लोकअदालतीत कोपरगाव जिल्ह्यात प्रथम; साडेपाच कोटी रुपयांची वसुली

November 15, 2022 0 Comments

https://ift.tt/ihfkQUg
न्यायाधीशांच्या रिक्त

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एका दिवसात 4 हजार 871 खटले निकाली निघाले असून तडजोडीत 5 कोटी 41 लक्ष 73 हजार 841 रुपयांची वसुली झाली आहे. या माध्यमातून कोपरगाव न्यायालयाचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे. कोपरगाव तालुक्यातील 79 गावांमध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिरेही घेण्यात आली, अशी माहिती जिल्हा न्यायाधीश सयाजीराव कोर्‍हाळे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती व कोपरगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन कोपरगाव न्यायालयात करण्यात आले होते. या लोकन्यायालयात दाखलपूर्व व दाखल असे दोन्ही प्रकारची 10 हजार 893 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये दाखलपूर्व 8 हजार 675 प्रकरणांपैकी 4 हजार 744 प्रकरणे निकाली काढत 2 कोटी 48 लाख 18 हजार 838 रुपयांची वसूली करण्यात आली. दाखल 2218 प्रकरणांपैकी 127 प्रकरणे निकाली काढत 2 कोटी 93 लाख 55 हजार 3 रुपयांची वसूली करण्यात आली.

याप्रसंगी कोपरगाव जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष सयाजीराव कोर्‍हाळे, जिल्हा न्यायाधीश भुजंगराव पाटील, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) शौकत देसाई, सहदिवाणी न्यायाधीश स्वरुप बोस, सह दिवाणी न्यायाधीश महेश शिलार, सहदिवाणी न्यायाधीश भगवान पंडित, दिवाणी न्यायाधीश स्मिता बनसोड, सहकार न्यायाधिश ल. मू. सय्यद, कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष शिवाजी खामकर, कोपरगाव जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. अशोक वहाडणे, कोपरगाव जिल्हा सहाय्यक सरकारी वकील शरद गुजर, सहाय्यक सरकारी वकील अशोक टुपके, मनोहर येवले, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा राज्याचे सचिव बंडू बडे, सागर नगरकर, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, न्यायालयीन कर्मचारी अशोक दहिफळे, सुरज माळवदे, सागर गुरसाळे, राहूल बेडके यांचे सह लोकन्यायालयात दाखल केलेल्या विविध खटल्यांचे पक्षकार, वकील, संबंधित खात्यांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रीय लोकन्यायालयात कोपरगाव न्यायालयाच्या वतीने आठ पॅनल करण्यात आले होते. लोकन्यायालयात फौजदारी प्रकरणे, वाहन अपघात, भुसंपादन प्रकरणे, एन.आय.कायदा 138 ची प्रकरणे आदींचा समावेश होता.

79 गावांमध्ये कायदेविषयक जनजागृती शिबीर
79 गावांमध्ये कायदेविषयक जनजागृती अभियान सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार देशात कायदेविषयक जनजागृती शिबिरे घेण्यात येत आहेत. कोपरगाव तालुक्यातील 79 गावांमध्ये 31 ऑक्टोबर 2022 ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत कायदेविषयक जनजागृती शिबिरे घेण्यात आली. या माध्यमातून सर्वसामान्यांना कायद्याविषयक जनजागृती सहज व सोप्या भाषेत करण्यात आली.

‘अखिल भारतीय विधी जागृती आणि प्रचार अभियान अंतर्गत न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी, प्रशासनातील सर्व घटक, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालय यांच्या माध्यमातून कायदेविषयक जागृती नागरिकांमध्ये प्रभावीपणे करण्यात आली. या अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात खटले निकाली निघाले.
                                                         – सयाजीराव कोर्‍हाळे
                                                           जिल्हा न्यायाधिश

The post लोकअदालतीत कोपरगाव जिल्ह्यात प्रथम; साडेपाच कोटी रुपयांची वसुली appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/M3uTsYC
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: