नगर : अखेर तीन गावांना ग्रामपंचायतींचा दर्जा

December 03, 2022 0 Comments

https://ift.tt/TWaow7c

नगर : पुढारी वृत्तसेवा :  नागरदेवळे नगरपरिषद रदृ होताच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी हे तीन गावे त्रिशंकू जाहीर केले. या गावांची लोकसंख्या विचारत घेता, ही गावे त्रिशंकू क्षेत्र म्हणून फार काळ राहणे प्रशासकीयदृष्ट्या उचीत नसल्याने या प्रत्येक गावात स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार या तीनही गावांत स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यास शासनाने हिरवा कंदिल दिला.

या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत अस्तित्वात आल्याने, जनतेला नागरी सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगर तालुक्यातील नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी या तीन ग्रामपंचायती मिळून महाविकास आघाडी सरकारने 20 मे 2022 रोजी नागरदेवळे नगरपरिषदेची अधिसूचना जारी केली. नगरपरिषद स्थापन करण्यात तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पुढाकार घेतला. परंतु या नगरपरिषदेला काही राजकीय नेते व स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. महाविकास आघाडी सरकार पायउतार होताच शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. नवीन सरकार येताच माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी नागरदेवळे नगरपरिषदेची अधिसूचना रदृ करु पुन्हा ग्रामपंचायती स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

त्यांच्या प्रयत्नाला दोन महिन्यानंतर यश आले. राज्य शासनाने 29 ऑगस्ट 2022 रोजी नागरदेवळे नगरपरिषदेची अधिसूचना रदृ केली.
नागरदेवळे नगरपरिषदेचा निर्णय रदृ झाल्यानंतर जिल्ह्यातील या तीनही गावे नगरपरिषद किंवा ग्रामपंचायत हददृीत येत नसल्यामुळे तेथील जनतेला नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही तीनही गावे 4 ऑक्टोबर 2022 रोजी त्रिशंकू घोषित केली. प्रशासकीयदृष्ट्या ही तीनही गावे जादा दिवस त्रिशंकू राहणे योग्य नसल्याने, या गावांना स्वंतत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव दाखल केला.

ग्रामपंचायत अस्तिवात येण्यापूर्वी या गावांना महसुली गावाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने 23 नोव्हेंबर 2022 रोजी नागरदेवळे, वडारवाडी, व बाराबाभळी या तीन गावांना स्वतंत्र महसुली गावांचा दर्जा दिल्याची अधिसूचना जारी केली. महसूली गावांचा दर्जा मिळताच नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी या तीनही गावांत आता स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली आहे. नगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी खरात यांनी या ठिकाणी प्रशासक नियुक्त केले आहेत.

ग्रामपंचायतनिहाय प्रशासक

नागरदेवळे : विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे
वडारवाडी : विस्तार अधिकारी रवींद्र माळी
बाराबाभळी: विस्तार अधिकारी तुपे

नगरसेवक नव्हे तर ग्रा.पं. सदस्यपदासाठी तयारी

नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी या तीनही गावांत नव्याने ग्रामपंचायत अस्तित्वात आली आहे. त्यामुळे येथे आता प्रशासक नियुक्त केला आहे. त्यामुळे या गावांत प्रशासकीय राज सुरु झाले आहे. या ग्रामपंचायतींबाबत राज्य निवडणूक आयोगाला कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यांत या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाचण्याची शक्यता आहे. नगरसेवकपदासाठी प्रयत्न करणार्‍यांना आता ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

The post नगर : अखेर तीन गावांना ग्रामपंचायतींचा दर्जा appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/9YzMSUm
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: