कोपरगाव : चितळी बॉटलिंगमध्ये बनावट दारूसाठा जप्त

October 02, 2022 0 Comments

https://ift.tt/RGLsH73

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील देशी मद्य निर्माण करणार्‍या चितळी बॉटलींग प्रा. लि.च्या श्रीरामपूर व अ.नगर येथील गोदामांवर छापे टाकुन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या बॉबी एम्बॉस बॉटल्सचा मोठा साठा जप्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे. चितळी बॉटलींग प्रा. लि. यांचा श्रीरामपूर एमआयडिसीमध्ये देशी मद्य निर्मितीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यात तयार होणारे देशी मद्य त्यांनी बॉबी एम्बॉस बॉटलमध्ये भरून त्यातुन बाजारात विक्रीची व्यवस्था सुरू असल्याची माहिती कोल्हे साखर कारखाना व्यवस्थापनास मिळाली.

यानंतर कोल्हे कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका (क्र.28181/2022) दाखल केली होती. यात कोर्ट रिसीव्हर यांच्यामार्फत 22 सप्टेंबर 2022 रोजी चितळी बॉटलींग प्रा. लि. (खंडाळा, ता. श्रीरामपूर व अ. नगर) येथील गोदामांवर छापे टाकण्यात आले.
तेथील मद्य साठ्याची 23 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळपर्यंत तपासणी करण्यात आली असता, चितळी बॉटलींग हे बॉबी एम्बॉस बॉटल मोठ्या प्रमाणात वापरत असल्याचे आढळले. त्यांच्या गोदामातुन बॉबी एम्बॉस बॉटलचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
दरम्यान, छापे टाकल्याचे वृत्त प्रकाशित होताच बनावट दारु बनविणार्‍यांचे धाबे दणाणल्याची चर्चा झडत आहे.

कोल्हे कारखान्याकडे ‘कॉपीराईट रजिष्टर!’
सहकार महर्षी कोल्हे साखर कारखान्याने बॉबी एम्बॉस बॉटल कॉपी राईट व ट्रेड मार्क अ‍ॅक्टखाली रजिष्टर केले आहे. हे सर्व अधिकार सहकार कोल्हे कारखान्याकडे आहेत. बॉबी एम्बॉस बॉटल वापरून त्यातुन अन्य देशीमद्य उत्पादकांना विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे.

The post कोपरगाव : चितळी बॉटलिंगमध्ये बनावट दारूसाठा जप्त appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/D6UEBsI
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: