नगर : रस्त्यांच्या कामासाठी 6 कोटी मंजूर : ना. विखे

July 06, 2023 0 Comments

संगमनेर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील 12 महत्वपूर्ण रस्त्यांच्या कामाकरीता प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 6 कोटी 68 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातून येणारे सर्व रस्तांच्या कामाकरीता प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनोतून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी गावागावातून प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या सर्व प्रस्तावांना मंजूरी मिळून निधीची उपलब्धता व्हावी म्हणून पाठपुरवा केल्यानेे गुंजाळवाडी- राजापूर- निमगाव-भोजापूर-चिकणी या 11 कि मी रस्त्याकरीता 9 लाख 17 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच जिल्हा बॉर्डर- आशापीर बाबा- चिंचोली गुरव- नान्नज दुमाला- बिरेवाडी- सोनोशी मालदाड या गावांना जोडल्या जाणार्‍या रस्त्याच्या कामासाठी 14 लाख 45 हजार, पिंपळे मालदाड संगमनेर या मार्गासाठी 4 लाख 37 हजार, शेडगाव- मांलुजे- डिग्रस- रणखांबवाडी- दरेवाडी-कौठे मलकापूर- म्हैसगाव रस्त्याकरीता 4 लाख 43 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तळेगाव दिघे ते तालुका हद्दीपर्यतच्या मार्गाकरीता 2 लाख 34 हजार, कोल्हेवाडी ते जोर्वे रस्त्या करीता 2 लाख 98 हजार. पिंपरणे ते कोळवाडे शिरापूर रस्त्याकरीता 4 लाख 96 हजार, राजापूर ते राज्यमार्ग क्र 50 चिखली रस्ता 3 लाख 57 हजार, नांदूर खंदरमाळ ते मोरवाडी बावपठार 3 लाख 7 हजार, राज्यमार्ग क्र. 60 घारगाव शेळकेवाडी- अकालापूर या गावातील रस्त्या करीता 3 लाख 31 हजार रूपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. सारोळे पठार ते धादवडवाडी रस्ता 2 लाख 94 हजार, रणखांबवाडी फाटा ते रणखांबवाडी व कुंभारवाडी- वरंवडी रस्त्याकरीता 1 लाख 11हजार असा एकूण 6 कोटी 68 लाख रू निधीला मान्यता मिळाल्याने रस्त्यांची काम गतीने पूर्ण होतील असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला. इतर रस्त्यांसाठीही लवकरच निधी संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणशत निधीला मान्यता मिळाली आहे. यामुळे सर्वच रस्त्ये होणार आहे. राहिलेल्या रस्त्यांचे प्रस्ताव आलेले असून त्यांच्या कामासाठी निधी मंजूर करू असे महसूलमंत्री विखे पा. म्हणाले. The post नगर : रस्त्यांच्या कामासाठी 6 कोटी मंजूर : ना. विखे appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SrldfR

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: