शिर्डीत साईबाबांपासून रामनवमी उत्सवाची परंपरा कशी सुरु झाली?

April 17, 2024 0 Comments

शिर्डी; पुढारी वृत्तसेवा : शिर्डीच्या साईबाबा ट्रस्टने १६ ते १८ एप्रिल २०२४ या काळात श्री रामनवमी उत्सव साजरा करण्याची तयारी पूर्ण केली आहे. मुंबई येथील व्दारकामाई मंडळाच्यावतीने आकर्षक विद्युत रोषणाई व ४ नंबर प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस श्रीराम प्रभूंचा भव्य काल्पनिक देखावा उभारण्यात आला आहे. बंगळूर येथील दानशूर साईभक्त व्यंकटे सुब्रमण्यन यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. तसेच उत्सवकाळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. (Ram Navami 2024)


श्री रामनवमी उत्सवाची सुरुवात १९११ मध्ये श्री साईबाबांचे अनुमतीने करण्यात आली. तेव्हापासून प्रतीवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात शिर्डी येथे साजरा केला जातो. संभाव्य गर्दी लक्षात घेता उन्हापासून भाविकांच्या संरक्षणाकरीता मंदिर परिसर, मंगल कार्यालय व साईनगर मैदान येथे सुमारे ११ हजार ५०० चौ. फुट मंडप उभारण्यात आला आहे. तसेच साईभक्तांच्या अतिरिक्त निवासव्यवस्थेकरीता साईबाबा भक्तनिवासस्थान (५०० रुम), साई धर्मशाळा व साईनगर मैदान याठिकाणी सुमारे ३६ हजार ५७० चौ. फुट बिछायत व कनातीसह मंडपाची उभारणी करण्यात आलेली असून यामध्ये विद्युत, पाणी पुरवठा, स्वच्छतागृह व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. खर्डी, गोलभान, कसारा बायपास, लतिफवाडी, घोटी, सिन्नर, खोपडी, पांगरी, वावी, पाथरे, दुशिंगवाडी, मलढोन व झगडे फाटा येथील पालखी थांब्याच्या ठिकाणी सुमारे १ लाख १६ हजार चौ. फुट कापडी मंडप कनात बिछायतीसह उभारण्यात आले आहे. (Ram Navami 2024)


दोन लाख भाविकांच्या भोजनाचे नियोजन




उत्सव काळात श्री साईप्रसादालयात अंदाजे २ लाखाहून अधिक साईभक्त प्रसाद भोजन घेतील असे नियोजन करण्यात आले आहे. तीन दिवस उत्सवात वेगवगळे मिष्ठान्न प्रसाद भोजनात देण्यात येणार आहेत. दर्शनरांगेत व परिसरात भक्तांना चहा, कॉफी व दुध सुलभतेने मिळावे यासाठी साई कॉम्प्लेक्स, साईआश्रम, धर्मशाळा, भक्तनिवासस्थान (५०० रुम), व्दारावती भक्तनिवासस्थान तसेच साई उद्यान इमारत परिसर, नविन दर्शनरांग, शांतीनिवास इमारतीतील दर्शनरांगेत तळमाळा व पहिल्या माळ्यावर चहा व कॉफीची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गुरुस्थान मंदिरासमोर दिक्षीत वाडा, नवीन दर्शनरांग, शांतीनिवास इमारत दर्शनरांग, मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडप, श्री साईआश्रम (१००० रुम) व श्री साईप्रसादालय आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु राहणार असून या ठिकाणी तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहीका तैनात करण्यात आलेल्या आहेत. (Ram Navami 2024)


१६५ क्विंटल लाडू प्रसाद पॅकेट




उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी १६५ क्विंटलचा बुंदी/लाडू प्रसाद तयार करण्यात येणार असून श्री साईनाथ मंगल कार्यालय, गेट नंबर १ चे जवळ, मारुती मंदिराशेजारी साईकॉम्प्लेक्स, श्री साईप्रसादालय, सेवाधाम इमारत, शिर्डी विमानतळ व सर्व निवासस्थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्यात आलेले आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास अतिरिक्त लाडू विक्री केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.


फुलांची सजावट, विद्युत रोषणाई




श्रीरामनवमी उत्सवानिमीत्त समाधी मंदिर व मंदिर परिसरात, व्दारकामाई, चावडी व गुरुस्थान या ठिकाणी बंगळूरू येथील दानशूर साईभक्त वेंकटा सुब्रमण्यम यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. तसेच मुंबई येथील व्दारकामाई मंडळाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई भव्य काल्पनिक देखावा उभारण्यात येत आहे. याबरोबरच उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


शीघ्र कृती दल, बॉम्बशोधक पथक तैनात




मंदिर परिसर व शिर्डी परिसरात बंदोबस्त चोख ठेवण्यासाठी संस्थान सुरक्षा विभागाचे संरक्षण कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, शिघ्र कृतीदल पथक, बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आले आहे. याबरोबरच श्री साईबाबा संस्थान, पोलीस प्रशासन व शिर्डी नगरपंचायत यांचे संयुक्त अतिक्रमण व दलाल प्रतिबंधक पथक ही सज्ज ठेवण्यात आलेले आहेत.


‘असे’ असतील कार्यक्रम




१६ एप्रिल रोजी सायं. ४ ते ६ या वेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा कीर्तन कार्यक्रम, दुपारी २ ते ३.३० वा. यावेळेत पं.ह.भ.प. देवरावजी कुळमेथे महाराज, नाशिक रोड यांचा साई महिमा गुणगाण कार्यक्रम, दुपारी ३.४५ ते ५.३० वा. यावेळेत पद्मावती गोविंद पारेकर, निनाद ग्रुप, पुणे यांचा साईभजने व भक्तीगीतांचा कार्यक्रम व रात्री ७.३० ते ९.३० यावेळेत मिराज इव्हेंटस्, नवी मुंबई यांचा साई भजन संध्या कार्यक्रम होणार आहे.


१७ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा कीर्तन कार्यक्रम, दुपारी ३.३० ते ५.३० वा. यावेळेत डॉ. लता सुरेंद्र (मुंबई) यांचा आयना, प्रभु रामाचा महाकाव्य प्रवास हा कार्यक्रम व रात्री ७.३० ते ९.३० यावेळेत विजय साखरकर, साईसेवा नृत्योत्सव, मुंबई यांचा साईस्वर नृत्योत्सव कार्यक्रम होणार आहे.


१८ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. दुपारी ३.३० ते ५.३० वा. यावेळेत डॉ. प्रसाद श्रीराम चौधरी, जालना यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम व रात्री ७.३० ते ९.३० यावेळेत अलोक मिश्रा, साई आस ट्रस्ट, दिल्ली यांचा साई भजनसंध्या कार्यक्रम होणार आहे.


हेही वाचा :



* कोल्हापूर : अंबाबाई मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू

* यंदा मान्सून 106 टक्के; महाराष्ट्रात ‘अशी’ असेल स्थिती : हवामान विभागाचा पहिला अंदाज

* सोन्याला झळाळी, मात्र उद्योग काळवंडला






The post शिर्डीत साईबाबांपासून रामनवमी उत्सवाची परंपरा कशी सुरु झाली? appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T5bjSM

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: