पारनेर बाजार समितीत वाटाण्याची मोठी आवक

August 12, 2023 0 Comments

पारनेर(नगर); पुढारी वृत्तसेवा : पारनेर बाजार समितीत तालुक्यातून वाटाण्याची मोठी आवक होत असून, शंभरी पार केलेल्या वाटाण्याचे भाव निम्म्याने उतरले आहेत. त्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस न आल्यामुळे तालुक्यात नियमित घेतले जाणारे मुगाचे पीक घेतले गेले नाही जूनच्या शेवटच्या आठवड्यात काही भागात जेमतेम पाऊस झाल्याने या ठिकाणी वाटाणा पिकाकडे शेतकरी वळले. या वर्षी खराब हवामानामुळे उत्पादन क्षमता घटली आहे. तालुक्यातील पारनेर, कान्हूरपठार, भाळवणी परिसर वाटाणा पिकासाठी मुख्य आगार मानला जातो. मात्र, या भागात पाऊस नसल्याने वाटाण्याची पेरणी कमी झाली. पारनेर परिसरात बुगेवाडी, सिद्धेश्वरवाडी, तराळवाडी, हंगे, वडनेर हवेली, गोरेगाव, डिसकळ आदी भागातील वाटाणा सध्या बाजारात येत आहे. पारनेर बाजार समितीने भाजीपाला व फुले खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना जवळच मार्केट उपलब्ध झाल्याने वाहतूक खर्च वाचला. मात्र, दुसरीकडे आवक वाढून भाव कमी झाल्याने पिकाचे पैसे होत नसल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. वाटाणा बियाण्याची चाळीस किलोची बॅग पाच हजार ते सहा हजार रुपयांपर्यंत शेतकर्‍यांनी खरेदी केली. एका वाटाण्याच्या गोणीला उत्पादन खर्च दहा ते बारा हजार रुपयांपर्यंत आला. मात्र, त्या तुलनेत भाव 50 ते 60 रुपये त्यादरम्यानच आले आहेत. ढगाळ हवामानामुळे पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन कमी निघत आहे. वाटाण्याची आवक वाढल्याने पुणे, मुंबई व इतर राज्यांत वाटाण्याचे भाव कमी झाले आहे. त्यामुळे पारनेरमध्येही भाव घसरले आहेत. भाजीपाला व फुलांच्या विक्रीसाठी पुणे, मुंबई येथे जाण्याची शेतकर्‍यांना गरज नाही. – बाबाजी तरटे, सभापती, पारनेर बाजार समिती The post पारनेर बाजार समितीत वाटाण्याची मोठी आवक appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StX3h4

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: