नगर : खर्चमर्यादा हजारांत, प्रत्यक्षात 25 लाखांच्या घरात!

December 06, 2022 0 Comments

https://ift.tt/ELfDQCJ
सरपंचपद

नगर; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदाची निवडणूक लढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा घातली आहे. सरपंचपदासाठी कमीत कमी 50 ते जास्तीत जास्त पावणेदोन लाख रुपये तर सदस्यपदासाठी कमीत कमी 25 हजार ते जास्तीत जास्त 50 हजार रुपये उमेदवारांना खर्च करण्याची मुभा आहे. मात्र, गावचा कारभारी होण्यासाठी सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी तब्बल 25 लाख रुपयांचा चुराडा होतो. मोठ्या ग्रामपंचायतींत हा आकडा मात्र, 50 लाखांच्या घरात जात आहे. सदस्यपदाची निवडणूक अटीतटीची असल्यास दोन -अडीच लाख रुपये खर्च केला जात आहे.

जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींच्या सदस्य व थेट सरपंचपदासाठी सार्वत्रिक निवडणुका 18 डिसेंबर रोजी होत आहेत. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया नुकतीच संपली आहे. सदस्य व सरपंचपदाची निवडणूक लढविण्यासाठी सातवी पास ही शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. तसेच निवडणूक लढविणार्‍या सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे तर मागासवर्गीय उमेदवारांना शंभर रुपये अनामत रक्कम जमा करावी लागत आहे.

विधानसभा व लोकसभा निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना खर्च किती करावा याची मर्यादा घालून दिली आहे. त्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य व सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी देखील उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झालेला एकूण खर्च निकाल लागण्यानंतर 30 दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. खर्च जमा न करणार्‍या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येत आहे.त्यामुळे निवडणूक खर्चाला अधिक महत्त्व आले.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. हा खर्च आटोक्यात आणण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आता उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. सदस्यसंख्येनुसार सदस्य आणि सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे.

छोट्या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी 25 हजार तर मोठ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी जास्तीत जास्त 50 हजार रुपये खर्च करता येणार आहे. सरपंचपदासाठी निवडणुकीसाठी छोटी ग्रामपंचायत असल्यास 50 हजार ते मोठी ग्रामपंचायत असल्यास 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत खर्च करण्यास आयोगाने उमेदवारांना संमती दिली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मतदानाच्या दिवसांपर्यंतचा खर्च उमेदवारांना सादर करणे बंधनकारक आहे.

गेल्या काही वर्षांपासून ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे.त्यामुळे ग्रामपंचायती मालामाल झाल्या आहेत.मोठ्या ग्रामपंचायतीची बजेट देखील मोठेच असते. त्यामुळे अशा ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य होण्यासाठी प्रत्येक राजकीय कार्यकर्ता इच्छुक असतात. त्यामुळे सरपंच व सदस्य होण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत.

भावकीची जिरविण्यासाठी अधिक खर्च
गावचा सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना संपूर्ण गावातील मतदार सांभाळावे लागणार आहे. त्यासाठी खर्च देखील भरमसाठ होणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मातब्बर व्यक्तींनाच उमेदवारी दिली जात आहे. शक्यतो सदस्य व सरपंचपदाच्या निवडणुकीत भावबंदकीलाच एकमेकांशी झुंजावे लागत आहे. त्यामुळे भावबंदांची जिरवण्यासाठी निवडणुकीत मोठा खर्च होत आहे.

The post नगर : खर्चमर्यादा हजारांत, प्रत्यक्षात 25 लाखांच्या घरात! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/fSUzguy
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: