रेल्वे कामांचे पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन ! आ. आशुतोष काळे

August 08, 2023 0 Comments

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत कोपरगाव रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी दिलेल्या 29.94 कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणार्‍या कामाचे भूमिपूजन रविवार (दि.6) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (ऑनलाईन) पार पडले. यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले, रेल्वे प्रवाशांसह कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या विविध समस्यांबाबत रेल्वेकडे केलेल्या पाठपुराव्यातून बहुतांश समस्या सोडविल्या आहेत. अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत 29.94 कोटी रुपयांच्या निधीतून कोपरगाव रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासातून कोपरगाव मतदार संघाच्या अर्थकारणाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आ. काळे म्हणाले, रेल्वे स्टेशनच्या समस्याबाबत केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या लिफ्टचे काम प्रगतीपथावर आहे. एक्स्ट्रा ट्रॅकसाठी 3 नंबर प्लॅटफॉर्मची निर्मितीची केलेली मागणी पूर्ण झाली. अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. स्वच्छतेचा प्रश्नदेखील सुटला. नवीन डोम बांधले आहेत. गुड्स लाईन वाढवण्यात आली आदी मागण्या पूर्ण झाल्या. अनेक सोयी -सुविधा रेल्वे प्रवाशांना कोपरगाव रेल्वे स्टेशनवर मिळत आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये निश्चितपणे समाधानाचे वातावरण आहे. अमृत भारत स्थानक योजनेत नवीन पादचारी पुलाची मागणी केली होती, ती मागणी मान्य करण्यात आली. नवा पादचारी पूल होणार आहे. याबद्दल त्यांनी आभार मानले. कोपरगाव- रोटेगाव रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर कोपरगावला दक्षिण भारत जोडला जाणार आहे. माजी आ. अशोकराव काळे यांच्या प्रयत्नातून त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्यात विमानतळाची निर्मिती होवून दुष्काळी भागाचा विकास झाला.कोपरगाव मतदार संघाचा अधिक विकास साधण्यासाठी कोपरगाव रोटेगाव रेल्वे लाईनचा सर्वे तातडीने पूर्ण करून या कामास गती देणे गरजेचे आहे. दक्षिण भारताचे प्रमुख केंद्र म्हणून कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्गाकडे पाहिले जाते. कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्गामुळे संपूर्ण दक्षिण भारत कोपरगावला जोडला जावून कोपरगाव मतदार संघाचा अधिक विकास होणार आहे. याची दखल घेवून या कामाला गती द्यावी. राज्य व परराज्यातून शिर्डी येथे येणारे लाखो भाविक कोपरगाव रेल्वे स्टेशवरुन मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असल्यामुळे कोपरगाव रेल्वे स्टेशनचा विकास होणे गरजेचे होते. यावेळी खा. सदाशिव लोखंडे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता मोहम्मद फैज, स्टेशन प्रबंधक डी. एस. प्रसाद, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य कैलास ठोळे, सुनील कोल्हे, सेवासिंह सहानी, धनंजय कहार आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मवीर काळे साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक व कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. कोपरगावच्या वैभवामध्ये भर पडणार..! रेल्वे स्टेशनचा विकास झाल्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नविन संधी उपलब्ध उपलब्ध होवून, कोपरगाव शहराच्या वैभवात निश्चितपणे भर पडणार आहे. यामुळे केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून अमृत भारत स्थानक योजनेत कोपरगाव रेल्वे स्टेशनचा समावेश केल्याबद्दल केंद्र सरकार व राज्य सरकारचे आ. आशुतोष काळे यांनी आभार मानले. कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या इतरही समस्या मांडून या समस्या देखील रेल्वे विभागाने त्वरीत सोडविण्याची आ. काळे यांनी मागणी केली. The post रेल्वे कामांचे पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन ! आ. आशुतोष काळे appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StKntT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: