गोदावरी कालवे दुरुस्ती कामांना सुरुवात ; शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण

December 02, 2022 0 Comments

https://ift.tt/pkvqOaZ

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा :  महाविकास आघाडी सरकार असतांना तात्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडून गोदावरी कालवे दुरुस्तीसाठी 300 कोटींचा निधी मजूर करून घेतला आहे. त्यापैकी मंजूर झालेल्या 72 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यापैकी 36 कोटींची कालव्यांच्या दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून निफाड तालुक्यातील रुई, देवगाव व कोपरगाव तालुक्यात ब्राम्हणगाव येथे कालवा दुरुस्तीची कामे सुरु असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघासह निफाड, शिर्डी, राहाता तालुक्यातील अनेक गावातील शेकडो हेक्टर शेती व शेतकर्‍यांचे भवितव्य व अनेक पाणी पुरवठा योजना देखील या गोदावरी उजव्या-डाव्या कालव्यांवर अवलंबून आहे. या दोन्ही कालव्यांमुळे हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येत असून शेती सिंचनाचा, पाणी पुरवठ्याचा भार हे कालवे ब्रिटीश काळापासून वाहत आहे.

नांदूर-मध्यमेश्वर बंधार्‍यापासून 110 किलोमीटर पर्यंत वाहणारा उजव्या व 90 किलोमीटरपर्यंत वाहत जाणारा डाव्या कालव्यांचे आयुर्मान 100 वर्षापेक्षा जास्त झाल्यामुळे अनेकवेळा हे कालवे ठिकठिकाणी फुटून लाखो लिटर पाणी वाया जात होते तर दुसरीकडे छोटे पूल, एस्केप बंधारे, मोर्‍यांची बांधकामे मोडकळीस आल्यामुळे कालव्यांची वहन क्षमता कमी होवून त्याचा मोठा परिणाम सिंचनावर व या कालव्यावर अवलंबून गावातील पाणी पुरवठा योजनांवर होत होता.

The post गोदावरी कालवे दुरुस्ती कामांना सुरुवात ; शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/72ZTnbz
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: