आता सर्वांनाच गणवेश ! राज्य शासनाचा निर्णय

July 07, 2023 0 Comments

नगर : पुढारी वृत्तसेवा : नव्या शैक्षणिक वर्षांच्या प्रारंभी पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय झाला होता. मात्र दारिद्य्ररेषेवरील विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले होते. त्यामुळे काल याबाबत शासनाने मोठा निर्णय घेताना आता उर्वरित सर्वच विद्यार्थ्यांनाही मोफत दोन गणवेश देण्याची तरतूद केली आहे. या वर्षीपासून सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देतानाच आता बूट आणि पायमोजेही मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेतून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातींची सर्व मुले आणि दारिद्य्ररेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येेतो. जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जात आहे. मात्र दारिद्य्ररेषेवरील पालकांच्या सुमारे एक लाख मुलांना मोफत गणवेशाचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनादेखील मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्याचा तसेच मोफत गणवेशांतर्गत सर्व पात्र विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे देण्याचा शासन विचार करत होते. त्यानुसार नगरसह राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना दर वर्षी दोन मोफत गणवेश देण्यास मान्यता दिलेली आहे. तसेच एक जोड बूट व दोन जोड पायमोजे देण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे या वर्षीपासून एकही विद्यार्थी मोफत गणवेशापासून वंचित राहणार नाही. यातून सामाजिक दरीही दूर होणार असल्याने या निर्णयाचे पालकांमधूनही स्वागत करण्यात येत आहे. प्रतिविद्यार्थी तरतूद दोन गणवेशासाठी 600 रुपये एकूण 75.60 कोटी बूट व पायमोज्यासाठी 170 रुपये एकूण 82.92 कोटी हे ही वाचा :  पूर्व हवेलीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट अटळ! Rahul Gandhi defamation case | राहुल गांधींच्या शिक्षेच्या स्थगितीसाठी काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाणार The post आता सर्वांनाच गणवेश ! राज्य शासनाचा निर्णय appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SrpZBG

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: