जामखेड : अतिवृष्टीचा 23 हजार शेतकर्‍यांना फटका

November 04, 2022 0 Comments

https://ift.tt/YLpCo9D

जामखेड : पुढारी वृतसेवा :  ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे जामखेड तालुक्यातील 23 हजार 656 शेतकर्‍यांची पिके बाधित झाल्याचे पंचनाम्यांनंतर समोर आले आहे. महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी पंचनामे केल्यानंतर तालुका प्रशासनाने 13 हजार 995 हेक्टरवरील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी 22 कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. याबाबतचा अहवाल तहसीलदार योगेश चंद्रे यांनी राज्य शासनाकडे पाठविला असल्याचे सांगितले.

ऑक्टोबर महिन्यात तालुक्यात अनेक भागांत सतत पाऊस पडला होता.तसेच, अनेक महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठ्य प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधकृष्ण विखे पाटील यांनी जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली व तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश महसूल व कृषी विभागास दिले होते. त्यानुसार दिवाळी अखेरपर्यंत पंचनामे करण्यात आले. त्यानंतर बाधित क्षेत्राचे अवलोकन करून त्यानुसार 22 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

जिरायत पिकास 16.31 कोटी
जिरायत पिकांमध्ये 19 हजार 527 शेतकर्‍याचे 11 हजार 990 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने सोयबीन, उडीद, मूग पिकांचा समावेश आहे . बागायत आणि हंगामी बागायत पिकांमध्ये एकूण 4 हजार 129 शेतकर्‍याचे 2 हजार 5 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने मका, तूर, मिरची, वांगे, कांदा, टोमॅटो या पिकांचा समावेश आहे. त्यामुळे जिरायत पिकांसाठी 16.31 कोटी, बागायत पिकांसाठी 5.41 कोटी, अशा एकूण 22 कोटी रुपयांच्या शासकीय अनुदानाची मागणी केलेली आहे.

अकरा घरांची झाली पडझड
अंशतः पडझड झालेल्या 11 घरांसाठी नवीन निकषप्रमाणे 1.65 लाख एवढी अनुदान मागणी करण्यात आलेली आहे . तसेच, या कालवधीत शेतात काम करणार्‍या 1 जनावराचा (बैल) वीज पडून मृत्यू झाल्याने त्यासाठी 30 हजार रूपये अनुदान मागणी करण्यात आली आहे.

सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे
अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांत सर्वाधिक 8 हजार 263 हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे आहे. त्याखालोखाल उडीद 1 हजार 195 हेक्टर, मूग 33 हेक्टर, कांदा 1 हजार 691 हेक्टर, ज्वारी 491 हेक्टर, मका 242 हेक्टर, बाजरी 17 हेक्टर , तूर 1 हजार 868 हेक्टर व इतर पिके 160 हेक्टर आहेत.

The post जामखेड : अतिवृष्टीचा 23 हजार शेतकर्‍यांना फटका appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/EkiuL5O
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: