मुंबईतील मोदी विरोधकांची इंडिया नव्हे तर इंडिची बैठक : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

September 01, 2023 0 Comments

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांची मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीसाठी घमेंडी लोक एकत्र आले आहेत. त्यांची मुंबईत सुरू असणारी इंडियाची नव्हे तर इंडीची बैठक असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील तरुणाला उलटे टांगून मारहाण केली गेली त्या तरुणाची भेट घेण्यासाठी केंद्रीयराज्य मंत्री रामदास आठवले थांबले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय वाकचौरे, संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, युवकअध्यक्ष योगेश मुंतोडे, विनोद रुपवते आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईत होत असणाऱ्या इंडियाच्या बैठकीकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता मंत्री आठवले म्हणाले की देशातील एनडीए सोडून विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्रित येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. ही इंडिया आघाडी नव्हे तर इंडी आघाडी आहे. या इंडि आघाडीत सर्व घमंडी लोक एकत्र आले आहे. ते मनात अहंकार ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने अटॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, जगात व देशात अत्यंत लोकप्रिय नेते म्हणून पंतप्रधान मोदी यांची सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या विरोधात एकत्रित येऊन राजकारण करण्याचा तुम्हाला जरूर अधिकार आहे. परंतु, त्यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणे हे योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटविण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षाचे नेते एकत्र आले आहे. परंतु आम्ही एनडीएचे सर्वजण त्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून चोख उत्तर देणार आहे . त्यासाठी आम्ही सर्वजण एनडीए म्हणून आगामी होणाऱ्या २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा असून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होतील याची आम्हाला पूर्णपणे खात्री असल्याचे मंत्री आठवले यांनी सांगितले. एका छोट्याशा कारणासाठी त्या तरुणाला उलटे टांगून मारणे ही निंदनीय घटना आहे या प्रकरणातील काहीजणांना पोलिसांनी पकडले आहे मात्र काही जण फरार आहे त्यांनाही लवकरात लवकर पकडण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस प्रमु खांनी दिले आहे या घटनेचे कुणीही राज कारण न करता सामाजिक भावनेतून या घटनेकडे बघितले पाहिजे ज्या तरुणावर ज्यांनी अन्याय केला आहे त्यांना कडाका तील कडक शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. हेही वाचा : पुणे : सारस्वत एकमेकांमध्ये भिडले! महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभेत वादावादी पिंपरी : मोशीला 15 एकर जागेत साकारणार अत्याधुनिक रुग्णालय.. The post मुंबईतील मोदी विरोधकांची इंडिया नव्हे तर इंडिची बैठक : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SvVdfY

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: