अहमदनगर : मनपासाठी मनुष्यबळाचा मार्ग मोकळा

August 09, 2023 0 Comments

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत गेल्या 18 वर्षांनंतर रखडलेली पदभरती होणार असून, भरती प्रक्रिया राबविण्यासाठी टीसीएस(टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) संस्थेची नियुक्ती केली आहे. त्या संस्थेशी करार पूर्ण झाली आहे. येत्या एका महिन्यात 134 कर्मचारी-अधिकार्‍यांच्या पदांची भरती प्रक्रिया होणार असल्याचे सूत्रांकडून समजले. महापालिकेत सर्वच विभागात कर्मचार्‍यांनी वानवा आहे. गेल्या आठरा वर्षांपासून महापालिकेत नवीन पदभरती झाली नव्हती. महापालिकेच्या चार चार विभागाचा पदभार एकाच अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आलेला आहे. तर, प्रभाग समिती कार्यालयात तोकड्या कर्मचार्‍यांना कामकाज सुरू आहे. सर्वच विभागात कर्मचार्‍यांची कमतरता असून, त्याचा कामकाजावर परिणाम होत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. महापालिकेचे उत्पन्न आणि आस्थापनाप खर्च याचा ताळमेळ जुळत नसल्याने व आस्थापना खर्चच 35 टक्क्यांच्या पुढे जात असल्याने नगरविकास विभाग महापालिका पदभरतीला मंजुरी मिळत नव्हती. त्यामुळे आरोग्य, घनचकरा, उद्यान, विद्युत, अग्निशमन अशा अनेक विभगात गेल्या कित्तेक वर्षांपासून बाह्य संस्थेमार्फत कर्मचारी घेऊन कामकाज सुरू आहे. त्यात बाह्य संस्था वेळेत त्या कर्मचार्‍याना पगार देत नसल्याने अनेक वेळा काम बंद होत असल्याने त्याचा मनपाच्या कामकाजावर परिणाम होत होता. महालिकेत सध्या 2870 पदे मंजूर आहेत. तर, सध्या 1600 कर्मचारी कार्यरत आहेत. सुमारे 1200 कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त आहेत. त्यात अवघ्या 135 कर्मचार्‍यांची भरती करण्यास शासनाच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी टीसीएस कंपनीशी पत्रव्यवहार केला होता. त्याला कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, कंपनीने करार नाम्यात काही त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटीची पूर्तता करून महापालिकेने करारनामा पुन्हा कंपनीकडे पाठविला असून, करारनामा पूर्ण झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असल्याचे समजते. पदे व संख्या अशी स्त्रीरोग तज्ञ 1, भूलतज्ञ 1, पर्यावरण संवर्धन अधिकारी 1, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)2, अभियांत्रिकी सहाय्यक 8, आरेखक/आर्किटेक्चरल असिस्टंट 1, संगणक प्रोग्रॅमर 1, विद्युत पर्यवेक्षक 3, पाणी लॅबटेक्निशियन 6, लॅब टेक्निशियन 1, लॅब असिस्टंट 6, प्रदूषण नियंत्रण अधिकारी 1, पशुधन पर्यवेक्षक 1, लघुटंकलेखक 2, कनिष्ठ विधी अधिकारी 2, समाज विकास अधिकारी 1, सॅनिटरी सबइन्स्पेक्टर 12, सब ऑफिसर 1, ड्राव्हर ऑपरेटर 20, फ्रायरमन 50, लिपिक टंकलेखक 13. महापालिकेत कर्मचारी पदभरतीसंदर्भात संबंधित कंपनीने पाठविलेल्या करारनाम्यात त्रुटी काढल्या होत्या. त्याची पूर्तता करून पुन्हा करारनामा कंपनीकडे पाठविला आहे. कंपनीने करारनाम्याचा स्वीकार केला असून, येत्या काही दिवसांत पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल. – डॉ. पंकज जावळे, आयुक्त मनपा हेही वाचा शेवगाव : बोगस बिनशेती नोंदी कारवाईकडे दुर्लक्ष : अरूण मुंढे अहमदनगर तालुक्यातील शाळेजवळ रोडरोमिओंंचा धुमाकूळ अहमदनगर : जिल्हाधिकार्‍यांसह 160 जणांना अवयवदानाची इच्छा The post अहमदनगर : मनपासाठी मनुष्यबळाचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StNPmp

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: