पाथर्डी: हॉटेल चालकाने पर्स केली परत

October 12, 2022 0 Comments

https://ift.tt/dDbet6j
hotel owners returns purse of customer pathardi ahmednagar

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा: मोहटा देवीला दर्शनासाठी आलेल्या भक्तांची विसरलेली पर्स व त्यातील मौल्यवान दागिने, रोकड हॉटेल चालकाने प्रामाणिकपणे परत केल्याने हॉटेल चालक रवि जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुण्यातील रितेश गायकवाड पत्नी शीतल यांना घेऊन मोहटा देवीच्या दर्शनासाठी आल्या होते.

शहरातील एका लॉजमध्ये या जोडप्याने मुक्कामाला थांबले होते. या लॉजच्या जवळच असलेल्या प्रेम हॉटेलमध्ये ते रात्रीच्या दरम्यान जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते आपल्या लॉजवर परत आल्यानंतर आपली पर्स हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले; मात्र पर्स देवीचे दर्शन घेताना चोरट्याने चोरली की, कुठे तरी पडली. या चिंतेत ते रात्रभर राहिले; मात्र हॉटेल चालक जाधव यांनी ती पर्स ताब्यात घेत हॉटेलमध्ये ठेवली. सकाळीही पर्स न्यायला कोणीही आले नाही म्हणून जाधव यांनी पर्स उघडून आतील कागदपत्रे पहिली असता त्यावर मोबाईलचा नंबर दिसला. त्यांनी फोन करून गायककवाड यांना तुमची पर्स हॉटेलमध्ये विसरुन राहिली असल्याचे सांगितले. यानंतर गायकवाड यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

हॉटेल चालक जाधव यांनी गायकवाड कुटुंबाला पोलिस ठाण्यात बोलावत पोलिस कर्मचारी कृष्णा बडे व दत्तात्रय बढदे याच्या साक्षीने गायकवाड कुटुंबाला पर्स ताब्यात दिली. या पर्समध्ये शीतल गायकवाड यांना जी परीक्षा द्यायची होती तिचे हॉलतिकीट सुद्धा होते.
हे हॉलतिकीट सापडले नसते तर त्यांना ही परीक्षा देता आली नसती. हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाची मौल्यवान दागिने व रोकडची विसरलेली पर्स ग्राहकाला फोन करून परत दिल्याने जाधव यांचे कौतुक होत आहे.

The post पाथर्डी: हॉटेल चालकाने पर्स केली परत appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/kzCQbiM
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: