वाळकी : गावपुढारी लागले निवडणूक तयारीला ; निरोप नसतानाही विविध कार्यक्रमांना हजेरी

October 16, 2022 0 Comments

https://ift.tt/yj1b4Vf

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात डिसेंबरअखेर मुदत संपणार्‍या 28 ग्रामपंचायत ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावपुढारी आपापल्या गावात निवडणुकीसाठी जुळवाजुळव करण्याच्या तयारीला लागले आहेत. मध्यंतरी गायब झालेल्या गावपुढार्‍यांमध्ये अचानक ‘आपुलकी’ची भावना उदयास आल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत मागील महिन्यात पार पडली. या निवडणुकीसाठी मतदारयाद्यांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतला आहे. मतदारांच्या हरकतीनंतर दि.21 ऑक्टोबर रोजी सुधारित मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

त्यामुळे गावपुढारी गावच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड पुन्हा जनतेतून होणार असल्याने, या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. तालुक्याच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केलेल्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. गावागावात कार्यकर्त्यांची जमवाजमव करणाचे काम हाती घेतल्याचे दिसत आहे . तालुक्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या वाळकी, नागरदेवळे, सारोळा कासार, कापूरवाडी, नेप्ती यासारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असल्याने, तालुक्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपात राजकीय सामना रंगणार आहे. तर, काही ठिकाणी भाजपाचे दोन्ही गट एकमेकांविरोधात भिडणार असल्याचे चित्र आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लक्षात घेता ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे.

या गावांत होणार निवडणुका

वाळकी, नागरदेवळे, सारोळा कासार, राळेगण म्हसोबा, नारायणडोहो, वडगाव तांदळी, आठवड, खातगाव टाकळी, पिंपळगाव लांडगा, रांजणी, बाबुर्डी बेंद, पिंपळगाव कौडा, दहिगाव, कापूरवाडी, सोनेवाडी (पिला), शेंडी, टाकळी खातगाव, आगडगाव, सोनेवाडी (चास), मदडगाव, पांगरमल, उक्कडगाव, जखणगाव, कौडगाव (जांब), नांदगाव, नेप्ती, साकत खुर्द, सारोळाबद्धी.

राजकीय लाभासाठी रस्सीखेच
ग्रामपंचायत निवडणुकीची चाहुल लागल्याने गावपुढारी सक्रिय झाले आहेत. जनावरांमध्ये आलेल्या लंपी आजाराच्या साथीचा राजकीय लाभ मिळविण्यासाठी गावागावातील दोन्ही गट धडपडत आहेत. सध्या पावसाने तलाव, बंधारे तुडुंब भरल्याने जलपूजन करण्यासाठी दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच दिसून येत आहे. सोशल मीडिीयावर विकासकामांचे चित्र रंगविले जात आहे.

The post वाळकी : गावपुढारी लागले निवडणूक तयारीला ; निरोप नसतानाही विविध कार्यक्रमांना हजेरी appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/VBUzah2
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: