श्रेयवादाच्या लढाईत नगरकरांचीही उडी ; नारळ फोडत केले उड्डाणपुलाचे उद्घाटन

November 10, 2022 0 Comments

https://ift.tt/s75wW2q

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या श्रेयवादात आता सर्वसामान्य नागरिकांनीही उडी घेतली आहे. बसस्थनाक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील पिलरजवळ नारळ फोडून पुलाचे उद्घाटन केल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. उद्घाटनाचे सेल्फी व फोटो काढून सोशल मिडीयावर अनेकांनी प्रसिद्ध केले. बहुप्रलंबित उड्डाणपुलाचे श्रेय घेण्यासाठी शहरातील राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी शहरातील विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व सामान्य नागरिक एकत्र येत आम्ही ‘ आम्ही अहमदनगरकर’ नावाचा मंच स्थापन केला.

’आम्ही अहमदनगरकर’ या नागरिकांच्या प्रतिनिधींनी आज बुधवारी पुलाचे नारळ फोडून आज उद्घाटन केले. तसेच आजचा हा दिवस ’जनता हक्क दिवस’ साजरा केला. माजी नगरसेवक संजय झिंजे, राजेंद्र गांधी, युनूस तांबटकर, संध्या मेढे, भरत खाकाळ, फिरोज शेख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवरायांचा जयघोष करत अभिवादन केले. माजी नगरसेवक संजय झिंजे म्हणाले, मुळात अनेक बळी घेतलेल्या आणि विलंबाने उभा राहिलेल्या पुलासाठी राजकीय पुढारी यांनी श्रेयवादाची लढाई बंद करावी. या पुलाचे खरे श्रेय जनरेटा उभा करणारे सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता यांचेच आहे.

त्यामुळे उद्घाटन करण्याचा खरा व प्राथमिक हक्क हा शहरातील जनतेचाच आहे. राजेंद्र गांधी म्हणाले की, विलंबाने होत असलेल्या पुलामुळे सर्वसामन्यांचे स्वप्न साकार झाले आहे. 42 नागरिकांचे बळी घेऊन हा पुल उभा राहिला आहे. यापुलाच्या अक्षम्य विलंबामुळे राजकीय लोकांचे तिकीट कापले गेले होते हा इतिहास आहे. पुल यशस्वितेसाठी उड्डाणपुल कृती समितीचे फार मोठे योगदान आहे म्हणून उद्घाटनाचा खरा हक्क सर्वसामान्यांचाच आहे.

भैरवनाथ वाकळे म्हणाले, आज ’जनता हक्क दिवस’ आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी आम्ही अहमदनगरकर सतत कार्यरत राहू. उड्डाणपुलाचे अथवा कोणत्याही विकासकामाचे उदघाटन करणे हा सर्वसामान्य नागरिकांचाच हक्क आहे. यावेळी आसिफखान दुलेखान, ऋषिकेश आगरकर, रामदास वागस्कर, चंद्रकांत माळी, सुनील ठाकरे, अरूण खिची, दिलीप घुले, धनंजय देशमुख, भाऊसाहेब फुलपगारे उपस्थित होते.

The post श्रेयवादाच्या लढाईत नगरकरांचीही उडी ; नारळ फोडत केले उड्डाणपुलाचे उद्घाटन appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/hkC05Gi
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: