मतदारसंघात विकासकामांसाठी भरीव निधी : आमदार मोनिका राजळे

March 05, 2024 0 Comments

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : मतदारसंघात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबवित विकासकामे केली आहेत. रस्त्यांसह अन्य कामांसाठी भरीव निधी दिला आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा आणि विधानसभेसाठी आपण आम्हाला साथ देऊन या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सहकार्य करण्याचे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले. पाथर्डी ते कासार पिंपळगाव, कासार पिंपळगाव ते जवखेडे, चितळी ते बर्‍हाणपूर रस्ता व चितळी गावातील विविध अशा सुमारे दहा कोटींच्या विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी आमदार राजळे बोलत होत्या.


याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, माजी जि. प. सदस्य राहुल राजळे, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघ प्रमुख नारायण पालवे, चारुदत्त वाघ, विष्णुपंत अकोलकर, पोपट कराळे, वसंत भगत, संभाजी राजळे, राधाकिसन राजळे, उद्धव महाराज ढमाळ, कृष्ण महाराज ताठे, उद्धव महाराज जाधव, अशोक आमटे, अशोक ताठे, महादेव जायभाये, बाबा आमटे, विनायक ताठे, अनिल ढमाळ, विष्णुपंत ताठे, अजिनाथ आमटे उपस्थित होते. चितळी गावासाठी भरीव निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आमदार मोनिका राजळे यांची पेढे तुला करण्यात आली. आमदार राजळे म्हणाल्या, शेतकर्‍यांसाठी शेततळे, विहीर, पीएम किसान आर्थिक मदत, महिला सशक्तीकरण योजना, बचत गटाला शून्य टक्के व्याजदराने कर्ज, पंतप्रधान आवास योजना, त्याचप्रमाणे बारा बलुतेदारांना विश्वकर्मा योजनेतून आर्थिक कर्ज स्वरूपात मदत, अशा नाविन्यपूर्ण योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यासाठी आणलेल्या आहेत.


या सर्व गोष्टींचा विचार आपण येणार्‍या काळात करून लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला चांगले सहकार्य करून, पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचे आवाहन आमदार राजळे यांनी केले. अंकुश राजळे,आर वाय म्हस्के,शिवाजी खोजे,अर्जुन राजळे,ज्ञानदेव तुपे,भगत साहेब, तुषार तुपे, उमेश तिजोरे,सोपान तुपे,अंकुश राजळे,राधाकिसन गोपीनाथ राजळे,ज्ञानदेव जगताप, संभाजी बन्सि राजळे, दत्तात्रय शेळके, आप्पा राजळे,अर्जुन जगताप हे उपस्थित होते.


पक्ष संघटनेतील कामावर संधी




तुम्ही पक्ष संघटनेचे काम किती करता, या आधारावर भारतीय जनता पार्टीकडून तुम्हाला निधी आणि निवडणुकीत संधी दिली जाते. त्यामुळे संघटना बांधणीच्या कामात आपण वेळ देऊन प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन आमदार राजळे यांनी कार्यकर्त्यांना केले.


हेही वाचा



* DK Shivakumar | मनी लाँड्रिंग प्रकरणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मोठा दिलासा

* आवास योजनेत जामखेड पंचायत समिती प्रथम

* भाजपशी दगा केला म्हणूनच धडा शिकवला : आशिष शेलार






The post मतदारसंघात विकासकामांसाठी भरीव निधी : आमदार मोनिका राजळे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T3dDPf

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: