संगमनेर : तडीपार गुंडाचा सरपंचावर खुनी हल्ला

September 06, 2023 0 Comments

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यातून तडीपार असलेल्या एका गुंडाने पेमगिरीच्या सरपंचावर घातक शस्त्राने खुनी हल्ला केला. दरम्यान, जखमी सरपंचाच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी सराईत तडीपार गुंड पंकज सोनवणे याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारी आज (दि.4) गावबंद ठेवून निषेध केला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (दि. 3) दुपारी नवीन नगर रोडवरील भूमी अभिलेख कार्यालयाच्या समोर पेमगिरीचे सरपंच ज्ञानेश्वर पंढरीनाथ डुबे (वय 43 वर्षे) यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या चारचाकी वाहनातून आलेल्या पाच जणांनी सरपंच डुबे यांना अडविले. यावेळी नाशिक जिल्ह्यातून तडीपार असलेला गुंड पंकज सोनवणे व अन्य अनोळखी तीन इसमांनी चाकूचा धाक दाखवित, ‘तू माझ्या बहिणीला का छेडतोस?’ असा सवाल करीत दमबाजी करण्यास सुरुवात केली, तर अन्य तिघा अज्ञात आरोपींनी हातातील लोखंडी रॉडने मारहाण केली. तिघांनी सरपंच डुबे यांच्या डोक्यात, पाठीवर, उजव्या डोळ्याखाली, तोंडावर व डाव्या हातावर रॉडने मारहाण करीत गंभीर जखमी केले. सोनवणे याने चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. यावेळी नागरिकांनी जखमी सरपंच डुबे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. याबाबतची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पथक रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी जखमीचा जवाब नोंदविला आहे. जबाबावरून पोलिसांनी आरोपी गणेश गडकरी, पंकज सोनवणे व अन्य अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो. उ.नि. माळी करीत आहे. या घटनेनंतर पेमगिरीत तणावाचे वातावरण तयार झाले. आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सोमवारी गावबंद ठेवण्यात आले. सोनवणेवर नाशिक, नगर जिल्ह्यात गुन्हे याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पंकज सोनवणे सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात सुरुवातीस पोलिसांना त्याचा शोध घेतला, मात्र त्याच्यासह मारेकरी साथीदार पसार झाले आहेत. शांतता प्रिय पेमगिरीत हा थरार घडल्याने संतापाचे वातावरण आहे. पोलिस आता आरोपींच्या मागावर आहेत. हेही वाचा अमली पदार्थांचे रॅकेट उखडण्यासाठी टास्क फोर्स अधिकार्‍यांनो, गोदा आवर्तनात समन्वय ठेवा; मंत्री विखे पा यांचे निर्देश हडपसर : जुने ब्लॉक बसवून दुरुस्तीचा ‘देखावा’ The post संगमनेर : तडीपार गुंडाचा सरपंचावर खुनी हल्ला appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SvhLgW

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: