नगर : जिल्हा परिषदेतील अर्थ विभागातील 11 कर्मचार्‍यांना ‘पदोन्नती’चे अकरा दिवाळी गिफ्ट

October 20, 2022 0 Comments

https://ift.tt/6OgXd2y

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा परिषदेतील अर्थ विभागातील 11 कर्मचार्‍यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी वरिष्ठ पदावर पदोन्नती दिली.  दिपावलीच्या कालावधीतच पदोन्नती मिळाल्याने संबंधित कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाची दिवाळी आणखी गोड होणार आहे. कनिष्ठ लेखाधिकारी या संर्वगातील एस.डी. पालवे यांची जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, एस.जी. गायकवाड यांची श्रीगोंदा पंचायत समिती, आर.एम.डोंगरे यांची अर्थविभाग नगर, व्हि.आर. बर्डे यांची पंचायत समिती शेवगाव, डी. व्ही. साळवे यांची पंचायत समिती पारनेर, एस.बी. कोल्हे यांची पंचायत समिती पाथर्डी येथे सहायक लेखाधिकारी या पदावर पदोन्नती दिली.

वरिष्ठ सहायक लेखा संवर्गातील एस.जी. पठारे यांना सेवाज्येष्ठतेनुसार अर्थविभाग नगर, ए.डी. सोनवणे यांना सेवाज्येष्ठतेने राहुरी या ठिकाणी कनिष्ठ लेखाधिकारी या पदावर पदोन्नती दिली आहे. कनिष्ठ सहायक या संवर्गातील के.एच.येळपणेकर यांना कर्जत, एस.के. शिंदे यांना राहाता येथे वरिष्ठ सहायक लेखा पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

The post नगर : जिल्हा परिषदेतील अर्थ विभागातील 11 कर्मचार्‍यांना ‘पदोन्नती’चे अकरा दिवाळी गिफ्ट appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/58vFsTJ
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: