मुल्ला कटरचे दोन जोडीदार मालेगावातून उचलले

October 01, 2022 0 Comments

https://ift.tt/gVyi3rW

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील बहुचर्चित अल्पवयीन मुलीचे अपहरणप्रकरणी इमरान कुरेशी याचे दोन साथीदार पप्पू गोरे व सचिन पगारे (दोघे रा. वार्ड नंबर 2, श्रीरामपूर) यांना श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी पहाटे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात शिताफीने ताब्यात घेतले. दरम्यान, या दोघांनी पोलिसांनी श्रीरामपूरला आणून  सुनावल्याची माहिती डीवायएसपी संदीप मिटके यांनी दिली.

मुल्ला कटरसह त्याच्या साथीदारांविरोधात अल्पवयीन मुलींसोबत लग्न करणे, त्यांना वेश्या व्यवसायास लावणे, धर्मांतरित करणे, अत्याचार करणे यासारखे गंभीर आरोप आहेत. मुल्ला कटर व त्याच्या साथीदारांविरोधात चार ते पाच गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचा तपास पोलिस करीत आहेत.  ही कामगिरी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके, पो. नि. हर्षवर्धन गवळी, स.पो.नि. अतुल बोरसे व पोलिस गौतम लगड, रमेश गावडे, रमिझ अख्तार आदींनी केली.

The post मुल्ला कटरचे दोन जोडीदार मालेगावातून उचलले appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/pKcwC9S
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: