Nagar : तीन महिन्यांत शहरातील 514 श्वानांचे निर्बिजीकरण

November 22, 2023 0 Comments

नगर : पुढारी वृत्त्तसेवा :  शहरात मोकाट कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढल्याने नगरसेवकांनी मनपात आंदोलन केले. त्यानंतर मनपाने तात्पुरत्या स्वरूपात जुन्याच संस्थेला कुत्रे पकडणे व त्याचे निर्बिजीकरणाचा ठेका दिला. तीन महिन्यात अवघ्या 714 श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले. मग कुत्र्यांची संख्या कशी कमी होणार असा सवाल नगरकरांमधून उपस्थित होत आहे. महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कुत्रे लहान मुलांवर हल्ला करीत असून, मुलांचे खेळणे आता जीवावर बेतू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


त्यामुळे महापालिकेने तत्काळ मोकाट कुत्रे पकडावे आणि त्यांचे निर्बिजीकरण करावे, अशी मागणी नगरसेवक रुपाली वारे, सुनील त्र्यंबके, विनीत पाऊबुद्धे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी केली होती. मनपा अधिकार्‍यांना कुत्र्याची प्रतिकृती भेट दिली होती. स्थायी समिती व सर्व साधारण सभेमध्ये त्यावरून घमासान झाले होते. त्यावेळी कुत्रे पकडण्यासाठी नेमलेल्या संस्थेचा करार संपला असून, नवीन करार झालेला नाही. त्यामुळे महापालिकेने तत्काळ हालचाली करीत जुन्याच संस्थेला तीन महिन्यांसाठी कुत्रे पकडणे व निर्बिजीकरण करण्याचा ठेका दिला. त्याने संस्थेने 15 सप्टेंबर 2023 ते 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत अवघे 514 कुत्रे पकडून त्याचे निर्बिजीकरण केले आहे. दरारोज दहा ते बारा श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात येत असल्याचा दावा महापालिका करीत आहे.


मात्र, दुसरीकडे कुत्र्याची शहरातील दशहत कमी झालेली नाही. बोल्हेगाव, तपोवन रोड, सर्जेपुरा, सारसनगर, केडगाव या भागात कुत्र्यांची प्रचंड संख्या आहे. एक श्वान निर्बिजीकरणासाठी 950 रुपये दिले जात आहेत. शहरात मोकाट श्वानांची 10 हजार 500 इतकी संख्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.


The post Nagar : तीन महिन्यांत शहरातील 514 श्वानांचे निर्बिजीकरण appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sz7fkx

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: