राहुरीत सरते वर्षही गुन्हेगारीचे !

December 24, 2023 0 Comments

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : पोलिस प्रशासनाच्या क्राईम डायरीमध्ये गुन्ह्यांची वाढती नोंद पोलिस अधिकार्‍यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सरत्या वर्षाला गुडबाय करताना येथील पोलिस डायरीत तब्बल 851 गुन्ह्यांची नोंद झाली. सर्वाधिक 245 चोरीच्या घटनांचा उच्चांक आहे. महिला अत्याचाराचे 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. दंगलीच्या 37 घटना तर 2 खून झाले आहेत. अपघातांमध्ये 50 जणांचा बळी गेले. पोलिस डायरीची नोंद अधिकारी बदलुनसुद्धा थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे.


पोलिस ठाण्यामध्ये 5 वर्षांमध्ये 11 पोलिस निरीक्षकांनी कामकाज पाहिले. अधिकारी खुर्चीवर तग धरीत नसल्याने हलत्या खुर्चीला अनेक पोलिस अधिकार्‍यांचा आधार लाभला, मात्र गुन्हेगारी कमीच होत नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक शांत समजल्या जाणार्‍या राहुरी हद्दीत गुन्हेगारीच्या घटना क्वचित घडत होत्या. शांत व समृद्ध राहुरी तालुक्यात नोकरीची संधी मिळावी म्हणून अनेक धाव घेत होते. गुण्या- गोविंदाने नांदणार्‍या या तालुक्याचे मुळा- प्रवरा पाण्याने समृद्धतेचे नंदनवन फुलविले, परंतू गेल्या 10 वर्षांमध्ये तालुक्याच्या शांततेला अक्षरशः गालबोट लावण्याचे प्रकार गुन्हेगारांकडून सर्रास होत आहेत. वाळू तस्करी, दुचाकी चोर्‍या, शेती पिकांसह विजेची केबल, पंप चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे पहावसाय मिळत आहे.


राहुरी तालुक्यामध्ये महिला व तरूणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. क्राईम डायरीतील नोंद वाढतच असल्याचे चित्र दिसते. या पोलिस ठाण्याने सन 2022 चे क्राईम रेकॉर्ड मोडल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. गेल्यावर्षी पोलिस डायरीमध्ये 751 गुन्ह्यांची नोंद होती. यंदा वर्ष संपायला आठवडा शिल्लक असताना गुन्ह्यांची आकडेवारी तब्बल 851 पर्यंत पोहोचली आहे. गतवर्षी खुनाचे 4 तर यंदा 2 गुन्हे दाखल झाले. खुनाचे प्रयत्न गतवर्षी 9 तर यंदा 7 घडले. गेल्यावर्षी 3 दरोडे पडले. यंदा 5 दरोड्यांची नोंद झाली. दरोड्याच्या तयारी असणार्‍यांवर 9 गुन्हे नोंदले. यंदा एकच नोंद आहे. गतवर्षी घरफोडी 45 तर यंदा 18 झाल्या. गतवर्षापेक्षा यंदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली. गेल्यावर्षी 218 चोर्‍या झाल्या यंदा 245 गुन्हे नोंदविले आहेत. दंगलीच्या गतवर्षी 30 घटना घडल्या यंदा वाढ होवून 37 घटना घडल्या. हाणामारीने दुखापतग्रस्तांच्या गतवर्षी 130 घटना घडल्या. यात वाढ होऊन यंदा 143 गुन्हे नोंदविले आहेत. मुली पळवून नेण्याचे गतवर्षी 40 तर यावर्षी 43 गुन्ह्यांची नोंद झाली.


गेल्या काही वर्षांप्रमाणेच सरते वर्षही गुन्हेगारांचेच ठरल्याचे स्टेशन डायरीतील आकडेवारीतून दिसते. शेतकर्‍यांना हमी भाव, औषधे व रासायनिक खतांच्या किमती, नैसर्गिक आपत्ती, शासकीय दुर्लक्षित धोरण असे अनेक संकटे आ वासून उभे असताना चोरट्यांनीही शेतकर्‍यांना हैराण करून सोडल्याचे वास्तव दिसत आहे. राहुरी तालुक्यामध्ये सर्वाधिक विद्यूत पंप व केबल चोरीचे प्रमाण आहे. उभ्या पिकांवर डल्ला मारण्याचे पाप चोरटे करीत आहेत. याबाबत पोलिसात तक्रारी देऊनही चोरट्यांची किमया थांबत नसल्याचे चित्र दिसते.

पुर्वी दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार घडले. यंदा चक्क चाकी वाहने चोरट्यांच्या डोळ्यावर आले आहेत. राहुरीतून दुचाकींसह चारचाकी वाहनांची चोरी वाढल्याने वाहन मालक धास्तावले आहेत. शालेय मुलींना कशहरासह ग्रामीण भागात करावा लागणारा टपोरी, टारगटांचा सामना जैसे-थे आहे. मुलींना होणारा टारगटांचा वाढता त्रास पाहता अर्धवट शिक्षणातून ‘हात पिवळे’ करावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. गुन्ह्यांची उक्कल होण्याचे प्रमाण केवळ 70 टक्के आहे. यंदा 532 पैकी 542 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.


हिवाळी अधिवेशनात तापली कायदा-सुव्यवस्था

राहुरीत साधारणतः 6 महिन्याला बदलणार्‍या पोलिस अधिकार्‍यांसह शेतकर्‍यांच्या तक्रारींना ‘बोगस’ हिणावणार्‍या अधिकार्‍यांच्या जवाबावरून आ. प्राजक्त तनपुरे यांनी अधिवेशनात सत्ताधार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. राहुरी मतदार संघात सर्वसामान्य, महिला, तरुणींसह शेतकर्‍यांची सुरक्षितता महत्वाची आहे. नको त्या ‘गोष्टीं’कडे लक्ष देण्यापेक्षा कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्याकडे थोडेसे पहा, असे आ. तनपुरे यांनी सत्ताधार्‍यांना सुनावले. अधिवेशनातील ही वादळी चर्चा राहुरीच्या कायदा- सुव्यवस्थेला जागेवर आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


संपता-संपेना खुर्चीचा खेळ अन् तडजोडीच्या भानगडी समजेना..!

राहुरी तालुक्यात दुचाकी चोरट्यांचे मोठे रॅकेट आहे. अनेक टोळ्या पकडल्या, परंतू जामीन मंजुर होताच पहिले पाढे पंचावन्न सुरू होतात. परिणामी दुचाकी चोरी कमी होत नसल्याचे चित्र दिसत आहे. दुचाकी चोरीला गेल्यानंतर थेट मालकाशी संपर्क करुन ‘तडजोडी’ची रक्कम घेतली जाते. काही वर्षांपूर्वी राहुरी पोलिस प्रशासनाला दुचाकी चोरी गेल्यानंतर ‘तडजोडी’चा निर्णय घ्यावा लागला, परंतु अजुनही चोरट्यांचा प्रताप सुरूच आहे. पोलिस अधिकारी खुर्ची सांभाळताना कसरत करत असताना दुचाकी चोरीच्या तडजोडी मात्र संपत नसल्याचे दिसते.


 


The post राहुरीत सरते वर्षही गुन्हेगारीचे ! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0XjzJ

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: