नगर : 65 शाळांच्या क्रीडांगण विकासासाठीचं टेंडर ‘काय-द्याय’च्या कचाट्यात!

October 20, 2022 0 Comments

https://ift.tt/ZwHjero

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा परिषदेच्या सुमारे 65 शाळांच्या क्रीडांगण विकासासाठी मंजूर 4 कोटींचा निधी खर्च करण्यात क्रीडा आणि शिक्षण विभागाला अपयश आले आहे. क्रीडांगण कामांची टेंडर प्रक्रिया, शाळांच्या मुख्याध्यापकांना अंधारात ठेवून ठराविक ठेकेदाराला वाटलेली कामे, हाच मुळात वादाचा मुद्द ठरला. त्यामुळे आता मुदतीत ही कामे न झाल्यास कोट्यवधींचा निधी शासनाला मागे करण्याची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच काही गटशिक्षणाधिकार्‍यांनी मुख्याध्यापकांची बैठक घेवून क्रीडांगणाचा निधी खर्च करा, अन्यथा तो मागे जाईल, यासाठी कान टोचले आहेत.

क्रीडांगण विकास योजना ही जिल्ह्यात चांगलीच गाजली. या योजनेतून शाळांच्या क्रीडांगण विकासासाठी प्रत्येक शाळेला 7 लाखांचा निधी दिला जातो. जिल्ह्यात अशाप्रकारे 65 शाळांची निवड करण्यात आली होती. हा निधी त्या त्या शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक यांच्या संयुक्त समग्रच्या बँक खात्यात जमा होतो. मात्र, या कामांचे टेंडर कोण करते, ती कामे कोणाला दिली जातात, ती कशी दिली जातात, याविषयी क्रीडा आणि शिक्षण विभाग टोलवाटोलवी करत होते. तसेच मुख्याध्यापकांनीही कामे निकृष्ठ झाली आहेत, कामे देताना आम्हाला विचारले नाही, अशा तोंडी तक्रारी मांडल्या होत्या. या संदर्भात ‘दै. पुढारी’ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर ही कामे ठप्प करण्यात आली.

आता दोन दिवसांपासून पुन्हा एकदा हेच क्रीडांगण चर्चेत्त येऊ लागले आहे. एका तालुक्यातील गटशिक्षणाधिकार्‍यांनी ‘त्या’ सहा मुख्याध्यापकांना बोलावून घेत क्रीडांगणाचा निधी तुमच्या पातळीवर लवकरच खर्च करा, अन्यथा तो मागे जाईल, असेही सांगितले आहे. मात्र, ज्या कामाचे टेंडर संबंधित शाळांनी केलेच नाही, तर बिले काढण्याची जबाबदारी आमच्यावर का? अशा कामाचे बिले का काढायची, उद्या चौकशी झाली, तर दोषी कोण, याविषयी मुख्याध्यापकांमध्येच संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे क्रीडा आणि शिक्षण विभागातील असमन्वयामुळेच हा कोट्यवधीचा निधी मागे जाण्याची भिती निर्माण झाली आहे.

मुदतवाढ द्यावी; पण..!
शाळेच्या क्रीडांगणासाठी आलेला निधी इतर अडचणींसोबतच पावसामुळेही खर्च करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे हा निधी मागे जाऊ नये. त्यासाठी मुदतवाढ मिळावी, असा मुख्याध्यापकांचा सूर आहे. तसेच पुन्हा टेंडर प्रक्रिया राबवावी, त्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांना द्यावेत, अशीही मागणी पुढे येत आहे. होय, क्रीडांगण कामांबाबत मुख्याध्यापकांशी चर्चा केली आहे. जी कामे पूर्ण झालेली आहेत, तसेच जी अपूर्ण आहेत, ती पूर्ण करून घ्या. तसेच ही बिले काढली नाही, तर तो निधी मागे जाऊ शकतो. मग ठेकेदार शाळेकडे तगादा लावेल. त्यामुळे लवकरात लवकर ही बिले काढावी, अशा सूचना केल्या आहेत.
एक गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती

शासनाकडून क्रीडांगण विकास योजनेसाठी निधी मंजूर आहे. मात्र क्रीडांगण कामासाठी ठराविक मुदत दिलेली असते. त्यात जर कामे झाली नाही, तर तो निधी मागे जाऊ शकतो. पावसाळा असल्याने कामे होऊ शकलेली नसतील. कदाचित याबाबत शिक्षण विभागाकडून मुदतवाढीची मागणी होऊ शकते.
                                                         – भाग्यश्री बिले, क्रीडा अधिकारी, नगर

The post नगर : 65 शाळांच्या क्रीडांगण विकासासाठीचं टेंडर ‘काय-द्याय’च्या कचाट्यात! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/USXCcGn
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: