अनिल देशमुखांना ईडीकडून अटक; नितेश राणेंच्या 'या' ट्वीटचा नेमका अर्थ काय?

मुंबईः राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री (Anil Deshmukh) यांना अखेर सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. देशमुख यांची सोमवारी तब्बल १३ तास ईडीने (ED) चौकशी केली. त्यानंतर देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. देशमुख यांच्या अटकेनंतर राज्यात पुन्हा एकदा शिवसेना- भाजप यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. देशमुखांच्या अटकेनंतर भाजप नेते () यांनी खोचक ट्वीट केलं आहे. 'अनिल देशमुख हॅपी दिवाळी आणि अनिल परब मेरी ख्रिसमस? स्पेशल थँक्स टू नवाब मलिक आणि संजय राऊत,' असं ट्वीट नितेश राणेंनी केलं आहे. नितेश राणेंच्या या ट्वीटची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसंच, या ट्वीटचा नेमका अर्थ काय?, असेही सवाल उपस्थित होत आहेत. अनिल देशमुखांनंतर अनिल परब हे ईडीच्या रडारवर असतील का?, असे सवाल सध्या उपस्थित होत आहेत. वाचाः दरम्यान, सोमवारी अनिल देशमुख यांना रात्री १२च्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेल्या अनिल देशमुख हे सोमवारी प्रथमच समोर आले होते. व ईडीच्य चौकशीसाठी सहकार्य करणार, असं म्हणाले होते. यावेळी देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकील उपस्थित होते. जवळपास १३ तास अनिल देशमुख यांची चौकशी झाली आणि सायंकाळी साडेसात वाजता दिल्लीतील काही अधिकारी ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर पुन्हा देशमुख यांची चौकशी झाली आणि अखेर रात्री त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. वाचाः

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मोठी बातमी! १०० कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेरीस ईडीने अटक केली आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते गायब होते. अटक टाळण्यासाठी देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती.

तब्बल १२ तासाच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अटक केली आहे. रात्री १ च्या सुमारास त्यांना अटक झाली. मंगळवारी त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पाच समन्स पाठवल्यानंतर अनिल देशमुख सोमवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात वकीलासह हजर झाले होते.

देशमुख यांच्यावर १०० कोटींची वसुली केल्याचा आरोप आहे. मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेखी पत्र देऊन हे आरोप केले होते. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल करून अनिल देशमुख यांना ५ जून रोजी पहिले समन्स पाठवले होते.

या कारवाईने महाविकास आघाडी सरकारच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. आजपर्यंत ‘ईडी’ने चार वेळा देशमुख यांना समन्स पाठवले होते. मात्र त्यांनी वकिलांच्या मार्फत उत्तर देत कारवाईचा तपशिल मागितला होता. आता मात्र त्यांना अटक झाल्याने विरोधकांना बळ मिळणार आहे.

आज सकाळी त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेले जाईल. यानंतर सकाळी अकराच्या सुमारास त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. ईडीचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीहून मुंबईच्या ईडी कार्यालयात दाखल झाली आहेत. अटकेपूर्वी अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आल्याचेही वृत्त आहे.

या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या सर्व आरोपींचे जबाबही देशमुख यांच्यासमोर ठेवण्यात आले. मात्र देशमुख यांनी कोणत्याही प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देता आले नाही. ते फक्त आरोप फेटाळत राहिले. पण तपासाच्या आधारे ईडीने त्याला अटक केली.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

ठाकरे सरकारला मोठा धक्का; अनिल देशमुख यांच्या अटकेआधी नेमकं काय घडलं?

मुंबई: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला सर्वात मोठा धक्का बसला आहे. खंडणी वसुलीच्या आरोपानंतर गृहमंत्रीपद सोडावे लागलेले ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांना ईडीने अटक केली आहे. देशमुख यांच्या अटकेआधी नाट्यमय घडामोडी घडल्या. ( ) वाचा: समोर आल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. ही स्फोटकं ठेवण्यामागे आणि ज्या स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवली होती त्या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येमागे पोलीस अधिकारी याचा हात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात वाझेला अटक करण्यात आले व नंतर सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्याचदरम्यान, अनिल देशमुख यांनी यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली होती. त्यानंतर परमबीर यांनी थेट देशमुख यांना लक्ष्य केले. त्यांच्याविरुद्ध मुख्यमंत्री यांना पत्र लिहित देशमुख हे सचिन वाझे याच्याकरवी खंडणी वसुली करतात. दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट त्यांनी दिले आहे, असा आरोप परमबीर यांनी केला होता. याच प्रकरणात परमबीर यांनी हायकोर्टात धाव घेतली असता हायकोर्टाने सीबीआयमार्फत चौकशीचे निर्देश दिले होते. वाचा: देशमुख यांनी त्यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरू झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर देशमुख यांच्या मुंबई तसेच नागपूर येथील ठिकाणांवर तपास यंत्रणांकडून अनेकदा छापे टाकण्यात आले. देशमुख यांचे स्वीय सहायक आणि स्वीय सचिव यांनाही अटक करण्यात आली. दरम्यान, ईडीकडून पाचवेळा समन्स बजावण्यात येऊनही देशमुख चौकशीसाठी हजर झाले नव्हते. ते नॉट रिचेबल होते. त्यातच तक्रारदार परमबीर सिंग हे सुद्धा गायब झाले आहेत. असे असतानाच सोमवारी देशमुख अचानक प्रकटले. देशमुख यांनी एक खुलं पत्र व व्हिडिओ संदेश ट्वीटरवर पोस्ट केला व आपण ईडी कार्यालयात हजर होत असल्याचं जाहीर केलं. 'सत्यमेव जयते' म्हणत मी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत, असा दावा त्यांनी केला. देशमुख यांची ईडी कार्यालयात तब्बल १२ तास चौकशी चालली. त्यानंतर मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास त्यांच्या अटकेचे वृत्त हाती आले. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारसाठी गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळातील हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

अनिल देशमुख यांच्यानंतर 'या' मंत्र्याचा नंबर; किरीट सोमय्या यांचा दावा

मुंबई: खंडणी वसुली व मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अखेर सक्तवसुली संचालनालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांना सोमवारी मध्यरात्रीनंतर अटक केली. या कारवाईवर भाजपमधून माजी खासदार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सोमय्या यांनी यात मोठा दावा केला आहे. ( ) वाचा: 'शंभर कोटींपेक्षा जास्त रकमेची वसुली, गैरव्यवहार आणि मनी लाँडरिंग प्रकरणात अखेर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर आता यांचा नंबर लागणार आहे', अशाप्रकारचे ट्वीट किरीट सोमय्या यांनी अटकेच्या बातम्या आल्यानंतर आठव्या मिनिटाला केलं आहे. साधारण दीड वाजताच्या सुमारास देशमुख यांना अटक करण्यात आल्याची बातमी ब्रेक झाली होती. त्यानंतर लगेचच सोमय्या यांनी ट्वीटसह व्हिडिओ पोस्ट करत महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं. अनिल देशमुख यांच्या अटकेने मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांचे टेन्शन आता वाढणार आहे. दरमहा १०० कोटींची जी वसुली येत होती त्यातील पवार यांच्याकडे किती पैसे पोहचते व्हायचे आणि ठाकरेंकडे किती जायचे, याचे उत्तर आता द्यावे लागणार आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. दरम्यान, अनिल देशमुख सोमवारी नाट्यमयरित्या ईडीसमोर हजर झाले होते. देशमुख गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल होते. त्यांना ईडीकडून वारंवार समन्स पाठवण्यात येऊनही ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते. अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. असे असतानाच ट्वीटरच्या माध्यमातून आपण आज ईडी कार्यालयात हजर होत असल्याचे देशमुख यांनी सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास जाहीर केले. ट्वीटरवर व्हिडिओ संदेश व खुलं पत्र जारी करत निर्दोषत्वाचा दावा त्यांनी केला व निष्पक्ष चौकशीची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर ईडी कार्यालयात दाखल झालेल्या देशमुख यांची तब्बल १२ तास चौकशी चालली व या चौकशीअंती त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

नवाब मलिक यांचे हल्ले थांबेनात; आज नवा गौप्यस्फोट करण्याची शक्यता!

मुंबई: मुंबईतील प्रकरणावरून एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणारे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी सोमवारी विरोधी पक्षनेते यांना लक्ष्य केले. त्यानंतर फडणवीस यांनीही प्रतिआव्हान देत, मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, असा इशारा दिला असतानाच मलिक हे मंगळवारी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत आहेत. ( ) वाचा: शिवसेना-भाजप युती तुटली व राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली त्यादरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर आरोपांचे साखळी हल्ले केले होते. राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेतृत्वावर निशाणा साधायचे. देशभर त्याची चर्चा व्हायची. त्याचाच अवलंब सध्या नवाब मलिक यांनी केल्याचे दिसत आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण समोर आल्यानंतर मलिक हे गेले काही दिवस दररोज पत्रकार परिषद घेऊन एनसीबीने क्रूझवर केलेली कारवाई, एनसीबीची एकंदर कार्यपद्धती यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करत आहेत. त्यात सोमवारी मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोर्चा वळवला. वाचा: नदी वाचवा अभियानांतर्गत एक रिव्हर अँथम प्रदर्शित करण्यात आलं होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एका संस्थेमार्फत हा उपक्रम राबवला गेला होता. हे अँथम आणि सोनू निगमने गायले होते. या अँथमचा फायनान्स हेड जयदीप चंदूलाल राणा हा होता. हाच जयदीप राणा ड्रग तस्करी प्रकरणी सध्या अटकेत असून साबरमती कारागृहात आहे. एका राजकीय विश्लेषकाने दिलेल्या या माहितीवर बोट ठेवत मलिक यांनी थेट फडणवीस यांना लक्ष्य केले. फडणवीस यांचे ड्रग्ज माफियांशी संबंध आहेत. त्यांच्या आशीर्वादानेच मुंबईत ड्रग्जचा धंदा चालला आहे, असे गंभीर आरोप मलिक यांनी केले. त्यानंतर फडणवीस यांनी लगेचच पत्रकार परिषद घेत मलिक यांचे आरोप फेटाळले व प्रतिआरोप केले. मलिक यांचा लवंगी फटाका होता, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे. मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करणार आहे, असा थेट इशाराच फडणवीस यांनी दिला आहे. हे आव्हान मलिक यांनीही स्वीकारले असून फडणवीस यांना टॅग करत 'है तैयार हम', असे ट्वीट मलिक यांनी केले आहे. त्यानंतर आता मंगळवारी सकाळी ९ वाजता मलिक हे कुर्ला येथे पत्रकार परिषद घेणार असून ते कोणता नवा धमाका करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

आर्यन खान प्रकरणात नवा धमाका; सॅम डिसूझाने 'ही' नावे केली उघड

मुंबई: ' याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नव्हते. त्यामुळेच मी माझ्या ओळखी वापरून मध्यस्थी करण्यास तयार झालो होतो. या सर्वात हा फ्रॉड निघाला. तो यांच्या नावाचा वापर करून अभिनेता याच्यासोबत डील करू पाहत होता. मात्र, मीच त्याचा डाव उधळला', असा दावा करत सॅम डिसूझा याने क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 'मी जे सांगत आहे ते सगळं खरं आहे. माझे सीडीआर पोलिसांनी तपासावे. यात मी जराही दोषी नाही', असे नमूद करत मुंबई पोलिसांना तपासात सहकार्य करणार असल्याचेही सॅमने सांगितले. ( Latest Update ) वाचा: क्रूझ ड्रग्ज पार्टीबाबत मूळ खबर याने दिली होती. किरण गोसावी आणि मनीष भानुशाली त्याच्या संपर्कात होते. तिथून ही माहिती एनसीबीपर्यंत पोहचली. क्रूझवरील छाप्यात शाहरुखचा मुलगा आर्यनला ताब्यात घेतल्याचं २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर मला कळलं. आर्यनकडे ड्रग्ज सापडलं नसल्याने त्याची सुटका केली पाहिजे, असे किरण गोसावीने मला सांगितले. त्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिच्याशी संपर्क केला गेला. नंतर मी किरण गोसावीसह ददलानी व चिकी पांडे नावाच्या व्यक्तीला पहाटे साडेचार वाजता लोअर परळ भागात भेटलो, असे सॅमने सांगितले. वाचा: किरण गोसावीचा खोटेपणा नंतर माझ्या लक्षात आला. त्याच्या मोबाइलमध्ये प्रभाकर साईल याचा नंबर समीर वानखेडे नावाने सेव्ह होता. ट्रू कॉलरवर मला ते दिसले. त्यानंतर या कामासाठी जी ५० लाखांची रक्कम घेतली गेली होती ती गोसावीकडे परत मागितली. त्याने ३८ लाख दिले. प्रभाकरकडून ५ लाख आले. बाकीची रक्कम माझ्या एका मित्राने दिली व ५० लाख रुपये शाहरुखच्या टीमकडे परत करण्यात आले, असा दावा सॅमने केला. गोसावी हा समीर वानखेडे यांच्या नावाचा गैरवापर करत होता. वानखेडे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असेही सॅम म्हणाला. सुनील पाटील याच्याशी माझा बिझनेसबाबत संपर्क असतो. तो पॉवर ब्रोकर आहे. मूळचा धुळ्याचा असलेला सुनील दिल्ली व गुजरातमध्ये वास्तव्याला असतो. अनेक राजकारण्यांशी त्याचे चांगले संबंध आहेत. या प्रकरणात चीटिंग झाल्यानंतर मी त्यालाही जाब विचारला असा दावा, सॅमने केला. एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी माझा थेट संपर्क नाही. मात्र ड्रग्जबाबत काही माहिती मिळाल्यास मी ती कोणाच्यातरी माध्यमातून एनसीबीपर्यंत पोहचवत असतो, असेही सॅमने सांगितले. सॅम डिसूझा याने एबीपी माझा वृत्तवाहिनीला ही माहिती दिली. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप; अनिल परब म्हणाले...

मुंबई: ही सर्वसामान्य माणसांची जीवनवाहिनी आहे. दिवाळीच्या तोंडावर प्रवाशी जनतेची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी तसेच जनतेची एसटीवरील विश्वासार्हता जपण्यासाठी अघोषित संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर तातडीने रुजू व्हावे, जनतेची एसटीशी असलेली नाळ तुटू देऊ नका, असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. यांनी केले. दिवाळीनंतर सकारात्मक चर्चेचे आश्वासनही परब यांनी दिले आहे. ( ) वाचा: ' सणाच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याचे वेतन नोव्हेंबर महिन्याच्या १ तारखेला म्हणजेच दिवाळीपूर्वी देण्याची जाहीर केले होते. त्यानुसार सुधारित महागाई व घरभाडे भत्त्यासह ऑक्टोबर २०२१ चे वेतन त्याचबरोबर दरवर्षी दिली जाणारी दिवाळी भेट सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. राहिलेल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक आहे. यावर दिवाळीनंतर चर्चा करण्यात येणार आहे', असे अनिल परब यांनी नमूद केले. वाचा: गेली दोन वर्षे महामारीमुळे एसटी महामंडळ प्रचंड आर्थिक अडचणीत असतानादेखील आतापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले आहे. सध्या ८५ टक्के आगारातील वाहतूक सुरुळीत सुरु असून उर्वरित १५ टक्के आगारातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही विस्कळीत वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. तेव्हा संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आपापल्या कामावर रूजू व्हावे व दिवाळी सणादरम्यान सर्वसामान्य जनतेची गैरसोय टाळावी, असेही परिवहनमंत्री परब यांनी सांगितले. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटींचे डील?; सॅम डिसूझाने केला मोठा गोप्यस्फोट

मुंबई: मुंबई प्रकरणात खंडणीखोरीचा आरोप करण्यात आल्यानंतर अनेक बाबी समोर येत आहेत. त्यात आता पंच साक्षीदार प्रभाकर साईल याच्या प्रतिज्ञापत्रात ज्या सॅम नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आला आहे तो समोर आला असून त्याने जी माहिती दिली आहे त्यातून या प्रकरणाला नवी कलाटणी लागली आहे. ( ) वाचा: क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता याचा मुलगा याला अटक करण्यात आली होती. त्याची तब्बल २६ दिवसांनंतर जामिनावर सुटका झाली आहे. दरम्यान, आर्यन याला सोडण्यासाठी २५ कोटींची मागणी करण्यात आली होती आणि त्यातील ८ कोटी रुपये एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मिळणार होते, असा दावा याच प्रकरणातील पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने केला होता. आणि सॅम या दोघांत याबाबत बोलणं झाल्याचा प्रभाकरचा दावा आहे. यातील किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या अन्य प्रकरणात अटक केली असताना आता सॅम डिसूझा समोर आला आहे. वाचा: किरण गोसावी हा फ्रॉड माणूस असल्याचे सांगत डिसूझा याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. सुनील पाटील या व्यक्तीचा मला फोन आला होता. क्रूझ ड्रग्ज पार्टीशी संबंधित महत्त्वाची माहिती आहे आणि एनसीबीशी कॉन्टॅक्ट कर असं त्याने मला सांगितलं. पाठोपाठ मला किरण गोसावीचा फोन आला. मला यात पडायचं नव्हतं. त्यामुळे मी काही अधिकाऱ्यांचे नंबर त्याला दिले. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास या पार्टीबाबत अपडेट्स येणार असल्याचा फोन परत गोसावीने केला. तेव्हा मी किरण गोसावीला भेटलो. नंतर मला सुनील पाटीलचा फोन आला. यात कुणी सेलिब्रिटीचा मुलगा आहे का चेक कर, असे त्याने मला सांगितले, असे नमूद करत सॅम याने घटनाक्रम सांगितला आहे. वाचा: आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज सापडलेलं नाही. तो निर्दोष आहे. त्यामुळे त्याला मदत केली पाहिजे, असे मला गोसावीने सांगितले. केस क्लीयर असल्याने मी मध्यस्थी करण्यास तयार झालो. गोसावीने आर्यनचा व्हॉइस कॉलही रेकॉर्ड केला होता. 'पापा, आयएम अॅट एनसीबी' असं त्यात आर्यन बोलत आहे, असा दावा सॅमने केला. त्याच रात्री मी, किरण गोसावी, पूजा ददलानी आणि चिकी पांडे अशी भेट झाल्याचा दावाही सॅम याने केला. या प्रकरणात ५० लाख रुपये टोकन अमाउंट घेण्यात आली होती. मात्र, चीटिंग होतेय असे लक्षात आल्यावर ही रक्कम मी परत करायला लावली. गोसावीकडून ३८ लाख परत आले आणि प्रभाकर साईलकडून ५ लाख आले. त्यात ८ लाख रुपये घालून ५० लाख रुपये शाहरुख खान याच्या माणसांपर्यंत परत पोहचवण्यात आले. यात सुनील पाटील मध्यस्त होता. मी फक्त त्याच्या संपर्कात होतो, असेही सॅम म्हणाला. सुनील पाटील हा पॉवर ब्रोकर असून त्याचे राजकारणी लोकांशी चांगले संबंध आहेत. ते मूळचे धुळ्याचे असून दिल्ली आणि गुजरातमध्ये त्याचं वास्तव्य असतं. या पार्टीची टीपही पाटील याच्याकडूनच मला मिळाली होती. यात माझा काहीही संबंध नाही, असेही सॅमने सांगितले. गोसावी हा फ्रॉड माणूस आहे आणि वेळ आल्यावर मी सगळी माहिती उघड करेन, असेही सॅमने सांगितले. सॅमने एनसीबीचे अधिकारी विश्वविजय सिंग यांचेही नाव घेतले. सॅम डिसूझा याने एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना ही खळबळजनक माहिती दिली. डीलबाबत मला माहीत नाही शाहरुखसोबत डील झाले होते की नाही मला माहीत नाही. मात्र, किरण गोसावी हा यात चीटिंग करत होता. त्याने सुनील पाटील याच्यामार्फत संपर्क साधून व्यवहार केला होता. जेव्हा मला हा खोटेपणा कळला तेव्हा मी मध्यस्थीस नकार दिला. त्यानंतर मीच पैसे परत करायला लावले, असा दावा सॅम याने केला. मी प्रतिज्ञापत्र सादर करणार असून पोलीस तपासास सहकार्य करणार असल्याचेही सॅमने सांगितले. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

अनिल देशमुख यांचं निवेदन; 'माझं आयुष्य म्हणजे खुली किताब, त्यात...'

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी आज अखेर समोर येत आपली बाजू नव्याने मांडली आहे. देशमुख यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यासोबतच एक खुलं पत्रही ट्वीटरवर पोस्ट केलं आहे. 'सत्यमेव जयते' म्हणत यात देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्याचवेळी तपास यंत्रणेकडून संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशीची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. ( ) वाचा: अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला. त्यांनी याला दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांनी केला होता. या आरोपाची हायकोर्टाच्या निर्देशावरून व मार्फत चौकशी सुरू आहे. याप्रकरणात चौकशीसाठी ईडीने वारंवार समन्स बजावूनही देशमुख चौकशीसाठी हजर राहत नसल्याने व ते नॉट रीचेबल असल्याने अनेक तर्क लावले जात होते. असे असतानाच आज अचानक देशमुख समोर आले. ट्वीटरच्या माध्यमातून आपले निवेदन जारी करताना देशमुख तडक ईडी कार्यालयात हजर झाले. वाचा: देशमुख यांनी आज जे खुलं पत्र लिहिलं आहे त्यात आपली बाजू मांडताना तक्रारदार परमबीर सिंग यांच्याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. 'मी एका समर्पित भावनेने आणि कायद्याच्या चौकटीत राहून आयुष्य जगलो आहे. सार्वजनिक जीवनात वावरत असताना आजतगायत माझ्यावर कोणतेही आरोप झाले नाहीत. माझे आयुष्य म्हणजे एक खुली किताब आहे. माझ्याकडे लपवून ठेवण्यासारखे काहीही नाही', असे नमूद करताना देशमुख यांनी परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्याकडे बोट दाखवले. वाचा: माझ्यावर जे आरोप करण्यात आले आहेत ते धादांत खोटे आहेत. हे जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. यात कुणाचे तरी वेस्टेड इंटरेस्ट आहेत. मुख्य म्हणजे जे तक्रार करणारे आहेत त्यांची नैतिकता आणि विश्वासार्हता तपासण्याची गरज आहे. खंडणीची वेगवेगळी रॅकेट, फ्रॉड केसेस, इतकंच काय खून प्रकरणात ही व्यक्ती सामील आहे. यातली जी मुख्य व्यक्ती आहे ती तर पोलीस आयुक्त राहिली आहे आणि सध्या वॉन्टेड आरोपी आहे, याकडे लक्ष वेधत निष्पक्ष चौकशीची अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली. मी संविधान मानणारा भारताचा नागरिक असून ईडी करत असलेल्या चौकशीला सामोरा जात आहे. ईडीच्या तपासाला मी संपूर्ण सहकार्य करणार आहे. केवळ चौकशी निष्पक्षपातीपणे व्हावी इतकीच अपेक्षा आहे, असे देशमुख यांनी नमूद केले. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

राज्यात थंडीची चाहुल; पावसाचा अंदाज असतानाच 'या' शहरांत...

नागपूर: राज्यातील अनेक भागांत हवामानात गारठा जाणवू लागला आहे. शहर आणि विदर्भात आता हळूहळू आल्हाददायक थंडीला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरातील तापमानात घसरण होते आहे. सोमवारी शहरात १३.४ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यातील येथे सर्वात कमी १२.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल नागपूर हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड शहर ठरले. ( ) वाचा: नागपूरखालोखाल विदर्भात यवतमाळात १४, येथे १४.१ अंश किमान तापमानाची नोंद करण्यात आली. वाशीम येथे १९ अंश इतक्या सर्वाधिक किमान तापमानाची नोंद करण्यात आली. शहरातील वातावरण आता पूर्णपणे बदलले असून पाऱ्यात घसरण होऊ लागली आहे. रविवारच्या तुलनेत शहरातील तापमानात १.३ अंशांची घसरण झाली. शहरातील तापमान हे सरासरी किमान तापमानापेक्षा ४.२ अंशांनी कमी होते. पुढील दोन दिवस शहरात आल्हाददायक थंडी असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मात्र, थोडेफार ढगाळ वातावरण असल्याने तापमानात एक-दोन अंशांनी वाढसुद्धा होऊ शकते. वाचा: विदर्भात ३ व ४ नोव्हेंबर रोजी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. चंद्रपूर, व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या फुलक्या सरींची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नसली तरीसुद्धा थोडेफार ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तरीही दिवाळीनंतर विदर्भातील वातावरण परत एकदा पूर्णपणे कोरडे होईल व तापमानात हळूहळू घसरण होणार असून खऱ्या अर्थाने थंडी सुरू होणार असल्याचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

हृदयद्रावक: आजारी पत्नीचा मुंबईत मृत्यू; घरात पतीची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव: न्युमोनियाने ग्रस्त असलेल्या पत्नीचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी बातमी कळताच येथे पतीने गळफास घेत आत्महत्या केली. आज सकाळी १० वाजता ही हृदयदावक घटना घडली. (वय ४७, रा. नागसेननगर, रामेश्वर कॉलनी) व पत्नी मीराबाई असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. ( ) वाचा: सोनवणे हे मुळचे लाडली (ता. धरणगाव) येथील रहिवासी आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली करून ते उदरनिर्वाह करीत होते. सोनवणे दाम्पत्यास अनिकेत (वय १९) नावाचा एक मुलगा आहे. मीराबाई यांना न्युमोनिया झाल्याचे निदान झाले. जळगावात उपचार केल्यानंतरही प्रकृती सुधारली नाही. अखेर त्यांना येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले. काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. सोबत मुलगा अनिकेत होता. सोनवणे एकटेच घरी होते. दरम्यान, रविवारी रात्री मीराबाई यांना मृत्यू झाला. आज दुपारी मृतदेह घरी आणल्यानंतर नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांना याबाबत माहिती देण्याचे ठरले होते. मीराबाई यांना मृतदेह घरी आणला जाणार असल्याने आज सकाळी १० वाजता सोनवणे यांचे भाऊ सुनील हे घरातील सामानाची आवराआवर करण्यासाठी सोनवणे यांच्या घरी गेले. तत्पूर्वीच सोनवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सुनील यांना दिसून आले. वाचा: सोनवणे यांना खाली उतरवून भाऊ सुनील व इतरांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. सायंकाळी पाच वाजता सोनवणे दाम्पत्यावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक; १३ तासांच्या चौकशीनंतर EDची कारवाई!

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री () यांना अखेर सक्तवसुली संचालनालयाने () अटक केली आहे. देशमुख यांची सोमवारी १३ तास ईडीकडून चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर अखेर रात्री उशिरा देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले अनिल देशमुख हे सोमवारी प्रथमच समोर आले आणि सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात पोहोचले होते. यावेळी देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकीलही उपस्थित होते. दिवसभर अनिल देशमुख यांची चौकशी झाली आणि सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दिल्लीतील काही अधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर पुन्हा देशमुख यांची चौकशी झाली आणि अखेर रात्री उशिरा त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अनिल देशमुख का सापडले अडचणीत? मनी लॉण्ड्रिंग व खंडणी वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात अनिल देशमुख हे गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या चौकशीच्या रडारवर होते. मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. त्याशिवाय, त्यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचाही आरोप होता. या आरोपानंतर विरोधकांनी सरकारला लक्ष्य केल्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ईडीनं त्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली होती. देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील घरे, कार्यालये व अन्य संस्थांवर ईडीनं अनेक वेळा धाडी टाकल्या होत्या. देशमुख यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्सही बजावण्यात आलं होतं. मात्र, करोना, वय आणि आजारपणाचं कारण देत सुरुवातीला त्यांनी चौकशीला हजर राहण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यानंतरही ईडीनं त्यांना चार वेळा समन्स बजावलं. पण ते ईडीसमोर हजर झाले नव्हते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शोध घेऊनही ते सापडत नव्हते. त्यावरून प्रचंड गदारोळ उडाला होता. माजी गृहमंत्रीच गायब असल्यामुळं राज्य सरकारचीही कोंडी झाली होती.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेत वर्षभर अत्याचार; आरोपीला अटक

: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्‍यावर वर्षभर अत्‍याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी संतोष कचरू जाधव याला सोमवारी अटक करण्यात आली. तसंच त्याला गुरुवारपर्यंत (४ नोव्हेंबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही. पी. कदम यांनी दिले. या घटनेबाबत १५ वर्षीय पीडितेच्‍या आईने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, घटनेच्‍या काही दिवसांपूर्वी फिर्यादी व पीडिता या दोघी फिर्यादीच्‍या बहिणीकडे राहण्‍यासाठी गेल्‍या होत्‍या. ७ ऑगस्‍ट २०२१ रोजी फिर्यादी व तिच्‍या बहिणीची सून या शेतात असता घरी फिर्यादीची मुलगी व बहीण अशा दोघीच होत्‍या. दुपारी १२ वाजेच्‍या सुमारास पीडिता ही कपडे वाळू घालण्‍यासाठी बाहेर गेली ती घरी परतलीच नाही. त्‍यामुळे फिर्यादीच्‍या बहिणीने ही बाब फिर्यादीला सांगितली. पीडितेचा शोध घेऊनही ती न सापडल्याने करमाड पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. तपासादरम्यान पीडिता ढोकसांवगी (ता. शिरुर, जि. पुणे) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पीडितेला १८ ऑक्टोबर २०२१ ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता, आरोपी संतोष कचरू जाधव (२४, रा. देवीभोएरे, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याने वर्षभरापूर्वी लग्नाचे आमिष दाखवून तिला इसताईनगर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे पळून आणले. त्‍यानंतर जांभळी (जि. अहमदनगर) येथे नेले. तिथे पाच महिने थांबल्यानंतर आरोपीने पीडितेला स्‍वत:च्‍या गावी आणले. यादरम्यान आरोपीने पीडितेवर वारंवार अत्‍याचार करुन तिला सहा महिन्‍यांची गर्भवती केले, असा जबाब पीडितेने दिला. प्रकरणाचा तपास बाकी आरोपीला सोमवारी न्‍यायालयात हजर करण्‍यात आले. या प्रसंगी, आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे, तसेच गुन्‍ह्यात आरोपीला कुणी मदत केली व आरोपीने पीडितेला कुठे-कुठे नेले, याचादेखील तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती सहायक लोकाभियोक्ता आर. सी. कुलकर्णी यांनी न्‍यायालयात केली. ही विनंती ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

bjp rally in jalgoan: भाजपाच्या मोर्चात जळगाव जिल्हापरिषद अध्यक्षांना भोवळ

म.टा. प्रतिनिधी, जळगाव भाजपच्या (BJP) वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात काढण्यात आलेल्या मोर्चात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा () यांना भोवळ आली. त्यांना तातडीने चारचाकीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेवेळी हा प्रकार घडला. (jalgaon zilla parishad president got dizzy in the rally organised on farmer issue) शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सोमवारी दुपारी भाजपच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी दुपारी १२ वाजतांची वेळ देण्यात आलेली होती. मात्र , नियोजित वेळेपेक्षा तब्बल ३ तास उशिराने म्हणजेच, दुपारी ३ वाजता हा मोर्चा सुरू झाला. क्लिक करा आणि वाचा- मोर्चात सहभागी झालेली भाजपची नेतेमंडळी एका ट्रॅक्टरवर उभे राहून मोर्चात सहभागी शेतकरी व कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. याचवेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील या देखील नेत्यांसोबत ट्रॅक्टरवर उभ्या होत्या. नेते () यांचे भाषण सुरू असताना रंजना पाटील अचानक भोवळ येऊन ट्रॅक्टरवरच खाली कोसळल्या. त्यावेळी खासदार रक्षा खडसे व इतर महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना सावरले. मात्र, अस्वस्थ वाटत असल्याने रंजना पाटील यांना तातडीने चारचाकीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे भाजप नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. रंजना पाटील यांच्याप्रमाणेच एका भाजपा कार्यकर्त्याला देखील अशाच प्रकारे गर्दीत भोवळ आली. क्लिक करा आणि वाचा- मोर्चात चोरट्यांचा सुळसुळाट भाजपच्या मोर्चात हजर असलेले पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या खिशामधून चोरट्यांनी पैसे व मोबाइल लांबवले. यात किरणसिंग विजसिंग देवळे (रा. कडगाव) यांच्या खिशातून ४० हजार, बाळु शंकर पाटील (रा. कडगाव) यांच्या खिशातून ४ हजार ५००, संदीप मोतीलाल सरताळे (रा. वाघाडी, ता. जामनेर) यांच्या खिशातून ५० हजार रुपये व योगेश वसंतराव मोहते (रा. जामनेर) यांचा १७ हजार ५०० रुपयांचा मोबाइल चोरट्यांनी लांबवला. क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

amruta fadnavis criticizes malik: अमृता फडणवीस नवाब मलिकांवर संतापल्या; म्हणाल्या, 'बेनकाब नवाब भी होता हैं'

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री यांनी विधान सभेतील विरोधी पक्षनेते हे राज्यातील ड्रग्जच्या खेळाचा मास्टरमाइंड असल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर फडणवीस यांच्या पत्नी यांनी मलिक यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही मर्द आहात ना?, मग देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करा, मला मध्ये आणू नका, असे म्हणत नवाब एकदिवस बेनकाब होतील, असा हल्लाबोल अमृता फडणवीस यांनी केला आहे. ( criticizes minister after his allegations on ) भाजपाचे ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांशी संबंध असल्याचा आरोप करत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट केला आहे. फोटोतील व्यक्ती जयदीप राणा असून राणा यांचा ड्रग्ज व्यवसायाशी संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- मलिक हे माझ्यावर आरोप करत आहेत, तसेच ते माझ्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. मात्र आम्ही दोघे स्वतंत्र व्यक्ती आहोत. आमची वेगळी ओळख आहे. मी सामाजिक कार्यकर्ता असून एक बँकर आहे, तसेच मी एक गायिकाही आहे. माझी ही ओळख मी जपलेली आहे, असे सांगतानाच अमृता फडणवीस यांनी जर माझ्या अंगावर कुणी आले, तर मी त्याला सोडणार नाही. कारण, मी खऱ्याची साथ सोडत नाही आणि खोट्याची साथ देणाऱ्यालाही मी सोडत नाही, असे आव्हानच अमृता फडणवीस यांनी दिले आहे. मलिक यांच्यावर आरोप करताना त्या म्हणाल्या की हे सगळे जाणीवपूर्वक केले जात आहे. आमच्याकडे असे काहीच नाही जे नवाब मलिक उघड करू शकतात, असे सांगत आमच्याकडे भूखंड, साखर कारखाने असे काहीच नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही, असा टोलाही त्यांनी नवाब मलिक यांना लगावला. क्लिक करा आणि वाचा- 'बेनकाब नवाब भी होता है' नवाब मलिकांवर प्रहार करताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, कोण कोणाच्या पाठीशी आहे हे नवाब मलिक यांनी त्यांच्या जावयाला विचारावे. बेनकाब नवाब भी होता है, और वह जरूर होगा. थोडा काळ जावा लागेल, असेही त्या पुढे म्हणाल्या. जेव्हा एखाद्यामध्ये नकारात्मकता आलेली असते तेव्हा त्याला सर्व काही तसेच दिसते, त्याच्या मनात खराब विचार येतात तेव्हा त्याला सगळं खराब दिसतं आणि तो खराब करण्याचा प्रयत्न करत असतो, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी मलिकांवर हल्लाबोल केला आहे. क्लिक करा आणि वाचा- मलिक यांना आव्हान देत अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या की, तुम्ही मर्द आहात ना, तर मग थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधा, मला मध्ये आणू नका. मी माझे केवळ विचार मांडते आणि एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून ते करत राहणार आहे. त्यापासून मला मात्र कुणीही थांबवू शकत नाही.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत पक्षांतर्गत वाद आला उफाळून!

: जिल्हा परिषदेतील सभापती पदाच्या निवडणुकीत धक्का बसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या गोटात खळबळ उडाली असून या पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी पक्षाकडून सोमवारी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. मात्र या बैठकीत पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळालं. कारण बैठकीत आरोप-प्रत्यारोप झाले आणि जिल्हा परिषदचे गटनेते ज्ञानेश्वर सुलताने यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले. तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे . अकोला जिल्हा परिषदेच्या दोन सभापतीपदाच्या निवडणुकीत यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला. जिल्हा परिषदेतील दोन्ही सभापती पदं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि अपक्षांच्या आघाडीला मिळाली आहेत. तसंच महिला आणि बालकल्याण सभापती पदावर बच्चू कडू यांच्या प्रहारच्या उमेदवार स्फूर्ती गावंडे यांना यश मिळालं. शिक्षण सभापतीपदावरही अपक्ष सम्राट डोंगरदिवे अविरोध विजयी झाले. या पार्श्वभूमीवर सोमवारी अध्यक्षांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांची मंथन बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत निवडणुकीत नेमकी कुठे चूक झाली, याबाबतच्या कारणांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, या बैठकीचा अहवाल पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पाठवला जाणार असून त्यानंतर प्रकाश आंबेडकरांकडून हलगर्जीपणा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

देश विकणारं सरकार म्हणून मोदी सरकारची इतिहासात नोंद होणार; पटोलेंचा घणाघात

: प्रदेशाध्यक्ष यांनी गडचिरोली जिल्ह्यामधून कॉंग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीला सोमवारी सुरुवात केली. यावेळी बोलताना नाना पटोले (Congress ) यांनी करोना काळातील स्थितीवरून मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 'करोनासारख्या महामारीत केंद्रामध्ये बसलेल्या सरकारने वेळीच लसीकरण करून करोनाला रोखलं असतं, लशींची बोली लावली नसती तर अनेकांचा जीव वाचवता आला असता. अनेक उद्योग धंदे बंद झाले, ते आपल्याला थांबवता आले असते. शेतकरी बरबाद होताना त्याला थांबवता आलं असतं. पण करोना या देशांमध्ये पद्धतशीरपणे पसरवून शेतकऱ्यांच्या विरोधातले तीन काळे कायदे कसे आणता येईल यासाठी मोदी सरकारने प्रयत्न केले,' असा खळबळजनक आरोप नाना पटोले यांनी गडचिरोलीत केला. 'करोनाच्या काळात लोक घरात आहेत ही संधी पाहून इंग्रजांनी ज्या पद्धतीने कायदे केले नसतील त्यापेक्षा भयानक कायदे मोदी सरकारने केले. त्यामुळे देश विकणारं सरकार म्हणून मोदी सरकारची इतिहासात नोंद होणार आहे,' असंही नाना पटोले यांनी म्हटलं. यावेळी नाना पटोले यांनी काँग्रेसचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी गावपातळीला जाऊन काँग्रेसचे सदस्य नोंदणी करा व पक्षाची ताकद वाढवा, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. दरम्यान, गडचिरोलीतील या कार्यक्रमाला पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार अभिजीत वंजारी, गडचिरोलीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मनवाडे, प्रवक्ते अतुल लोंढे, नामदेव ऊसंडी आणि काँग्रेसचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

nawab malik vs bjp: 'हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या १९ बंगल्यांबद्दल बोला'; भाजपचे मलिकांना आव्हान

मुंबई: विधान सभेतील विरोधी पक्षनेते () हे राज्यातील ड्रग्ज खेळाचे मास्टरमाइंड आहेत, असा खळबळजनक आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री (Nawab Malik) यांच्यावर भाजप नेत्यांनी निशाणा साधला आहे. मलिक यांच्यावर प्रत्यारोप करत भाजप नेत्यांनी मलिक यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते (Keshav Upadhye) यांनी ट्विट करत मलिक यांच्यावर टीका करत अनेक प्रश्न विचारले आहेत. (bjp spokesperson keshav upadhye criticizes minister and ncp) 'हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बोला' मलिक यांच्या या खळबळजनक आरोपानंतर विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी टीकास्त्र सोडल्यानंतर आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडताना उपाध्ये म्हणाले की, एक फोटो दाखवायचा आणि वाटेल ती बेछूट आरोपांची राळ उडवायची, ना त्याला शेंडा ना बुडखा, ही नवाब मलिक यांची खासियत आहे. मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असाच आरोप केला. तुम्हाला खरंच चाड असेल तर आता माजी गृहमंत्री (Anil Deshmukh) यांची कुंडली काढा, हिंमत असेल तर (CM Udhhav Thackeray) यांच्या १९ बंगल्यावर बोला, असे थेट आव्हान उपाध्ये यांनी मलिक यांना दिले आहे. क्लिक करा आणि वाचा- हीच का पक्षाची धर्मनिरपेक्षता? एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचे नवाब मलिक वारंवार सांगत आहेत. त्यावरही उपाध्ये यांनी ताशेरे ओढले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात जात, धर्माच्या नावाने एका कुटुंबाचे किती वाभाडे काढणार, हीच का पक्षाची धर्मनिरपेक्षता, असा सवाल उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे. क्लिक करा आणि वाचा- मराठा आरक्षणाची कशी वाट लावली ते सांगा. शेतकऱ्यांच्या तोंडाला कशी पाने पुसली ते सांगा. ओबीसी आरक्षण प्रकरणी ओबीसींना कसे फसवले तेही सांगा, असे एकावर एक मुद्दे उपस्थित करत उपाध्ये यांनी मलिक यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आता उपाध्ये यांच्या या मुद्द्यांवर नवाब मलिक काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

अटलजी म्हणाले होते, “मी आतून पण हिंदू आहे आणि बाहेरून सुद्धा”

अयोध्येतील रामजन्मभूमी जागेचा प्रश्न सुटला आहे. पण या मुद्द्यावरून संसदेपासून रस्त्यापर्यंत देशात जोरदार चर्चा घडल्या आहेत. संसदेत जेव्हा जेव्हा आयोध्येतील राम मंदिराची चर्चा होते तेव्हा देश श्वास रोखून ऐकत असे.

त्याकाळी असं म्हटलं जायचं कि अयोध्येच आंदोलन हे लालकृष्ण अडवाणींनी उभं केलं होत पण वाजपेयींचा त्याला पाठिंबा नव्हता. वाजपेयी बाबरी मशीद पाडण्याच्या विरोधात होते असं हि बोललं जायचं. पण वाजपेयींनी जाहीर रित्या आपली भूमिका कधी मांडली नव्हती. विशेषतः पंतप्रधान झाल्यावर तर त्यांनी या वादग्रस्त विषयाला अनेकदा बदल दिला होता.

खरे तर देशात खळबळ माजवणाऱ्या रामजन्मभूमीवर अटलजींना काहीतरी बोलावे, यासाठी विरोधी पक्षाचे खासदार प्रयत्नशील होते, पण अटलजींनी प्रश्न उपस्थितीत करणाऱ्या विरोधकांना असे काही सांगितले की, त्यांना यावर आता काय प्रतिक्रिया द्यावी हेही समजले नाही.

तर गोष्ट आहे  १६ मार्च २००२ ची.

तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे १६ मार्च २००२ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार  लोकसभेत आयोध्येतील परिस्थितीवर उत्तर देत होते. त्यांच्या भाषणापूर्वी काँग्रेस, डावे आणि इतर विरोधी पक्षातील खासदार अटलजींवर दबाव आणण्यासाठी अनेक प्रश्न उपस्थित करत होते.

‘पंतप्रधान राहण्यासाठी वाजपेयी हे बाहेरून धर्मनिरपेक्ष प्रतिमा ठेवतात, पण आतून हिंदू संघटनांना पाठिंबा देतात’, असे विरोधी पक्षातील काही खासदारांनी अटल बिहारी वाजपेयी  यांच्यावर हल्लाबोल केला होता.  विरोधी खासदारांच्या आरोपां नंतर वाजपेयी उभे राहिले.

वाजपेयी यांचे भाषेवर उत्तम प्रभुत्व होते. ते बोलायला उभे राहिले तर सर्व सभागृह लक्ष देऊन ऐकत असे. यावेळची तर परिस्थिती ही जरा वेगळी होती. यावेळी वाजपेयी यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात येत होती. अशावेळी शांत बसतील ते अटलबिहारी वाजपेयी कसले.

उत्तर देण्यासाठी वाजपेयी उभे राहिल्यावर सभागृहात शांतता पसरली होती. ते म्हणाले- ‘जे लोक माझ्यावर फक्त बाहेरून धर्मनिरपेक्ष असल्याचा आरोप करत आहेत, कृपया मला समजावून सांगा की, विचार प्रक्रियेत आत आणि बाहेर काय असते? यावेळी सभागृहात संपूर्ण शांतता पसरली.

वाजपेयी पुन्हा म्हणाले – ‘मी आतून हिंदू आहे आणि बाहेरूनही. हिंदुत्व हे माझे जीवन आहे आणि ती माझी संस्कृती, माझी मूल्ये आहेत. मी आतून कोण आणि बाहेरून कोण हे कोणी ठरवेलच कसं!” त्याच्या कडक स्वराने सभागृहातली शांतता आणखीनच गडद झाली.

सर्वजण शांत झाल्यावर अटलजी आपल्या नम्रपणे म्हणाले – ‘धर्मनिरपेक्षता म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी हिंदू धर्मातून शिकावे. या जगात सनातन धर्मापेक्षा धर्मनिरपेक्ष कोणी नाही. हेच प्रत्येकाला स्वतःमध्ये घेते. आणि तुम्ही आम्हाला धर्मनिरपेक्षतेचा धडा शिकवत आहात.

अयोध्येच्या प्रश्नावर आणि आपल्या हिंदुत्वावर वाजपेयींनी स्पष्ट भूमिका मांडली आणि इतकी वर्षे सुरु असलेल्या वादावर कायमचा पडदा टाकला. ते धर्मनिरपेक्ष विचारांचे पुरस्कर्ते होतेच पण त्यासाठी हिंदुत्वाची कास त्यांनी सोडली नव्हती.

हे ही वाच भिडू 

The post अटलजी म्हणाले होते, “मी आतून पण हिंदू आहे आणि बाहेरून सुद्धा” appeared first on BolBhidu.com.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

इंजिनिअरिंग ड्रॉप आउट केलं आणि विना लाईटचं वॉटर फिल्टर बनवलं…

ज्या ज्या वेळी एखादी भीषण नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा तिथं पीडित लोकांना स्वच्छ पाणी कसं मिळेल याकडे सगळ्यांचं लक्ष असतं पण ते गाव घटनेतून नीट होतं पण स्वच्छ पाणी त्या लोकांना पिण्यासाठी मिळत नाही. जेव्हा जेव्हा नैसर्गिक घटना घडते तेव्हा तिथल्या पाण्यामध्ये बॅक्टेरिया, केमिकल, पशूंची विष्ठा यामुळे ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे आजार फोफावण्याची संधी वाढते. यावर उपाय म्हणून मागच्या 17 वर्षांपासून एक कंपनी यावर वॉटर फिल्टरचा उपाय राबवत आहे तर जाणून घेऊया या कंपनी विषयी.

पुण्यामध्ये aqua plus water purifier private limited ही कंपनी मागच्या 17 वर्षांपासून असे वॉटर फिल्टर बनवत आहे त्यामुळे लाखो लिटर पाणी काही मिनिटातच शुद्ध होतं. हे वॉटर फिल्टर दूरच्या देशात इन्स्टॉल करण्यात कामी येणार आहेत. आजवर 50 पेक्षा जास्त आपत्तीच्या ठिकाणी हे वॉटर फिल्टर्स कामी आले आहेत.

पण इतक्या युनिक आयडियाची सुरवात नक्की झाली कुठून ? ते जाणून घेऊया.

या कंपनीचे संस्थापक राहुल पाठक हे पुण्यात इंजिनिअरिंग करत होते. थेरीज आणि कॅल्क्युलेशन मध्ये ते गुंतून गेलेले होते आणि त्यांना यातून बाहेर पडून नवीन काहीतरी करायचं होतं. याच काळात त्यांनी इंजिनिअरिंग ड्रॉप आउट केलं आणि 1993 साली वॉटर प्युरीफायरची मार्केटिंग करायला सुरुवात केली. हे करण्यामागे त्यांचं प्रेरणास्थान त्यांचे वडील होते. त्यांचे वडील सिरॅमिक फिल्टर्स बनवून विकत असे. पण 90 च्या दशकात आलेल्या मंदीमुळे त्यांचा व्यवसाय बंद पडला होता.

राहुल पाठक यांनी वडिलांच्या या व्यवसायाला नवीन रूप देण्याचं ठरवलं आणि वॉटर फिल्टर बनवायला सुरवात केली. 1994-95 साली कंपनी सुरू केली आणि स्वतः तिथं ते वॉटर फिल्टर बनवू लागले. आता वॉटर फिल्टर बनवणारे तेव्हा बरेच होते म्हणून राहुल पाठक यांनी मोबाईल वॉटर फिल्टर बनवायला सुरवात केली. राहुल पाठक या मोबाईल फिल्टर विषयी सांगतात की

वॉटर फिल्टरमध्ये वापरण्यात येणारी मेम्बरेन, एका पातळ कागदाची शीट असते जी चार भागात मायक्रोफिल्टरेशन, अल्ट्राफिल्टरेशन, नॅनोफिल्टरेशन आणि रिव्हर्स ऑसमॉसिस मध्ये विभागली गेली आहे जे पाणी शुद्ध करतात. यात पाण्यात असलेली बॅक्टेरिया, व्हायरस, किटाणू, क्षार 99 टक्के शुद्ध करतात.

अगोदर ह्या मेम्बरेन चीनमधून आयात केल्या जात होत्या नंतर राहुल पाठक यांनी त्याचं तंत्र समजावून घेतले आणि स्वतः बनवायला चालू केलं. द काउंसिल ऑफ साइंटिफिक एंड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR ) च्या वैज्ञानिक लोकांसोबत मिळून त्यांनी एक मशीन तयार केली जी पूर्णपणे स्वदेशी ठरली. 2005 साली जम्मू काश्मीर मध्ये आलेल्या भूकंपात राहुल पाठक यांनी बनवलेले मोबाईल वॉटर फिल्टर्स वापरले गेले. आज घडीला भारत भरात हे वॉटर फिल्टर्स वापरले जातात.

एक स्टार्टअप म्हणून सुरवात केली तेही इंजिनिअरिंग ड्रॉप आउट करून आणि आज घडीला एका नव्या स्वरूपात लोकोपयोगी वस्तू राहुल पाठक यांनी बनवली आहे आणि देशभरात तिचा बोलबाला आहे.

हे ही वाच भिडू :

The post इंजिनिअरिंग ड्रॉप आउट केलं आणि विना लाईटचं वॉटर फिल्टर बनवलं… appeared first on BolBhidu.com.