12 th result : नगरचा क्रमांक घसरला! यंदा तिसर्‍या स्थानावर!

May 24, 2024 0 Comments

नगर : पुढारी वृत्तसेवा : पुणे विभागात असलेल्या पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांचा 12 वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये गतवर्षी दुसर्‍या स्थानावर असलेला नगर जिल्हा यंदा तिसर्‍या स्थानी खाली आला. तर तिसर्‍या स्थानी असलेले पुणे यावर्षी मात्र सोलापूरला मागे टाकत पहिल्या स्थानावर झेपावलेले दिसले. पुणे विभागात पुणे, सोलापूर, नगरचा समावेश आहे. या तीन जिल्ह्यातून 2 लाख 48 हजार परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती. यात 2 लाख 29 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विभागाचा निकाल हा 94.44 टक्के लागला आहे. यात पुणे जिल्हा 95.19 टक्के निकाल लागल्याने पहिल्या स्थानी, सोलापूर 93.88 टक्के दुसर्‍या स्थानी आणि नगर 93.40 टक्के तिसर्‍या स्थानी दिसला आहे. नगर जिल्ह्यातून एकूण 61996 विद्यार्थींनी परीक्षा दिली होती.यापैकी 57877 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


गेल्या निकालात काय होती परिस्थिती….!




पुणे जिल्ह्यात 1 लाख 30 हजार 885 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात 1 लाख 19 हजार 297 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन (91.14 टक्के) निकाल लागला. सोलापूरच्या 53 हजार 719 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, यात 50 हजार 334 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यांचा निकाल (93.69 टक्के) लागलेला दिसला. तर नगर जिल्ह्यातील 62 हजार 739 परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती. यात 58 हजार 120 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन (92.63 टक्के) निकाल लागला होता. त्यामुळे गेल्यावर्षी सोलापूर प्रथम, नगर द्वितीय आणि पुणे हे तिसर्‍या स्थानी दिसले.


हेही वाचा



* शिरूरच्या पूर्व भागामध्ये बिबट्यांचा वावर कायम

* Nashik News | मुंढेगावजवळ विहिरीत आढळला माय-लेकींचा मृतदेह, परिसरात खळबळ

* पालिकेच्या दवाखान्यांत जेनेरिक औषधांची दुकाने


http://dlvr.it/T7LtVY

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: