचे दोन्ही डोस अनिवार्य करण्यात यावेत. डोंगरी भागात मोबाइल युनिटच्या माध्यमातून लसीकरण करण्यात यावे, असे सांगितले. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी लसीकरणाच्या सांख्यिकीचे जिल्हाधिकारी यांनी विश्लेषण करावे आणि त्याअनुषंगाने लसीकरणाबाबत धोरण ठरवावे. दीपावलीनंतर विशेष उपाययोजना आखून लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले. टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित यांनीही सूचना मांडल्या. औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, नंदूरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे बैठकीला उपस्थित होते. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

परमबीर सिंग बेल्जियममध्ये?; नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर थेट आरोप

मुंबई: खंडणी आणि मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांना अटक करण्यात आली आहे. देशमुख यांच्या अटकेनंतर तक्रारदार कुठे आहेत, असा सवाल केला जात असून त्यावर बोलताना भाजप आमदार यांनी पर्यावरण मंत्री यांना लक्ष्य केले आहे. ( ) वाचा: परमबीर सिंग हे काही भाजपचे जावई नाहीत. त्यांनी गुन्हा केला असेल तर त्यांच्यावरही कारवाई व्हायलाच हवी. ते देश सोडून पळाले आणि सध्या बेल्जियममध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबत प्रश्न विचारत असताना ते महाराष्ट्र सोडून कसे गेले याचे उत्तर आधी दिले गेले पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले. नितेश यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत निशाणा साधला. परमबीर सिंग हा अधिकारी कुणाचा लाडका होता?, सुशांतसिंग मृत्यू प्रकरण असेल, दिशा सालियन प्रकरण असेल, टीआरपी घोटाळा असेल, या सर्वात तुमच्यासाठी परमबीर सिंगच काम करत होते ना?, असे प्रश्न विचारताना तुमच्या इशाऱ्यावर काम करणारे परमबीर आता तुम्हाला का नकोसे झालेत?, अशी विचारणा नितेश यांनी केली. वाचा: परमबीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना आदित्य ठाकरे यांचे सतत त्यांच्या कार्यालयात असायचे. ते परमबीर यांच्या नियमितपणे संपर्कात असायचे. त्यावेळचे आयुक्त कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर तपासले तर ती बाब समोर येईल. मग परमबीर कुठे गेले हे आदित्य ठाकरे यांना विचारा, असे आम्ही म्हणायचे का, असा उलट सवाल नितेश यांनी केला. परमबीर यांच्याकडे केवळ अनिल देशमुख यांचीच नाही तर सुशांतसिंग राजपूत व दिशा सालियन प्रकरणाचीही सगळी माहिती असून त्यांना अटक होऊ नये असे या सरकारला वाटत असावे, असा तर्कही नितेश यांनी काढला. परमबीर यांच्या ज्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. त्या पत्रात यांचाही उल्लेख असून त्यांना अटक केली गेली पाहिजे, म्हणजे संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल, असेही नितेश यांनी नमूद केले. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

उरणमध्ये भीषण दुर्घटना; पुलाच्या पिलरचा भाग कोसळून १ ठार, ६ जखमी

रायगड: जिल्ह्यात उरणमधील गावात निर्माणाधीन पुलाच्या पिलरचा काही भाग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एका मजुराला प्राणास मुकावे लागले आहे तर सहा मजूर गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ( Uran Under Construction Bridge ) वाचा: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल- मार्गावर जासई गावात सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पिलरच्या पियर कॅपमध्ये सीमेंट काँक्रिटचे मिश्रण भरण्याचे काम सुरू असताना तो संपूर्ण भाग खाली कोसळला. त्यात पिलरवर काम करत असलेले मजूरही खाली कोसळले. या दुर्घटनेत एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सहा कर्मचारी जखमी झाले. त्या सर्वांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले. दुर्घटनेत मृत्यू पावलेला मजूर आणि जखमी मजुरांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांच्याबाबत संबंधित कंत्राटदाराच्या माध्यमातून माहिती घेण्यात येत आहे. वाचा: दुर्घटनेची माहिती मिळताच उरण वाहतुक विभागातील पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले. इतर मजुरांच्या मदतीने मदत व बचाव कार्य करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले असून क्रेनच्या साह्याने लोखंडी सांगाडा हटवून रस्ता खुला करण्यात आला आहे. दरम्यान, जासई गावाच्या हद्दीत रस्ता रुंदीकरण आणि उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हे काम करण्यात येत आहे. जिथे दुर्घटना घडली ते काम या कंत्राटदार कंपनीकडे आहे. या अनुषंगाने आमचा तपास सुरू असून मजुरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना आवश्यक साधनं दिली गेली होती का, याची चौकशी आम्ही करणार असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; 'या' प्रश्नावर मनसे आक्रमक

अहमदनगर : भारतीय जनता पक्षानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने मैदानात उतरली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांना परिवहन मंत्रीच जबाबदार असून त्यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मनसे नेते यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ( ) वाचा: यांनी आत्महत्या केल्यानंतर तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी मनसेचे नेते दिलीप धोत्रे व प्रवक्ते प्रकाश महाजन शेवगाव येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री यांना लक्ष्य केले. काकडे यांच्या मूळ गावी आव्हाणे येथे जावून काकडे कुटुंबातील सुनीता काकडे, मुले सतीश काकडे, महेश काकडे, मुलगी ज्योती घनवट, भाऊ शिवाजी काकडे यांचे त्यांनी सांत्वन केले. मनसेच्यावतीने आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी काकडे यांच्या वारसाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. परिवहन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही धोत्रे यांनी सांगितले. वाचा: पत्रकारांशी बोलताना धोत्रे म्हणाले, काकडे यांनी आत्महत्या केली असून त्यांनी परिवहन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी बलिदान दिले आहे. परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत सामावून घेण्यासंबंधी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. एसटीचे कर्मचारी जोखमीचे काम जबाबदारीने पार पाडत आहेत. प्रवाशांसाठीही व कर्मचाऱ्यांसाठीही एसटी वाचली पाहिजे. अशीच भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही आहे. महाविकास आघाडी व भाजप सत्तेसाठी भांडत आहेत. यामुळे इतर समस्यांकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. अनावश्यक गोष्टींवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र, परिवहन कर्मचाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. करोना काळातही मनसेने रस्त्यावर उतरून नागरिकांना प्रत्यक्ष मदत केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, पाथर्डी तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, गोकुळ भागवत, एसटी कर्मचारी संघटनेचे दिलीप लबडे, संजय धनवडे, संतोष सोंडे, दिलीप बडधे, इस्माईल पठाण उपस्थित होते. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

परमबीर सिंग यांना पळून जाण्यास कुणी मदत केली?; 'या' मंत्र्याचा गंभीर आरोप

मुंबई: 'माजी गृहमंत्री हे सोमवारी ईडी कार्यालयात स्वतःहून उपस्थित राहिले. त्याआधी त्यांनी सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब केला. अनिल देशमुख यांना देखील फसवले गेले आहे. त्यांच्यावर ज्या व्यक्तीने आरोप लावले, तो व्यक्ती फरार आहे आणि आरोप असलेली व्यक्ती स्वतःहून चौकशीला गेली तर त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना घाबरविण्यासाठी केली गेली आहे,' असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री यांनी पत्रकार परिषदेत केला. देशमुख यांच्याविरुद्ध तक्रार करणारे कुठे आहेत, असे विचारत मलिक यांनी भाजपवर प्रश्नांची सरबत्ती केली. ( ) वाचा: अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर नेते व माजी खासदार यांनी केलेल्या ट्वीटचाही मलिक यांनी समाचार घेतला. भाजपच्या एका नेत्याने ट्वीट केले आहे की, आता पुढचा नंबर अनिल परब यांचा आहे. याचाच अर्थ सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे, हे स्पष्ट होते, असे मलिक म्हणाले. अनिल देशमुख यांना अटक केली असली तरी कायदा आपले काम करेल. एक ना एक दिवस सत्य लोकांसमोर येईलच. मात्र परमबीर सिंग कुठे आहेत?, याचे उत्तर केंद्र सरकारने दिले पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. वाचा: परमबीर सिंग हे महाराष्ट्रातून चंदीगड येथे गेले. त्यानंतर ते परतले नाहीत. काही लोक सांगतात ते परदेशात गेले आहेत. लुकआऊट नोटीस असतानाही कोणताही व्यक्ती देश सोडून कशी जाऊ शकते? एकतर हवाई मार्गे किंवा रस्ते मार्गाने त्याला जावे लागेल. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार या तीन राज्यांतून नेपाळला जाता येते. या तीनही राज्यांत भाजपचे सरकार आहे. इतर लोकांप्रमाणे परमबीर सिंग यांना पळून जाण्यास मदत करण्यात आली आहे का?, याचे उत्तर भाजपला द्यावे लागेल, असेही नवाब मलिक म्हणाले. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

दुकानात सुरू होता जुगार; पोलिसांनी छापा टाकत केली मोठी कारवाई

: शहरातील बोंबले चौक येथे तिरट नावाचा जुगार खेळला जात असताना पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी एकूण १ लाख ४६ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसंच या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर शहरातील बोंबले चौक हडको येथील राज कोल्ड्रिंक्स या दुकानात पत्र्याच्या शेडमध्ये काही लोक पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत आहेत, अशी माहिती खबऱ्यांमार्फत पोलिसांना मिळाली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील यांच्या आदेशावरून उपविभागीय पोलीस पथकाने राज कोल्ड्रिंक्स या दुकानात अचानक जाऊन छापा मारला. यावेळी नऊ जण रिंगण करून पत्त्यांवर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. सदर इसमांना पोलिसांनी पकडले आणि त्यांची पंच समक्ष झडती घेण्यात आली. यावेळी त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम आणि इतर साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आली. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रोडगे यांच्या फिर्यादीवरून नऊ आरोपींविरुद्ध कलम ४,५ महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस पथकाचे पोलीस नाईक योगेश मांडोळे, पोलीस अंमलदार गणेश आतकरे, बालाजी जाधव, ऋषिकेश गवळी, अमर माळी आणि एकनाथ नागरगोजे या पथकाने केली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

दिव्यांग शूटर स्वरुप उन्हाळकर याचा १० लाख रुपये देऊन एलआयसीकडून गौरव

: जपानची राजधानी टोकिओ येथे झालेल्या स्पर्धेत १० मीटर एअर रायफल क्रीडा प्रकारात चौथा क्रमांक पटकावणाऱ्या कोल्हापूरच्या स्वरुप महावीर उन्हाळकर या खेळाडूचा आयुर्विमा मंडळाने () कोल्हापूर विभागाच्या वतीने १० लाख रुपये देऊन गौरव केला. दीपावलीच्या पूर्वसंध्येला १० लाख रुपयांची मदत मिळाल्याने स्वरुपने खऱ्या अर्थाने धनत्रयोदशी साजरी केली. पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्याला एलआयसीने एक कोटी रुपये, रौप्य पदक विजेत्याला ५० लाख, ब्राँझ पदक विजेत्याला २५ लाख तर चौथा क्रमांक मिळवणाऱ्याला १० लाख रुपये जाहीर केले होते. पॅराऑलिंपिक स्पर्धेत भारताने पाच सुवर्णपदकासह १९ पदके पटकावली. ज्यांना पदक मिळाले नाही पण चांगले प्रदर्शन केले, अशा खेळाडूंचा एलआयसीने गौरव केला. शूटिंगमध्ये दहा मीटर एअर रायफलमध्ये स्वरुपचे ब्राँझ पदक थोडक्यात हुकले आणि त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पण त्याच्या यशाचे कौतुक करताना एलआयसीने १० लाख रुपयांचा धनादेश देऊन त्याच्या खात्यावर पैसे वर्ग केले. स्टेशन रोडवरील एलआयसीच्या कार्यालयात मंगळवारी एका कार्यक्रमात एलआयसी कोल्हापूर विभागाचे मंडल प्रबंधक अभय कुलकर्णी यांच्या हस्ते स्वरुप उन्हाळकरला १० लाख रुपयांचा धनादेश, मानपत्र, सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. एलआयसीच्या वतीने देशभरातील खेळाडूंना मदत केली असून महाराष्ट्रातून एकमेव मदत स्वरुप उन्हाळकरला झाली आहे. एलआयसीने केलेल्या गौरवाबद्दल स्वरुपने आभार मानत एलआसीने केलेल्या भरीव मदतीचा निश्चित फायदा होईल, अशी आशा व्यक्त करत पुढील पॅराऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय जाधव, स्वरुपचे प्रशिक्षक रमेश कुसाळे, सेल्स मॅनेजर प्रमोद गुळवणी, उमेश दिवेकर उपस्थित होते.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

शाळेत जात असताना पळवून नेत १६ वर्षीय मुलीवर अत्याचार!

: शाळेत जात असताना फुस लावून पळवून नेऊन आणि नंतर जिवे मारण्याच्या धमक्या देत जिल्ह्यातील १६ वर्षीय मुलीवर डोंगर परिसरात लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी शिवाजी अप्पासाहेब काकडे याला सोमवारी अटक करुन मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी दिले. या प्रकरणी पीडित मुलीच्या ४० वर्षीय आईने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ३० ऑक्टोबर २०२१ रोजी फिर्यादी, तिचा पती व १८ वर्षीय मुलगा हे कामानिमित्त बाहेर गेले होते, तर त्यांची १६ वर्षांची मुलगी शाळेत जाते म्हणून घराबाहेर पडली. दुपारी फिर्यादी व कुटुंबीय घरी परतले तेव्हा मुलगी शाळेतून परत आली नसल्याचं स्पष्ट झालं. शोधाशोध करूनही ती सापडली नसल्याने गावातील आरोपी शिवाजी अप्पासाहेब काकडे (२३) याने तिला फुस लावून पळवून नेल्याची शंका कुटुंबियांना आली. या प्रकरणात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी, शाळेत जात असताना आरोपीने तिचा हात पकडून डोंगर परिसरात नेले आणि तिथे तिला जिवे मारण्याच्या धमक्या देत तिच्यावर अत्याचार केल्याचं मुलीने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर घाटीमध्ये तिची वैद्यकीय तपासणी होऊन तिचा जबाब नोंदवण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले असता, आरोपीने पीडितेवर कुठे अत्याचार केला, आरोपीचे आणखी कुणी साथीदार आहेत का, अशा बाबींचा तपास करणे व पुरावे हस्तगत करणे बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील अरविंद बागूल यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

अनिल देशमुखांना अटक; धनंजय मुंडे म्हणतात, 'अटकेचे कारण 'हे''

बीडः राज्याचे माजी गृहमंत्री (Anil Deshmukh) यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. देशमुख यांना झालेली अटक बेकायदेशीर असल्याचे खासदार () यांनी म्हटल्यानंतर आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री (Dhananjay Munde) यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सरकार अस्थिर करण्यासाठीच अशा प्रकारच्या चौकशा लावल्या जात असल्याचे सांगत मुंडे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. (minister criticizes bjp over arrest to former home minister ) धनंजय मुंडे हे परळीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेले सर्व आरोप खोटे असून सरकार अस्थिर करण्यासाठी चौकशा लावल्या जात आहेत, असे सांगतानाच यामध्ये भाजपकडून राजकारण केलं जात असल्याची टीका मुंडे यांनी केली आहे. मात्र असं असलं तरी महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे, भाजपने कितीही प्रयत्न केला तरी काही फायदा होणार नाही, असे मुंडे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील आरोपांवर देखील भाष्य केले. अजित पवार हे कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनीही अनिल देशमुख यांच्या अटकेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनिल देशमुख हे चौकशी यंत्रणेला सहकार्य करत होते. असे असतानाही त्यांना अटक केली जाते. हे मुळात दुर्दैवी आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याबाबतही मत व्यक्त केले आहे. परमबीर सिंग सध्या बेपत्ता आहे. कोर्टाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे, असे सांगतानाच ते जर परदेशात गेले असतील तर त्यांना कोणाची साथ आहे, असा सवाल पवार यांनी विचारला आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मुंबई-कोकण अंतर होणार कमी? एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा

: कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि मुंबई-सिंधुदुर्ग ही शहरं आणखी जवळ आणण्यासाठी कोस्टल हायवे रुंदीकरण व ग्रीन फिल्ड रस्ता या दोन महामार्गाचे काम एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी घोषणा शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री (Shivsena ) यांनी मंगळवारी रत्नागिरीत केली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या एकनाथ शिंदे यांनी जिल्हयातील नगरपरिषद, नगरपंचायती यांच्या प्रशासकीय आणि विकासकामांचा आढावा जिल्हाधिकारी सभागृह येथे घेतला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते. 'विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही' 'कोकणातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी चांगले रस्ते आणि कनेक्टिव्हिटीची गरज आहे. ज्या ठिकाणी चांगले रस्ते असतात त्या ठिकाणचा विकासदेखील वेगाने होत असतो. कोकणामधील पर्यटन वाढीसाठी पायभूत सुविधांची गरज आहे,' असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असंही ते म्हणाले. 'सर्वसामान्य माणसांच्या फायद्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून अनेक जनहिताचे चांगले निर्णय घेण्यात येत आहेत. या परिसरात मागणी केल्यानुसार उर्वरित रस्ते, सुशोभिकरण, जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी निधी देण्यात येईल,' असं आश्वासनही मंत्री शिंदे यांनी दिलं आहे. दरम्यान, करोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी आपण शासनाकडून करण्यात आलेल्या नियमांचं पालन करा, असं आवाहनही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

दिवाळी ऑफर स्वीकारताना सावधान! अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टच्या नावाचा वापर करून मोठी फसवणूक

मुंबई : दिवाळीनिमित्त ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या अनेक कंपन्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन बाजारात उतरल्या आहेत. याच कंपन्यांच्या नावांचा वापर करून सायबर भामट्यांनी वेगवेगळ्या सवलती, लकी ड्रॉ, लॉटरी अशा योजनांच्या आमिषाने सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली असून तशा तक्रारी देखील वाढल्या आहेत. त्यामुळे मुंबई सायबर पोलिसांनी सर्व नागरिकांना सावध केलं असून (Amazon flipkart 2021) स्वीकारताना जरा जपून व्यवहार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या सणाला घरगुती उत्पादने, कपडे तसंच इतर वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. दोन वर्ष करोनामध्ये गेल्यामुळे यावर्षी अनेक कंपन्यांनी ग्राहकांसाठी विविध योजना आणल्या आहेत. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्या यामध्ये आघाडीवर आहेत. एकावर एक मोफत, किमतीत ३० ते ४० टक्के सूट, गिफ्ट व्हाउचर, लकी ड्रॉ अशा योजनांच्या जाहिराती सगळीकडे झळकत आहेत. आकर्षक जाहिराती असलेल्या कंपन्यांच्या उत्पादनांकडे ग्राहकांचा कल पाहून या कंपन्यांच्या नावाने फसवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. सवलत मिळवण्यासाठी ग्राहकाच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डचा तसंच बँक खात्याचा तपशील घेऊन आर्थिक फसवणूक केली जात आहे. या घटना वाढल्याने सायबर पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना सावध केलं आहे. कोणत्याही दिवाळी ऑफर्स स्वीकारताना प्रथम शहानिशा करावी तसंच कोणतीही वैयक्तिक माहिती अथवा बँकेचा तपशील अनोळखी व्यक्तीला देऊ नये, असंही सायबर पोलिसांनी कळवलं आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Girish Jadhav Passed Away: शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक गिरीश जाधव यांचे निधन

कोल्हापूर: शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक गिरीश लक्ष्मण जाधव (वय ७५ ) यांचे मंगळवारी जयसिंगपूर येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कार बुधवारी सकाळी १० वाजता, जयसिंगपूर येथील स्मशानभूमित होणार आहेत. ( a collector of arms from the time of passed away) अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महात्सव समिती, सह्याद्री प्रतिष्ठान, लखुजीराजे जाधव प्रतिष्ठान, शाहिर परिषद यासह राज्य आणि देशपातळीवरील विविध संस्था-संघटना तसेच शासन व खासगी ट्रस्टची वस्तू संग्रहालये, पुरातत्व विभागाच्या विविध समित्यांवर ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सक्रिय होते. महाराष्ट्रातील गडकोट-किल्ल्यांचा त्यांचा सखोल व चौफेर अभ्यास होता. नव्या पीढीला गडकिल्ल्यांसह ऐतिहासिक वास्तूंची ओळख व्हावी यासाठी अनेक मोहिमांमध्ये ते गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय होते. त्यांच्या या इतिहासाच्या वेडाची दखल 'इपिक' सह विविध वाहिण्यांनी आवर्जून घेतली होती. क्लिक करा आणि वाचा- ज्येष्ठ स्वतंत्र्य सैनिक ल. मा. जाधव यांचे ते चिरंजीव होत. मुंबईत प्रारंभी केमिकल इंजिनिअर व नंतर मार्केटिंग क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या गिरीष जाधव यांना इतिहाप्रेमातून दुर्मिळ शस्त्रास्त्रांच्या संग्रहाचा छंद जडला. देशभर खेडोपाडी-गावोगावीतील जुने व ॲण्टीक वस्तूंचे बाजार फिरूण त्यांनी शेकडो शस्त्रास्त्रांचा संग्रह केला.प्रसंगी व्यक्तीगत आणि कौटूंबीक आर्थीक गरजा बाजूला ठेवून त्यांनी गेल्या ५० वर्षांपासून त्यांनी इतिहाकालीन शस्त्रास संग्रह, त्यांचा अभ्यास आणि संशोधनाचे व्रत जोपासले होते. क्लिक करा आणि वाचा- इतिहास कालीन शस्त्रास्त्रांचा संग्रह आणि अभ्यास स्वत:पूरता मर्यादित न ठेवता, तो जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, भावी पीढीने यातून आदर्श घेवून राष्ट्राची संपत्ती असणाऱ्या या अनमोल ठेव्याचे जतन-संवर्धन-संरक्षण कार्यात सक्रिय सहभाग द्यावा, या उद्देशाने गिरीष जाधव यांनी आपल्याकडील संग्रहाचे प्रदर्शन मांडण्यास सुरुवात केली. 'शौर्य गाथा' या शिवकालीन शस्त्रास प्रदर्शनातून त्यांनी इतिहासाची अनोख्या पध्दतीने सेवा केली. संपूर्ण जगाच्या आकर्षणाचा विषय असणाऱ्या शिवकालीन इतिहास व शस्त्रास्त्रांची परिपूर्ण माहिती देणारे केंद्र उभारण्याचा त्यांचा मानस होता. प्रदिर्घ अभ्यास व संशोधनावर आधारित इतिहासकालीन शस्त्रास्त्रे या विषयावरील पुस्तक निर्मीतीचे काम ते सद्या करत होते. त्यांच्या निधनाने हे अत्यंत महत्वाचे काम अपूरे राहिले आहे. क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

प्रवाशांना पुन्हा मनस्ताप? 'या' जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची घोषणा

सांगली : राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या असल्या तरी, एसटी कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलिनीकरण व्हावं, या मागणीसाठी अजूनही सांगली जिल्ह्यातील ठाम आहेत. ही मागणी मान्य व्हावी, यासाठी सांगलीतील एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी पहाटेपासून पुन्हा संप ( Strike ) करण्याचा निर्णय घेतला आहे. आटपाडी आगारात गेल्या पाच दिवसांपासून एसटी सुरूच आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या निर्णयामुळे ऐन दिवाळीत सांगली जिल्ह्यात एसटीची चाके थांबणार आहेत. विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप केला होता. दोन दिवसांपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यानंतर राज्यातील काही आगारांचा अपवाद वगळता, बहुतांश ठिकाणी एसटीची सेवा पुन्हा सुरू झाली. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी अजूनही काही ठिकाणी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एसटीची सेवा ठप्प आहे, तर आता बुधवारी पहाटेपासून सांगलीतही संप करण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत सांगलीत प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागणार आहे. दरम्यान, आटपाडीत एसटी आगाराचे गेट बंद करून निदर्शने केल्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ७० जणांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या जातील, मात्र त्यांनी ऐन दिवाळीत संप करून प्रवाशांची अडवणूक करू नये, असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. मात्र तरीही सांगली जिल्ह्यात एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याने प्रवाशांचा खोळंबा होणार आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

अजित पवारांशी संबधित संपत्तीवर जप्ती?; वकिलाकडून 'हा' मोठा खुलासा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीने अटक केल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाने कारवाई सुरू केली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. अजित पवारांशी संबंधित कोट्यावधींची संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झाले होते. मात्र, अजित पवार यांच्याकडून या वृत्ताचा स्पष्टपणे इन्कार करण्यात आलेला आहे. ( has revealed that the news that the has confiscated the property belonging to me is false) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. क्लिक करा आणि वाचा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसारीत होत असलेल्या बातम्यांचे खंडन करताना त्यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही किंवा त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही. आयकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल, असे अॅड. पाटील यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणी प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असंही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, प्रसिद्धीमाध्यमांनी वस्तुस्थिती तपासून बातम्या द्याव्यात व कुठलाही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे करण्यात आले आहे. क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

दोन महिने गायब असलेले अनिल देशमुख अखेर ईडीच्या अटकेत, पीएंवर देखील झाली कारवाई

मध्यंतरी गायब असणारे अनिल देशमुख दोन दिवसांपूर्वी माध्यमांसमोर प्रकटले तर १ नोव्हेंबरला ईडीसमोर. त्यांच्या गायब होण्यामागचं कारण होत १०० कोटींच्या वसुली आदेश. अखेर आज या प्रकरणात त्यांना अटक झालीय.

ईडीसमोर हजर झाल्यावर त्यांची जवळपास १३ तास मॅरेथॉन चौकशी सुरू होती. त्यांच्यावर जे आरोप होते, त्या अनुषंगानं चौकशी करण्यात आली. आणि मगच त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. यापूर्वी देशमुखांच्या दोन सचिवांना अटक करण्यात आली होती.

अटक झाली असली तरी घटनाक्रम काय होता ? 

तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार,

निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचं युनिट हेड होते. मागच्या काही महिन्यात अनिल देशमुख जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा देशमुखांनी कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावलं होत.

दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायचे आदेश दिले होते. देशमुख वाझेंना म्हणाले होते की, मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये कलेक्ट केले, तरीसुद्धा महिन्याला ४० ते ५० कोटी रुपये जमा होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येऊ शकते.

देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे.

मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुसार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश देत होते. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते.

त्यांनी हे पत्र फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच नाही तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुद्धा पाठवलं होत. 

त्या पत्रानंतर मोठी खळबळ माजली. सीबीआयने २१ एप्रिलला अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह १० ठिकाणी छापे मारले होते. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले होते.

त्यानंतर २५ एप्रिलला सकाळी-सकाळी ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांसह ५ ठिकाणी छापेमारी केली होती. ही छापेमारी प्रामुख्यानं १०० कोटी वसुली तसेच बदल्यांसाठी पैसे घेण्यात आल्याच्या आरोपांनंतर या सगळ्या पैशाचं नेमकं झालं काय झालं? हवाला मार्फत ते बाहेर पाठवण्यात आले का? किंवा कोलकात्यातील शेल कंपन्यांच्या माध्यमातून त्याची गुंतवणूक केली गेली का? या सगळ्याच्या तपासासाठी केली होती.

त्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांना पहिलं समन्स बजावलं होतं. मात्र त्यांनी हजर राहण्यासाठी वेळ वाढवून मागितला.

त्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांना ताब्यात घेतलं. त्यांची जवळपास १० तास चौकशी केली, आणि त्यानंतर रात्री १२:३० वाजता दोघांना अटक करण्यात आली. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली असल्याचं ईडीने सांगितलं.

याच वकिलांचा रिमांड मिळण्यासाठी न्यायालयात सुनावणी सुरु असताना ईडीने अनिल देशमुख यांचं देखील नाव घेतलं होतं. त्यादिवशी ईडीचे वकील सुनिल गोन्सालवीस यांनी याबाबतचा सविस्तर कागदपत्रांसह न्यायालयात केलेल्या दाव्यानुसार,

माजी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याने बार, पब आणि ऑर्केस्ट्रामधून वसूल केलेले कोट्यवधी रुपये अनिल देशमुखांना दिले, कसे ते देखील ईडीने न्यायालयात सांगितले.

डिसेंबरमध्ये सचिन वाझेला ४० लाख रुपये गुडलक मनी देण्यात आले. त्यानंतर वाझेला मुंबई पोलिसांच्या झोन १ ते झोन ७ कडून १ कोटी ६४ लाख रुपये दिले गेले. सोबतचं बार, पब आणि ऑर्केस्ट्राद्वारे झोन ८ ते झोन १२ कडून २ कोटी ६३ लाख रुपये देण्यात आले. हे सर्व पैसे सचिन वाझेने अनिल देशमुख यांना देण्यात येणार असं सांगितलं.

याशिवाय देशमुख यांनी पोलिसांच्या बदल्यांमधूनही पैसे उकळले असा दावा ईडीने न्यायालयात केला होता. हा सगळा पैसा देशमुख यांनी दिल्लीतील पेपर कंपनीच्या माध्यमातून साई शिक्षण संस्थेकडे वळवला, पण हि कंपनी केवळ कागदावरच असून केवळ ट्रान्सफर एन्ट्री करण्याच्या कामासाठी वापरल्या जातात असा ईडीने आरोप केला आहे.

त्यानंतर देशमुख यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहण्यासाठी  समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र त्यांनी पत्र पाठवून हजर राहण्यास असमर्थता दर्शवली. 

या सगळ्या प्रकरणात अनिल देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

देशमुख चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते.  समन्स बजावून ही चौकशीला उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे अनिल देशमुख अटकेच्या भीतीने प्रत्यक्ष उपस्थिती टाळत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यानंतर तर ते गायबच झाले. आणि अखेर अचानक इतक्या महिन्यानंतर जगासमोर आले. आणि थेट ईडीच्या कार्यालयात गेले.

शेवटी अटक झालीच….

हे हि वाच भिडू

The post दोन महिने गायब असलेले अनिल देशमुख अखेर ईडीच्या अटकेत, पीएंवर देखील झाली कारवाई appeared first on BolBhidu.com.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

शाहरुख आणि गौरी आर्यनसाठी शोधत आहेत बॉडीगार्ड, आता आर्यनची घेतली जाणार विशेष काळजी

मुंबई । ड्रग्ज प्रकरणात अडकलेला बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आता त्याच्या घरी पोहोचला आहे. शाहरुख आणि गौरी खान आता त्यांचा मुलगा आर्यनच्या सुरक्षेबाबत खूप चिंतेत आहेत. यामुळे आता त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. शाहरुख आता आर्यनसाठी एका खाजगी बॉडीगार्ड शोधत आहे. जो नेहमी त्याची सुरक्षा करेल.

आर्यन खानचे प्रकरण ज्या पातळीवर गेले आहे त्यामुळे शाहरुख नाराज आहे. जर आर्यनसोबत वैयक्तिक बॉडीगार्ड असता तर परिस्थिती इतकी बिघडली नसती. त्याचा अंगरक्षक रवी सिंगप्रमाणेच शाहरुख आता लवकरात लवकर आर्यनसाठी बॉडीगार्ड ठेवण्याचा विचार करत आहे.

आर्यनच्या पुनरागमनानंतर शाहरुख आणि गौरीने त्याच्यासाठी एक नवीन रुटीन प्लॅन बनवला आहे जेणेकरून तो या धक्क्यातून बाहेर पडू शकेल. आर्यनला काही दिवस घराबाहेर पडण्याची परवानगीही दिली जाणार नाही कारण घराबाहेर चाहते आणि मीडियाची प्रचंड गर्दी जमली आहे.

याशिवाय आर्यनला कोणत्याही प्रकारे पार्टी किंवा सार्वजनिक ठिकाणी जाण्यापासून रोखले जाईल. आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझ जहाजावर छापा टाकून अटक केली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती.

एनसीबीने आर्यनवर ड्रग्जचा वापर आणि व्यापार केल्याचा आरोप केला आहे. यानंतर आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने अनेक अटींसह जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले होते. यामुळे त्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.

आता आर्यनची सर्व काळजी घेतली जाणार आहे. अनेकदा यामुळेच बॉडीगार्ड शोधला जात आहे. आर्यन तब्बल २८ दिवस जेलमध्ये होता. त्या काळात अनेक मोठ्या घडामोडी देखील समोर आल्या.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

न्युझिलंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान धोनी आणि शास्त्रींमध्ये राडा? फोटो होताय व्हायरल

यंदाच्या टी २० विश्वचषकात भारताला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सलग दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाल्यामुळे भारतीय संघाची आव्हाने वाढत आहे. रविवारी न्युझिलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे भारतीय संघाचा मार्ग खडतर झाला आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि मार्गदर्शक महेंद्र सिंग धोनी आहे. असे असूनही भारताच्या खराब कामगिरीमुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. तसेच माजी कर्णधार कपिल देव यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे.

भारत-न्युझिलंड यांच्यातल्या सामन्यादरम्यान धोनी आणि रवी शास्त्री यांच्यातील संभाषण लाईव्ह मॅचमध्ये कॅमेरामनने टीपले आहे. व्हायरल झालेल्या फोटोंवरुन धोनी आणि शास्त्री यांच्यात वाद होत असल्याची सांगितले जात आहे.

न्युझिलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांना धावांचा डोंगर उभा करणे शक्य झाले नाही. न्युझिलंड गोलंदाजांनी एकेका धावेसाठी भारतीय फलंदाजांना तरसवत असल्याचे दिसून येत होते. तसेच जबरदस्त गोलंदाजांमुळे फलंदाजांना पुन्हा तंबुत जावे लागले होते.

या सर्व गोष्टीमुळे धोनी प्रचंड चिडला होता आणि त्याने सामन्यादरम्यानच रवी शास्त्री यांच्याशी संवाद साधला होता. त्याचवेळी कॅमेरामननं त्यांच्याकडे कॅमेरा वळवला होता. तसेच धोनी आणि शास्त्री यांच्यात कोणतेही वाद झालेले दिसून आले नाही. ते फक्त फलंदाजांच्या कामगिरीमुळे नाराज झालेले दिसून आले.

न्युझिलंडविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीचा क्रम बदलणे भारताला महागात पडले. इशन किशन आणि लोकेश राहूल यांना सलामीवीर म्हणून पाठवण्यात आले. तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा तर चौथ्या क्रमांकावर विराट कोहली खेळला होता. पण सर्वच खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही. हार्दिंक पांड्या २३ आणि रविंद्र जडेजा नाबाद २६ धावांमुळे भारत ११० धावांचा स्कोर करु शकला. पण न्युझिलंडच्या जबरदस्त फलंदाजीमुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.

महत्वाच्या बातम्या-
मुलगा घरातून बाहेर पडताच सुनेला खोलीत बोलावायचा सासरा आणि करायचा ‘हे’ घाणेरडे कृत्य
मोठी बातमी! १०० कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक
सुनील दत्त यांच्याकडे १५०० रूपयांवर काम करायचे शक्ती कपूर, पण मर्सिडीज ठोकली व नशीब पालटले

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मुलगा घरातून बाहेर पडताच सुनेला खोलीत बोलावायचा सासरा आणि करायचा ‘हे’ घाणेरडे कृत्य

देशात एकाच कुटूंबात घरातली घरात अनेक धक्कादायक प्रकार समोर येतात. आता देखील असाच एक प्रकार समोर आला आहे. लखनऊमध्ये एका सुनेने आपल्या सासऱ्यावरतीच बलात्काराचा आणि विनयभंगाचा आरोप लावला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

तिचा नवरा घरााबाहेर पडला की, तिचा सासरा तिच्यासोबत अश्लील कृत्य करत असल्याचे सुनेने सांगितले आहे. आपल्याच मुलाच्या बायकोवर घाणेरडी नजर ठेवण्याचा किळसवाणा प्रकार एका बापाने केला आहे. यामुळे या प्रकरणाची सगळीकडे चौकशी सुरू आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पिलीभीतमधून हे प्रकरण उघडकीस आले आहे. या नराधमाने सासरा आणि सून यांच्यातील नात्याला कलंक लावला आहे. मुलगा गेल्यावर सून घरात एकटी असल्याचा फायदा सासरा घेत असत. तिला जवळ बोलावून तिच्यासोबत जबरदस्ती केली जात होती. तिला सतत त्रास दिला जात होता.

या सुनेचा आरोप आहे की, एके दिवशी तिचा नवरा निघून गेल्यावर सासऱ्याने तिला खोलीत बोलावून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रोजच त्याने बलात्कार केला. तिने पतीला सांगितले मात्र पतीने देखील तिच्याकडे लक्ष दिले नाही. ती पोलिसांकडे गेली मात्र त्याठिकाणी देखील तिला न्याय मिळाला नाही.

त्यानंतर याप्रकरणी पीडितेने एसपीकडे तक्रार दाखल केली. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेचे आई-वडील कोतवाली येथे पोहोचले आणि न्यायाची याचना केली. पीडितेने एसपींना तक्रार पत्र देऊन चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांकडे तिने अनेकदा तक्रार केली. मात्र काही फायदा झाला नाही. सासऱ्याने मात्र तिला अनेकदा बोलावून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. तिचा नवरा गवंडी काम करतो. तो घराबाहेर जाताच सासरा हे कृत्य करत होता.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

अनिल देशमुखांना ईडीकडून अटक; नितेश राणेंच्या 'या' ट्वीटचा नेमका अर्थ काय?

मुंबईः राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री (Anil Deshmukh) यांना अखेर सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. देशमुख यांची सोमवारी तब्बल १३ तास ईडीने (ED) चौकशी केली. त्यानंतर देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. देशमुख यांच्या अटकेनंतर राज्यात पुन्हा एकदा शिवसेना- भाजप यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. देशमुखांच्या अटकेनंतर भाजप नेते () यांनी खोचक ट्वीट केलं आहे. 'अनिल देशमुख हॅपी दिवाळी आणि अनिल परब मेरी ख्रिसमस? स्पेशल थँक्स टू नवाब मलिक आणि संजय राऊत,' असं ट्वीट नितेश राणेंनी केलं आहे. नितेश राणेंच्या या ट्वीटची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसंच, या ट्वीटचा नेमका अर्थ काय?, असेही सवाल उपस्थित होत आहेत. अनिल देशमुखांनंतर अनिल परब हे ईडीच्या रडारवर असतील का?, असे सवाल सध्या उपस्थित होत आहेत. वाचाः दरम्यान, सोमवारी अनिल देशमुख यांना रात्री १२च्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेल्या अनिल देशमुख हे सोमवारी प्रथमच समोर आले होते. व ईडीच्य चौकशीसाठी सहकार्य करणार, असं म्हणाले होते. यावेळी देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकील उपस्थित होते. जवळपास १३ तास अनिल देशमुख यांची चौकशी झाली आणि सायंकाळी साडेसात वाजता दिल्लीतील काही अधिकारी ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर पुन्हा देशमुख यांची चौकशी झाली आणि अखेर रात्री त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. वाचाः

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मोठी बातमी! १०० कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेरीस ईडीने अटक केली आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते गायब होते. अटक टाळण्यासाठी देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती.

तब्बल १२ तासाच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अटक केली आहे. रात्री १ च्या सुमारास त्यांना अटक झाली. मंगळवारी त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पाच समन्स पाठवल्यानंतर अनिल देशमुख सोमवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात वकीलासह हजर झाले होते.

देशमुख यांच्यावर १०० कोटींची वसुली केल्याचा आरोप आहे. मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेखी पत्र देऊन हे आरोप केले होते. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल करून अनिल देशमुख यांना ५ जून रोजी पहिले समन्स पाठवले होते.

या कारवाईने महाविकास आघाडी सरकारच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. आजपर्यंत ‘ईडी’ने चार वेळा देशमुख यांना समन्स पाठवले होते. मात्र त्यांनी वकिलांच्या मार्फत उत्तर देत कारवाईचा तपशिल मागितला होता. आता मात्र त्यांना अटक झाल्याने विरोधकांना बळ मिळणार आहे.

आज सकाळी त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेले जाईल. यानंतर सकाळी अकराच्या सुमारास त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. ईडीचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीहून मुंबईच्या ईडी कार्यालयात दाखल झाली आहेत. अटकेपूर्वी अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आल्याचेही वृत्त आहे.

या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या सर्व आरोपींचे जबाबही देशमुख यांच्यासमोर ठेवण्यात आले. मात्र देशमुख यांनी कोणत्याही प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देता आले नाही. ते फक्त आरोप फेटाळत राहिले. पण तपासाच्या आधारे ईडीने त्याला अटक केली.