पिंपरनेजवळ एक्सल तुटल्याने एसटी बस पलटी; विद्यार्थी जखमी
संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर व राहुरी तालुक्याच्या सरहद्दी वरील म्हैसगाव येथून पहाटेच्या सुमारास निघालेली संगमनेर आगाराची एसटी बस शिबलापुर मार्गे संगमनेरकडे येत होती. ही बस पिंपरणे गावाजवळ आली असतात्या बसचा अचानक एक्सल तुटला असता ती एस टी बस पलटी झाली .या अपघातात कुठली जीवितहानी झाली नाही, मात्र महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी मात्र किरकोळ स्वरूपात जखमी झाले असल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथून निघालेली संगमनेर आगाराची एसटी बस क्रमांक एम एच 07 सी 9146 बस शिबला पुरमार्गे बस संगमनेरकडे येत होती. या बसमध्ये शिबलापूर हंगेवाडी व कनोली येथील महाविद्यालयीन शिक्षण घेत असंणारे विद्यार्थी बसलेले होते. ही बस पिंपरणे गावात आली असता, अचानक एसटी बसचा एक्सेल तुटला असता एसटी बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस पलटी झाली आहे.
या अपघातात बसमधील विद्यार्थी किरकोळजखमी झाली आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस संगमनेर उप विभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे पोलीस निरीक्षक देविदासढुमणे घटनास्थळी दाखल झाले होते .त्यानंतर जखमी विद्यार्थ्यांना संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. अपघातात विद्यार्थी किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहे त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दै.पुढारीशी बोलताना केले आहे
हेही वाचा
* Australia vs Pakistan : डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तान विरुद्ध रचला इतिहास, नव्या विक्रमाची नोंद
* नॅचरल गॅसच्या किमतीवर अमेरिकेचा प्रभाव
* ‘पुढारी’ शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलचा आज अखेरचा दिवस
The post पिंपरनेजवळ एक्सल तुटल्याने एसटी बस पलटी; विद्यार्थी जखमी appeared first on पुढारी.
http://dlvr.it/T0bz9M
0 Comments: