शेवगाव : चार कारखान्यांचा एफआरपी हप्ता जाहीर

October 15, 2022 0 Comments

https://ift.tt/Nq5HtQz

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : कपात केलेली उसाची रक्कम दिवाळीच्या आत द्या, अन्यथा प्रशासनाच्या दारात दिवाळी साजरी करण्याचा इशारा विविध संघटनांनी बैठकीत दिला. कार्यक्षेत्रातील उसाचा खर्च कार्यक्षेत्राबाहेराप्रमाणे न लावता शेतकर्‍यांना एफआरपी व्यतिरिक्त दोनशे रुपये दर जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, याच बैठकीत केदारेश्वरने एफआरपीचा पहिला हप्ता 2400 रुपये, ज्ञानेश्वरने 2286 रुपये, गंगामाई 2317 रुपये, तर वृद्धेश्वर कारखान्याने 2300 रुपये देण्याचे जाहीर केले.

शेवगाव तहसील कार्यालयात काल चालू हंगामातील ऊसतोड समस्यांबाबत अधिकारी, कारखाना प्रतिनिधी, शेतकरी संघटना, ऊस उत्पादक शेतकर्‍यांची बैठक तहसीलदार छगन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस साखर संघाचे प्रतिनिधी तथा लेखापाल संतोष पवार, एम.के शिंगाडे, वजन मापे निरीक्षक अनुप कुलकर्णी, मोटार वाहन निरिक्षक धनंजय देवकर, सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता रामेश्वर राठोड, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागूल, नायब तहसीलदार मयूर बेरड, महसूल सहायक संतोष गर्जे, ज्ञानेश्वर कारखान्याचे शेतकी अधिकारी एस.एस.आहेर, डी.बी.देशमुख, केदारेश्वरचे कार्यकारी संचालक आर. एम. गर्जे, ए.डी. विखे, गंगामाई कारखान्याचे शेतकी अधिकारी आर. एस. कचरे, ए.के. मुखेकर, आर. ए. झिरपे, वृद्धेश्वर कारखान्याचे एस. सी. तुपे यांच्यासह संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

कारखान्यांनी गतवर्षी झालेल्या बैठकीत आश्वासित केलेल्या उपाययोजना केल्या नाहीत. यामुळे शेतकर्‍यांना ऊसतोडणीसाठी द्यावे लागलेले पैस परत मिळण्याची मागणी सुरवातीलाच करण्यात आली. वृद्धेश्वर व ज्ञानेश्वर कारखान्यांनी ऊस पेमेंटमधून रक्कम कपात केल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देताच ‘ज्ञानेश्वर’ने सदर रक्कम ठेवीपोटी कपात केली. त्याचे व्याज देण्यात येणार आहे. वृद्धेश्वर कारखान्याने शेतकर्‍यांची संमती घेतल्याचे उत्तर संबंधित कारखाना प्रतिनिंधींनी दिले. मात्र, त्यावर आक्षेप घेऊन कारवाईची मागणी केल्याने, एफआरपीतून कपात करता येत नाही.

प्रादेशिक साखर सह संचालक यांना कळविण्यात येईल, ते ऑडिटर नेमतील व वस्तुस्थिती अहवाल आल्यानंतर कारवाई होईल, असे आश्वासन साखर संचालक प्रतिनिधी संतोष पवार यांनी दिले. कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करावेत, ते करता येत नसतील, तर जुने काटे बसवावेत, शेतकर्‍यांना बाहेरुन ऊस वजनमाप करण्यास विरोध करू नये, तसेच ऊसउत्पादकांसमोर कारखान्यावर वजन करावे. महागाई वाढल्याने कारखान्यांनी एफआरपी व्यतिरिक्त शेतकर्‍यांना 200 रुपये दरवाढ द्यावी, कार्यक्षेत्रातील ऊसाची अगोदर तोडणी करावी, अशी मागणी केली.

ज्ञानेश्वर 109 रुपये व वृद्धेश्वर कारखान्याने 125 रुपयांप्रमाणे केलेली कपात ही दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांंच्या बँक खात्यांत जमा करावी, अशी मागणी लावून धरत यंदाची एफआरपी जाहीर करावी, अशी मागणी केल्याने केदारेश्वरने एफआरपीचा पहिला हप्ता 2400 रुपये, ज्ञानेश्वरने 2286 रुपये, गंगामाई 2317 रुपये, तर वृद्धेश्वर कारखान्याने 2300 रुपये देण्याचे जाहीर केले.
बैठकीस वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, बाळासाहेब फटांगडे, प्रशांत भराट, दत्तात्रय फुंदे, आपचे अशोक शिंदे, कम्युनिस्टचे बापूराव राशीनकर, बबन पवार, अमोल घोलप, संतोष गायकवाड, मच्छिंद्र आर्ले, भगवान गायकवाड, अमोल देवढे, गोरक्षनाथ काकडे, संदीप मोटकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष
मागील वर्षी राज्यात पहिल्या ऊसतोडीमुळे ऊसउत्पादक शेतकर्‍यास आत्महत्या करण्याची घटना येथे घडली. मात्र, एकाही कारखान्याने त्यांच्या कुटुंबाला मदत केली नाही, अशी खंत बैठकीत व्यक्त करण्यात आली .

The post शेवगाव : चार कारखान्यांचा एफआरपी हप्ता जाहीर appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/KmLz6nB
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: