प्रवरा-संगमनेरला दिलेल्या उसाची एफआरपी द्यावी

August 13, 2023 0 Comments

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  अशोक सहकारी साखर कारखान्याचे प्रवरा व संगमनेर साखर कारखान्या दिलेल्या थकीत एफआरपी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केली आहे. तसेच झोन बंदी उठविल्याने शेतकरी कोणत्याही कारखान्या ऊस देवू शकतो असे सांगत माजी आ. मुरकुटे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात औताडे यांनी म्हटले की, अशोक सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये गाळपक्षमतेपेक्षा जास्त ऊस ऊस उत्पादकांनी उपलब्ध केलेने अशोक कारखाना संचालक मंडळाकडून सातत्याने गेली वीस वर्षापासून अतिरिक्त उसाच्या नोंदी घेऊन अशोक मार्फत संगमनेर- प्रवरा कारखाण्यांना ऊस दिला जातो. तसेच अशोक कारखान्या कडून कार्यक्षेत्रा बाहेरून अडीचशे किलोमीटर अंतराहून जालना जिल्ह्यातून ऊस आणला जातो. आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस अशोक मार्फत दुसर्‍या कारखान्यांना द्यायचा व आपल्या कारखान्यांना बाहेरून अडीचशे ते तीनशे किलोमीटरवरून ऊस आणायचा याचा परिणाम तोड वाहतुकीवर होत असून अडीचशे ते तीनशे रुपये टन जास्त खर्च तोड वाहतुकीस येतो.परंतु अशोक मार्फत दिलेल्या बाहेरील कारखान्यांना उसाचे बाहेरील कारखाना जास्तीचे पेमेंट करूनही प्रत्यक्ष ऊस उत्पादक सभासदांना त्याचा लाभ होत नाही. अशोक कारखान्याने अशोक कारखान्यात गाळप झालेल्या ऊस उत्पादक सभासदांचा थकीत एफआरपी 213 रुपये प्रति. मे. टन साखर आयुक्तांकडे तक्रार केल्याने व साखर आयुक्तांनी जप्तीचा कारवाई सुरू केल्याने तातडीने पेमेंट केलेले आहे. परंतु अशोक मार्फत बाहेरील दिलेल्या कारखान्याचे पेमेंट अद्याप झालेले नाही.तसेच अशोक कारखान्याचे चेअरमन यांचे कडून प्रवारा- संगमनेर कारखान्याला अशोकच्या कार्यक्षेत्रात घुसू देणार नाही असे वक्तव्य केले गेले. झोनबंदी उठल्याने कार्यक्षेत्राचा विषयच राहिलेला नाही म्हणजेच एकूण अशोक कारखान्यांच्या अध्यक्षांकडून ऊस उत्पादकांची दिशाभूल होत आहे.जो कारखाना जास्तीचा भाव देईल त्या कारखान्यांना ऊस घालण्याचा अधिकार ऊस उत्पादकांना आहे. उसाचा थकीत एफ आर पी संगमनेर कारखाना जो भाव देईल त्या दराने तातडीने अदा करावी, अशी मागणी औताडे यांनी केली आहे. शेतकर्‍यांवर अन्याय होवू देणार नाही अशोक कारखान्याचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय समित पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, अशोक कारखान्याने शेतकर्‍यांवर अन्यायय केल्यास आपण आवाज उठविणार आहे. त्यासाठी कोणतीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी शेतकर्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही, असा खुलासा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केला आहे. गाळपापेक्षा अधिकच्या नोंदी कशा? झोंनबंदी उठलेली असताना अशोक अशोक कारखानाकडून गाळप क्षमतेपेक्षा अधिकच्या नोंदी कश्या घेतल्या जातात ? त्यास साखर आयुक्तांची परवानगी कशी मिळते ? याबाबी संशयास्पद असून याचा परिणाम सातत्याने हार्वेस्टिंग प्रोग्राम वर होत आहे. ऊस उत्पादकांचा व सभासदांचा वजनात घट येऊन साखर उताराही कमी होतो. सदर बाब बेकायदेशीर असल्याचे साखर आयुक्त यांना तक्रार केलेली आहे.   The post प्रवरा-संगमनेरला दिलेल्या उसाची एफआरपी द्यावी appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StYzqg

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: