अकोले: शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे फक्त घोषणा आणि दिखावा; किसान सभेचा एल्गार

https://ift.tt/5Ftqxy8
maharashtra kisan sabha session started in Akole ahmednagar

अकोले, पुढारी वृत्तसेवा : राज्यात परतीच्या पावसामुळे पिके पाण्यात गेल्याने राज्यभर ३६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आपत्तीच्या काळात सरकारने तातडीने भरपाई व मदत देणे अपेक्षित असताना राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार मात्र केवळ घोषणा व दिखावा करत आहे. त्यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनात सलग तीन दिवस ओला दुष्काळ, शेती संकट व ज्वलंत शेतकरी प्रश्नांवर विचार विनिमय करून शेतकरी आंदोलनाच्या वाटचालीची पुढील दिशा निश्चित करणार आसल्याची माहिती किसान सभेचे डॅा.अजित नवले यांनी दिली.

सोमवार ३१ ऑक्टोबर रोजी अकोलेमध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाला उत्साहात सुरुवात झाली. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर असे तीन दिवस चालणाऱ्या अधिवेशनासाठी किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष, डॉ. अशोक ढवळे, केंद्रीय कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद, किसान सभेचे नेते आ.जे.पी. गावीत, किसन गुजर, डॉ. अजित नवले यांच्यासह ६५ राज्य कौन्सिल सदस्य व महाराष्ट्रभरातून २३ जिल्हा अधिवेशनांमध्ये निवडण्यात आलेले ३०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांची भव्य रॅली संपन्न झाली. बाजारतळ येथून निघालेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामीण श्रमिक व कामगार सहभागी झाले होते. शेतकरी रॅलीनंतर महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे पत्रकार परिषद व जाहीर सभा घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. अशोक ढवळे, पी. कृष्णप्रसाद, जे.पी.गावीत, आ. विनोद निकोले, किसन गुजर, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख व अर्जुन आडे यांनी संबोधित केले.

यावेळी मोदी सरकारही सातत्याने शेतकरीविरोधी व कॉर्पोरेटधार्जिणे धोरण राबवीत आहे. देशभर यामुळे शेती संकट अधिक तीव्र होत असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, असे नवले यांनी सांगितले. एक वर्षभराच्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनामुळे मोदी सरकारला तीन कृषी कायदे रद्द करावे लागले. पण शेतकऱ्यांना कायदेशीर व रास्त आधारभाव, कर्जमाफी, सर्वंकष पीक विमा योजना, वाढीव पेन्शन, सिंचन, वीज, रेशन व अन्नसुरक्षा असे अनेक ज्वलंत प्रश्न प्रलंबित आहेत. दुसरीकडे वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, देवस्थान, इनाम, वरकस व इतर जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करणे हे सुद्धा जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर देशाची राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, आर्थिक-सामाजिक न्याय यांचे संरक्षण आणि संवर्धन हे आज कळीचे प्रश्न बनले आहेत. किसान सभेच्या अधिवेशनात या सर्व प्रश्नांवर सखोल चर्चा करून लढ्याची पुढील दिशा ठरणार असल्याचेही वक्त्यांनी सांगितले.

The post अकोले: शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे फक्त घोषणा आणि दिखावा; किसान सभेचा एल्गार appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/lrFPfNs
via IFTTT

अकोले : अवैध दारूविक्रीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन

https://ift.tt/quyFQnB

अकोले : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शाहुनगर व राजूर मध्ये अवैध दारू विक्री थांबत नसल्याने या परिसराला भेट देऊन वस्तुस्थिती बघावी असे पत्राद्वारे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दारुबंदी चळवळीचे प्रणेते हेरंब कुलकर्णी यांनी दिले आहे. अहमदनगर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक राकेश ओला रुजू झाल्यावर अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत पहिल्याच बैठकीत आदेश दिले याचे आम्ही स्वागत करतो. दारुबंदी चळवळीने नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अवैध दारू बंद व्हावी म्हणून दि.१५ ऑगस्ट ला शाहुनगर मध्ये आंदोलन केले पण अजूनही दारू थांबत नाही. ज्या शाहूनगर मध्ये आजपर्यंत २३ मृत्यू झाले त्याठिकाणी आंदोलन करूनही आता पुन्हा दोन महिलांनी दारु विक्री सुरू केली आहे.

राजूर या गावात दारूबंदी असूनही खुलेआम दारू विकली जात आहे.यासंदर्भात ३० सप्टेंबर रोजी अकोले येथे पोलीस स्टेशनला बैठक होऊन सुद्धा काहीही फरक झालेला नाही. तर संगमनेर येथील पोलिस उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांच्याशी संपर्क साधूनही अपेक्षित परिणाम झाला नाही. तर वास्तविक १५ ऑगस्ट च्या आंदोलनात त्यांनी दारू बंद करण्याचा शब्द दिला होता. पण आता त्यांचे मुख्यालय असलेल्या संगमनेर येथूनच दारू येते आहे. असे या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनातील मागण्या :

शाहूनगर येथे पुन्हा दारूविक्री सुरू झाल्याने तेथील विक्रेते तातडीने तडीपार करावे व तेथे दारू देणाऱ्या दुकानांवर कारवाई करावी.

राजूर येथे पूर्णवेळ पोलीस निरीक्षक नियुक्त करून दारूविक्रेत्यावर झालेल्या केसेस एकत्र करून तडीपार प्रस्ताव करावेत.

राजूरचे अनेक पोलीस दारूविक्रेत्याना सामील असल्याने ज्यांच्या बिट मध्ये दारूविक्री होते त्यांना निलंबित करावे.

इंदोरी फाट्यावरील हॉटेल सह्याद्रीमधून दारूविक्री होत असल्याने हे हॉटेल कायमस्वरूपी सील करण्याबाबत आपण इतर विभागांना पत्र द्यावे.

आपण संगमनेर उपविभागीय अधिकारी, अकोले, राजूर पोलीस स्टेशन यांना अवैद्य दारू विक्री बाबतच्या विविध मागण्यांबाबत योग्य ते आदेश द्यावेत. अन्यथा पुढील आठवड्यात अकोले दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते राजूर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करणार असल्याचे पत्र दारूबंदी चळवळीचे प्रणेते हेरंब कुलकर्णी यांनी दिले आहे.

 

अकोले तालुक्यातील राजुर, कोतुळ, विरगाव फाटा परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्याच्या मिळकतीवर सुमारे १ लाख रुपयाचा बोजा चढवण्यात आला असुन दारूबंदी अधिनियम ९३ अन्वये १२ अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
                        – आर.डी वाजे. निरिक्षक. उत्पादन शुल्क विभाग. संगमनेर.

The post अकोले : अवैध दारूविक्रीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/FDn8dau
via IFTTT

नगर जिल्ह्यातील 259 गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार!

https://ift.tt/XU3IusM

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील गावोगावच्या गावठाणातील घरे आणि जागांचा ड्रोनद्वारे सर्व्हे केला जात आहे. अकोले वगळता उर्वरित 13 तालुक्यातील ड्रोन फ्लाईंग मोजणीचे काम शंभर टक्के झाले आहे. आता नकाशे तयार होऊन चौकशीनंतर संबंधित गावे आणि त्यातील मालकी असलेल्या नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड तयार होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील 259 गावांमधील प्रॉपर्टी कार्ड तयार झाले आहे. पूर्वी मूळ सर्व्हे हा शेतजमिनीचाच झाला होता. त्यावेळी गावठाणचा सर्व्हे झालेला नव्हता. त्यामुळे गावठाणमधील नकाशे नव्हते, कोणाचे अतिक्रमण आहे, तेही सिद्ध होत नव्हते.

केवळ ग्रामपंचायतीचा उतारा हाच एकमेवर आधार असायचा. राज्यात अशाप्रकारे 40 हजार गावठाण असून, त्यांची नकाशे प्रशासनाकडे नव्हते. त्यामुळे 2021 मध्ये केंद्र सरकारने स्वामीत्व योजनें तर्गत गावठाणचे नकाशे तयार करून प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यासाठी काम सुरू केले. ड्रोनद्वारे गावठाण मोजणीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या खुल्या जागा, घरे, रस्ते, नाले यांचे क्षेत्र व सीमा निश्चित केल्या आहेत. सर्वेक्षण झालेल्या गावामध्ये चौकशीचे कामही अंतिम टप्यात आहे. त्यानंतर मिळकतीचा नकाशा तयार होईल. याशिवाय कायदेशीर हक्काचा अधिकार अभिलेख मिळकत पत्रिका स्वरुपात तयार होणार आहे. मिळकत पत्रिका तयार झाल्याने त्यावर कर्ज घेणे सुलभ होणार आहे. ड्रोनद्वारे मोजणीत प्रत्येक गावठाणातील मालमत्तांची मोजणी अवघ्या 10 ते 15 मिनिटांत पूर्ण होत आहे. या मोजणीमध्ये गावठाणातील गावांची हद्द, मालमत्तांचे क्षेत्र, मालकी रस्ते आदी माहिती उपलब्ध होणार आहे.

 

स्वामित्व योजनेमुळे प्रत्येकाला त्यांच्या मालकी हक्काचा पुरावा, सनद व नकाशा मिळणार आहे. आतापर्यंत 259 गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार झालेले आहेत. तसेच उर्वरित राहिलेल्या गावांचे चौकशी काम पूर्ण करण्याचे नियोजन झाले आहे. दरमहा 50 गावे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ग्रामपंचायतींचे यातून उत्पन्न वाढेल, व नागरिकांना मिळकतीवर तारण कर्ज मिळू शकणार आहे.
                             – सुनील इंदुलकर , जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, नगर

3 तालुक्यांमध्ये ड्रोनद्वारे मोजणी पूर्ण!
जिल्ह्यातील नगर, राहुरी, श्रीरामपूर, राहता, कोपरगाव, संगमनेर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या तालुक्यातील गावठाण असलेल्या गावातील जमिनीची ड्रोनद्वारे मोजणीचे काम झाले आहे. तर अकोलेत युद्धपातळीवर काम सुरू आहे. या ठिकाणी मिळकतीची चौकशी काम सुरू होते. ड्रोनफ्लार नंतर सर्व्हे ऑफ इंडियाकडून नकाशे भूमी अभिलेख कार्यालयास उपलब्ध होतात. त्यानंतर या मिळकतींचा जीआयएस एरिया काढला जातो.

855 गावांत ड्रोन फ्लाईंग सर्व्हे पूर्ण!
नगर जिल्ह्यातील 1031 गावांपैकी 855 गावात ड्रोन फ्लाईंग सर्व्हे पूर्ण झाले आहे. हे ड्रोन फ्लाईंग झाल्यानंतर आता मिळणार्‍या नकाशांतून जीओ मॅप तयार केला जाईल. त्यात अक्षांश रेखांशद्वारेचे ते नकाशे असणार आहेत. त्यानंतर संबंधित नकाशांच्या आधारे अधिकार्‍यांकडून प्रत्यक्षात मालकीची पाहणी होईल. काही त्रुटी किंवा चूक आढळल्यास त्यात दुरुस्ती होऊन प्रॉपर्टी कार्ड तयार होणार आहे.

प्रॉपर्टी कार्ड धारक गावांची संख्या!
राहाता 19, संगमनेर 62, राहुरी 46, नगर 54, जामखेड 55, श्रीरामपूर 17, नेवासा 6 अशा संबंधित 259 गावांचे चौकशीचे काम पूर्ण झाले आहे, त्यामुळे 259 गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार झालेले आहेत. तसेच 102 गावे परीक्षणासाठी उपलब्द्ध झाली आहेत.

The post नगर जिल्ह्यातील 259 गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/e5lDXkn
via IFTTT

सामान्यांची स्थावर मालमत्ता धोक्यात ! नेवासा तालुक्यात सरकारी यंत्रणेला हाताशी धरून मोक्याच्या जागा गिळंकृत

https://ift.tt/h1Wied5

नेवासा : पुढारी वृत्तसेवा  : तालुक्यातील मोक्याच्या जागा बळकावणार्‍यांना सर्वच शासकीय यंत्रणांचे सहकार्य मिळत असल्याने, सामान्य जनतेच्या स्थावर मालमत्ता धोक्यात आल्या आहेत.या प्रकाराने जनतेचे धाबे दणाणले आहेत. नेवासा, नेवासा फाटा, तसेच परिसरातील कोणतीही स्थावर मालमत्ता सध्या सुरक्षित नाही. कागदपत्रांमध्ये फेरफार करून व बनावट नकाशे तयार करून जमिनी बळकावण्याचा धंदा सध्या मोठ्या प्रमाणात अधिकार्‍यांच्या सहकार्याने तालुक्यात सुरू आहे.

मुळा धरणाची निर्मिती झाल्यापासून प्रवरा खोर्‍यातील नेवासा तालुका हा जिरायत असलेला भाग बागायत झाला. त्यामुळे या भागातील जमिनींना मोठे मोल आले. तसेच नगर-औरंगाबाद महामार्ग, औरंगाबाद आणि नगर औद्योगिकीकरणानंतर महामार्गावर नेवासा फाटा या ठिकाणाला मोठे महत्त्व आले. या ठिकाणी व्यवसायाबरोबर बकालपणा वाढताना मोक्याच्या जागा बळकावणे, तसेच अतिक्रमणे वाढली. गेल्या काही वर्षांत या वाहत्या गंगेत हात धुताना शासकीय अधिकारी सर्वात पुढे झाले. त्यामुळे या अतिक्रमणांना खोटी कागदपत्रे तयार करून व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे.

नुकत्याच घडलेल्या अशा काही घटनांचा माहिती घेतली असता, असे निदर्शनास येते की तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील काही कर्मचारी आणि जमीन व्यवसायातील दलाल यांचे अशा बनावट कामांमध्ये साटेलोटे आहे. उतारा एका बाजूला, मोजणी केलेली जमीन दुसर्‍या बाजूची, एका मालकाची जमीन मोजून देत असताना दुसर्‍या लगतच्या मालकाची कुरापत काढणे, जमीन मालकांमध्ये भांडणे लावून देणे, एखाद्याची जमीन कमी मोजून देणे, मोजणीनंतर उभय पक्षांमध्ये वाद निर्माण राहतील, अशी व्यवस्था करणे, तालुका भूमि अभिलेख कार्यालयातील सरकारी कर्मचार्‍याने कामांसाठी अवैधरित्या खासगी व्यक्तींना नेमणे, मोजणी करताना कुठल्याही नियमांची अंमलबजावणी न करता कागदावरच नकाशा तयार करून मोजणी झाल्याचे दाखविणे, असे अनेक गैरप्रकार भूमी अभिलेख कार्यालयात उघडकीस आले आहेत.

कार्यालयातील वादग्रस्त कर्मचारी संग्राम लवांडे हा गेल्या सात वर्षांपासून या कार्यालयात कार्यरत आहे. त्याने अनेक प्रकरणांमध्ये मूळ मालकांच्या दस्तात अवैधरित्या फेरफार केले आहेत. एका मालकाची जमीन त्या भागात अस्तित्वात नसलेल्या उतार्‍यावर दाखविण्याचा प्रताप नुकताच संग्राम लवांडे याने केला. हे करत असताना साक्षीदार पंचांच्या खोट्या सह्या घेणे, कागदावर चुकीचे दिशा निर्देशन करणे, दुसर्‍याच्या नावे असलेली मोजणी स्वतःच्या नावावर करून घेणे, लगतच्या कब्जेदाराला नोटिसा न पाठविता परस्पर मोजणी करून देणे, मोजणीसाठी सरकारी दप्तरातील नकाशा न वापरता दलालांनी पुरविलेला नकाशा फेरफार करून वापरणे व बनावट प्रकरण बनविण्यासाठी अशा दलालांना मदत करणे, अशी कार्यपध्दती आढळून आली आहे.

या कर्मचार्‍यांविरुद्ध कार्यालय प्रमुख उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे डॉ. करणसिंह घुले यांनी रितसर तक्रार केली असून, त्यावर कार्यालयाकडून फौजदारी गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली आहे. फाट्यावरील डॉ. घुले यांच्या मालकीच्या जमिनीची लवांडेने परस्पर काही दलालांना मोजणी करून दिल्याचे नुकतेच निष्पन्न झाले आहे. या मोजणीसाठी वापरलेली सर्व दस्त, कागदपत्रे ही बनावट असून मोजणी करताना कुठल्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही. म्हणून कार्यालयाकडून संग्राम लवांडे यांच्या सात वर्षांच्या कामाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमावी. त्याला कार्यालयात काम करण्यास विशेषतः मोजणीचे व दस्त हाताळण्याचे काम करण्यास त्वरित प्रतिबंध करावा. कार्यालयाने संग्राम लवांडे यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ. करणसिह घुले यांनी वरिष्ठांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा
नेवासा फाट्यावर असलेले भूमि अभिलेख कार्यालय हे दलालांचा अड्डा बनले असून, दलालांमार्फत कार्यालयातील कारभार चालतो. त्यामुळेच नेवासा तालुक्यात जमिनी बळकावणार्‍या अनेक टोळ्या तयार झाल्या आहेत. या कार्यालयातील गुंडाराज संपवून येथील दोषी कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल होईपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल, असे समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी सांगितले.

 

The post सामान्यांची स्थावर मालमत्ता धोक्यात ! नेवासा तालुक्यात सरकारी यंत्रणेला हाताशी धरून मोक्याच्या जागा गिळंकृत appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/Z0Op4i9
via IFTTT

नगर : ‘माता सुरक्षा’त झेडपीची घोडदौड, जिल्हा रुग्णालयाची पिछेहाट,

https://ift.tt/5PDt0Jn

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शासनाने 26 सप्टेंबरपासून हाती घेतलेल्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानाला जिल्हा परिषदेच्या तुलनेत जिल्हा रुग्णालय आणि मनपा आरोग्य यंत्रणेच्या शहरी भागात मोठी मरगळ आल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेतून 18 वर्षांवरील 8 लाख 58 हजार 415 (59 टक्के), जिल्हा रुग्णालयाच्या शहरी नगरपालिका, नगरपरिषद परिसरात 31 हजार 630 (12 टक्के), आणि महापालिका क्षेत्रात 53,651 (30 टक्के) अशी एकूण 9 लाख 43 हजार 696 मातांची तपासणी करण्यात आली आहे. तर अजूनही 9 लाख महिला व मातांपर्यंत यंत्रणा पोहचू शकलेली नाही.

घरातील स्त्री आपल्या कुटुंबासाठी नेहमीच वेेगवेगळ्या भूमिका करत असते. मात्र, हे करत असताना तिचे स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. त्याचे परिणाम कुटुंबावर दिसून येतात. त्यामुळे घरातील माता सुरक्षित असेल, तर कुटुंब सुरक्षित राहील, या भावनेतून सरकारने दि. 26 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत विशेष अभियान हाती घेतले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना हे अभियान राबविण्याच्या सूचना आहेत. हा कालावधी संपला असला तरी हे अभियान सुरूच राहणार आहे.

कोणकोणत्या तपासण्या केल्या जातात!
18 वर्षावरील महिला मातांची उंची, वजन, हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेचे प्रमाण आवश्यकता वाटल्यास रक्ताच्या चाचण्या, छातीचे एक्सरे, इत्यादी चाचण्या केल्या जात आहेत. माता आणि बालकांचे लसीकरण केलेले आहे का? याचीही माहिती या मोहिमेत घेतली जात आहे.

25 ग्रामीण रुग्णालयात तपासणीचा वेग कमीच!
जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत 5 नगरपालिका येतात. या अंतर्गत असलेल्या 25 ग्रामीण रुग्णालयात महिला व मातांचीही तपासणी केली जात आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनात हे अभियान राबविले जात आहे. मात्र, ग्रामीण रुग्णालयात फिल्डवरील यंत्रणा नसल्याने शहरी भागात या योजनेला मरगळ आली आहे.

96 आरोग्य केंद्र, उपकेंद्राची दखलपात्र कामगिरी
जिल्हा परिषदेच्या 96 आरोग्य केंद्र आणि 555 उपकेंद्रांच्या माध्यमातून महिला मातांची तपासणी केली जात आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर अशी फौजच या कामी मैदानात असल्याने 60 टक्के तपासणी पूर्ण झाली आहे. अर्थात हा वेग अजून वाढविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे हे स्वतः प्रयत्नशील आहेत.

प्रचार व प्रसिद्धीतून तपासणीचा टक्का वाढेल!
शासनाने माता सुरक्षा अभियानासाठी दोन कोटींना मंजूरी दिली आहे. ही रक्कम आल्यानंतर यातून प्रचार व प्रसिद्धीसह अन्य उपक्रमातून एकही महिला तपासणीपासून आणि उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना प्रयत्नशील राहावे लागणार आहे.

 

रुग्णालयाची पिछेहाट जिल्हा रुग्णालय आणि 25 ग्रामीण रुग्णालयात महिला व मातांची तपासणी केली जात आहे. महिला व मातांनी स्वयंस्फूर्तीने तपासणीसाठी यावे, याकरीता आम्ही वेगवेगळे प्रयत्न करत आहोत. लवकरात लवकर उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी आमचे प्रयत्न असतील.
                                                 -डॉ. संजय घोगरे, जिल्हा शल्यचिकित्सक

 

सीईओ आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून माता व महिलांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी सर्वच परिश्रम घेत आहे. तपासणीचा वेग आणखी वाढविण्यासाठी प्रचार आणि प्रसिद्धीवरही आम्ही जोर देणार आहोत.
                                           डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

 

The post नगर : ‘माता सुरक्षा’त झेडपीची घोडदौड, जिल्हा रुग्णालयाची पिछेहाट, appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/QtfFBkO
via IFTTT

टाटा एयरबस: महाराष्ट्र को लगा करोड़ों का फटका, आदित्य के बयान से शिंदे को झटका

टाटा एयरबस: महाराष्ट्र  22,000 करोड़ रुपये के टाटा एयरबस: प्रोजेक्ट के गुजरात जाने के बाद एकनाथ शिंदे की अगुवाई वाली महाराष्ट्र  सरकार और विपक्षी महाविकास अघाड़ी (एमवीए) के बीच एक नया आरोप-प्रत्यारोप का खेल शुरू हो गया है. https://ift.tt/DznrS9j

महाराष्ट्र को लगा करोड़ों का फटका, आदित्य के बयान से शिंदे को झटका

पिछले कुछ सालों में एक के बाद एक प्रोजेक्ट महाराष्ट्र के हाथ से क्यों निकल रहे हैं? महाराष्ट्र में ओद्योगिक निवेश आख़िर कैसे अपने अंजाम तक पहुंचता हैं? https://ift.tt/DznrS9j

कुकाण्यात अतिक्रमित बांधकामावरून राडा; कार्यकर्त्यांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून

https://ift.tt/xEN0aP8

कुकाणा; पुढारी वृत्तसेवा: नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या नावाने उतारा असलेल्या जागेवरील अतिक्रमणावरून दोन गट आमने-सामने आल्याने मोठा राडा झाला. एका गटाच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. कुकाणा येथे गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या मालकी हक्काच्या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

शनिवारी (दि.29) सकाळी 11 वाजता इनामदार यांच्या गटातील काही लोक कोर्टाच्या मनाई हुकूमाची प्रत सोबत घेऊन या ठिकाणी सुरू असलेले बांधकाम बंद करण्यासाठी गेले होते. परंतु, सदर काम बंद करण्यास अतिक्रमण धारकांनी विरोध केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्याची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पोलिस दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु, एका गटाच्या कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

यातील एका गटाचे म्हणणे आहे की, कुकाणा गावठाणामध्ये इनामदार कुटुंबियांची 12 एकर इनामी जमीन आहे. या जमिनीवर कुकाणा येथील काही धनदांडग्यांनी लोकप्रतिनिधींना हाताशी धरून पक्के बांधकाम केले आहे. यामध्ये भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी स्वतःचे संपर्क कार्यालय, तसेच शोरूम देखील थाटले आहे. या जमिनीबाबत औरंगाबाद येथील वक्फ ट्रिब्युनलमध्ये वाद सुरू असून, ट्रिब्युनलने पक्के बांधकाम करण्यास मनाई हुकूम दिलेला आहे. असे असतानाही या आदेशाला न जुमानता पक्की बांधकामे सुरु आहेत, असा आरोप मुसाभाई इनामदार आणि सलीम शहा यांनी केला आहे.

तर, दुसर्‍या बाजूचे म्हणणे आहे की, आम्हाला गेल्या 50 वर्षांपासून ग्रामपंचायतीने त्यांच्या मालकीची असलेली जागा व्यवसाय करण्यासाठी दिलेली आहे. आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी बांधकाम करून व्यवसाय करत आहोत. काही लोक बळजबरीने दादागिरी व दहशत करून आमची कामे बंद करण्यासाठी, जमावाने येऊन दहशत निर्माण करत आहेत. सदर लोकांचा वाद हा ग्रामपंचायतीसोबत असून, प्रत्यक्ष आमच्या सोबत त्यांचा वादाचा कुठलाही प्रश्न राहत नाही.

तसेच, मनाई हुकूमबाबत अद्याप आम्हाला कोर्टाकडून कुठलीही नोटीस मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही आमचे काम बंद करण्याचा प्रश्न उपस्थित होत नसल्याचे आबासाहेब रींधे, संदीप कोलते, शिवाजी शिंदे यांनी सांगितले दरम्यान, खबरदारी म्हणून पोलिसांकडून दोन्ही गटांच्या 50 ते 60 लोकांविरुद्ध पोलिसांच्या वतीने फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्याचे काम शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पोलिस निरीक्षकांची यशस्वी मध्यस्थी
पोलिस निरीक्षक विजय करे हे क्राईमच्या मीटिंगसाठी नगर येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले होते. परंतु, तेथे गेल्यानंतर काही क्षणातच कुकाणा येथे घडलेल्या प्रकरणाची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर ते तत्काळ पुन्हा कुकाण्याकडे रवाना झाले. तेथे येताच त्यांनी दोन्ही गटाला शांततेचे आवाहन करून गावातील सरपंच व प्रमुख मान्यवरांना बोलावून चर्चा घडवून आणली. त्यातून योग्य मार्ग काढल्याने सध्यापुरते वातावरण निवळले आहे.

The post कुकाण्यात अतिक्रमित बांधकामावरून राडा; कार्यकर्त्यांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/fYKjeOm
via IFTTT

फॉक्सकॉन के बाद टाटा एयरबस भी गई गुजरात, शिंदे ने कहा राज्य में जड़ आएगा निवेश

पहले वेदांता-फॉक्सकॉन और अब टाटा-एयरबस प्रोजेक्ट के गुजरात को मिलने के मामले में घिरे महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे की टिप्पणी सामने आई है। उन्होंने आश्वासन देते हुए कहा कि महाराष्ट्र को आने वाले समय में कुछ बड़े निवेश मिलने वाले हैं। https://ift.tt/gqTxLEU

उद्धव ठाकरे ने की देवेंद्र फडणवीस की तारीफ, महाराष्ट्र में उलटफेर की अटकलें!

महाराष्ट्र की राजनीति में भले ही शिवसेना और भारतीय जनता पार्टी के बीच टकराव की स्थिति हो लेकिन उद्धव ठाकरे और देवेंद्र फडणवीस के बीच एक बार फिर राजनीतिक रिश्तों में नरमी देखने को मिली है। https://ift.tt/gqTxLEU

फिर बगावत से जूझ रहे एकनाथ शिंदे ने पुराने साथियों पर उठाया बड़ा कदम

महाराष्ट्र में सत्ता परिवर्तन के बाद विपक्षी गठबंधन महा विकास अघाड़ी के कई नेताओं की सुरक्षा हटा दी गई है। हालांकि, पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और उनके परिवार की सुरक्षा व्यवस्था बरकरार रहेगी। https://ift.tt/gqTxLEU

नगर : वाहन विक्रीचा अ‍ॅटमबॉम्ब ; 2 हजार वाहनांची विक्री

https://ift.tt/Wm3oUk6

नगर : पुढारी वृत्तसेवा :  कोरोनानंतर पहिल्यांदा धुमधडाक्यात दिवाळी झाली. नगर शहरातील दुचाकी, चारचाकी वाहनांच्या दुकानातून आठवडाभरात दोन हजार वाहनांची विक्री झाली. मुर्हूत साधत ग्राहकांनी कोट्यवधी खरेदीचा अ‍ॅटमबॉम्ब वाजवत दिवाळी धमाका केला. पेट्रोल-डिझेलच्या किमती गणनाला भिडल्या तरी वाहन खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी होती. गत आठ दिवसांत परिवहन उपप्रादेशिक कार्यालयाकडे 1035 वाहनांची नोंदणी झाली, आणखी 1 हजार वाहने नोंदणीच्या रांगेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दसरा-दिवाळीचा खरेदीसाठी मुहूर्त महत्त्वाचा असतो. परंपरेनुसार दरवर्षी ग्राहक दिवाळी पाडवा व दसर्‍या विविध वस्तू, सोने, चांदी, वाहन खरेदी करतात.

गेल्या दोन वर्षांपासून सण उत्सवावर कोविडचे सावट होते. त्यामुळे दोन वर्ष बाजारात खरेदी-विक्रीची उलाढाल शांत होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात आली. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत प्रचंड गर्दी होती. गेल्या आठ दिवसांमध्ये दुचाकी वाहनांमध्ये ग्राहकांनी इलेक्ट्रिक बाईकला पसंती दिली. तर, मोटारकारही मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे दिसून येते. सध्या परिवहन उपप्रादेशिक कार्यालयाकडे 1035 वाहने खरेदी झाल्याची नोंद आहे. त्यात टॅक्टर, मोटारसायकल, मोटारकार आदी वाहनांचा समावेश आहे. आणखी सुमारे एक हजार वाहनांची दुचाकीच्या शोरूममधून खरेदी झाल्याची माहिती समजली. मात्र, त्याची अद्याप परिवहन कार्यालयाकडे नोंदणी झालेली नाही.

The post नगर : वाहन विक्रीचा अ‍ॅटमबॉम्ब ; 2 हजार वाहनांची विक्री appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/NDnsGMB
via IFTTT

आंबी दुमाला वन परिक्षेत्रात पक्ष्यांची शिकार

https://ift.tt/sfnMEFW

बोटा : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील पठार भागातील आंबी दुमाला गावाच्या वनक्षेत्रातील चंभारदरा परिसरात पक्षाची शिकार करून त्यास भाजून खाल्ले गेले असल्याचे निदर्शनास आले. या स्थळावर मोराची पिसे व इतर अवशेष आढळल्याने तिथे मोराची तसेच अन्य पक्षी, प्राण्यांची शिकार व तस्करी होत असल्याचा प्रकार शेतकर्‍यांच्या निदर्शनास आला आहे. तालुक्यातील पठार भागात तसेच आंबी दुमाला गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून यात विविध पशु- पक्षी वास्तव्यास आहेत, परंतु हल्ली वनपरिक्षेत्रात राष्ट्रीय पक्षी मोर तसेच अन्य पक्षी, प्राणी यांची संख्या घटत चालली आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असल्याचे निर्दशनास येत आहे.

यात मोठ्या प्रमाणावर होणार्‍या वन्य जीवांची शिकार तसेच तस्करी महत्वाचे कारण असल्याचे समोर येत आहे. प्राणी, पक्षांची शिकार करून आजही कोंबड्यां प्रमाणे मोराचे तसेच अन्य पक्षांचे प्राण्यांचे मांस खायला अनेक हौशी लोक पसंती देत असल्याचे निदर्शनास येत आहे. रात्रीच्या अंधारात शिकारीच्या नवनवीन क्लुप्त्या शोधून तसेच छुप्या पद्धतीने पारंपरिक फासे लावून वन्यजीवांची शिकार करणार्‍या अनेक टोळ्या पठार भागात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.

यात लवचिक काडी व नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने फास लावून रान डुक्कर, ससे, हरीण, तितर, चकोतरी, लाहुरी, मोर तसेच अन्य पक्षी व प्राण्यांची देखील शिकार करून यांचा वापर तस्करी व मांस खाण्यासाठी केला जात असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. तरी देखील पठार भागात वन्यजीवांच्या होणार्‍या शिकारी व तस्करी बाबत अद्याप पर्यंत वनविभागाने कुठलीही कारवाई न केल्याचे आढळून आले आहे. वनविभागाचे अधिकारी वन्यजीवांच्या होणार्‍या शिकारी व तस्करी या बाबींकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून डोळेझाक करून आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याचे प्रकार समोर येत आहे.

मोर हा भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी असून त्याची शिकार करणार्‍यास वन संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. तर सदर गुन्ह्यात सात वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. असे असताना पठार भागात मोरांची संख्या तर दिवसेंदिवस घटत चालली आहे.त्याच बरोबर इतर पक्षी, प्राण्यांची संख्या देखील यावर वनविभागाने वन्यजीवांची होणारी शिकार व तस्करी रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

सबंधित पक्षाचे मुंडके,हाडे, पिसारे नाशिक विभागात चौकशीसाठी पाठवले आहे.यातून तो पक्षी कुठला कुठला होता हे निष्पन्न होईल .आणि शोध मोहीम चालू आहे.जे कोण असे शिकार करून मांस खात असेल तर त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
                                            -वनअधिकारी रामदास थेटे, घारगाव

आमच्या गावात वन्यजीव पशू संवर्धन समिती असून गावचे तेराशे एकर वनक्षेत्र आहे. याच क्षेत्रात राष्ट्रीय पक्षी मोराची अथवा इतर पक्षाची हत्या करून भाजून खाल्ले असल्याचा पुरावे सदर ठिकाणी दिसून आल्याने हा घृणास्पद प्रकार निदर्शनास आला आहे. तरी या वनक्षेत्रात मोरांची शिकार व तस्करी होत असल्याचा संशय आहे. तर वनविभाग आधिकार्‍यांनी आपल्या कामात कसूर न करता योग्य तो तपास करत कारवाई करावी.तसेच वन्यजीवांचे संरक्षण करावे हीच मागणी आहे.
                                             -संदीप ढेरंगे, ग्रामस्थ आंबी दुमाला

The post आंबी दुमाला वन परिक्षेत्रात पक्ष्यांची शिकार appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/9aCibBI
via IFTTT

साडेचार महिन्यांत 729 मि.मी. पाऊस ; गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस

https://ift.tt/7cjqmFG

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात 1 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीत सरासरी 729.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी 668.8 मि.मी. पाऊस झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अकरा टक्के अधिक पाऊस झाला. मात्र, पाथर्डी, जामखेड, शेवगाव, श्रीरामपूर या चार तालुक्यांत मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. पाऊस अधिक झाल्याने यंदाचा रब्बी हंगाम जोमात असणार आहे
गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होत आहे. यंदा देखील हीच परिस्थिती आहे. जून महिन्यात सरासरी 108.2 मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. मात्र, यंदा 113.6 मि.मी. पावसाची नोंद झाली.जुलै महिन्यात 97.5 मि.मी. अपेक्षित असताना जिल्ह्यात 121.2 मि.मी. पाऊस झाला आहे.ऑगस्ट महिन्यात 95.4 मि.मी. पावसापेक्षा 109 मि.मी. पावसाची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यात सरासरी 147 मि.मी. पाऊस अपेक्षित असताना यंदा मात्र तब्बल 233.8 मि.मी. पाऊस झाला आहे.

यंदा प्रत्येक महिन्यात जादा पावसाची नोंद झाली. ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने दाणादाण उडवून दिली. त्यामुळे 20 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी 729.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने काढणीला आलेल्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे दीड लाखांपेक्षा अधिक शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला असल्याची शक्यता आहे.

जामखेडमध्ये सर्वात कमी
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 11 टक्के पाऊस अधिक झाल्याची नोंद आहे. मात्र, चार तालुक्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाला आहे. पाथर्डी तालुक्यात गेल्या वर्षी 173 टक्के पाऊस झाला. यंदा मात्र 111.4 टक्क्यांवर समाधान मानावे लागले. शेवगाव तालुक्यात 158 टक्के होता. यंदा 139 टक्के पाऊस झाला. श्रीरामपूर तालुक्यात यंदा 118.4 मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी मात्र 131.8 मि.मी. पाऊस झाला आहे. जामखेड तालुक्यात गेल्या वर्षी 114 टक्के पावसाची नोंद होती. यंदा मात्र 104.4 मि.मी. पाऊस झाला आहे.

खरीप हंगामात नुकसान झाले असले तरी, रब्बी हंगामासाठी फायदेशीर ठरणार आहे. सध्या सर्वच लहान- मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. अद्याप नद्या दुथडी वाहत असून, गावागावांतील तलावांत पाणी साचले आहे. परिणामी जिल्ह्यातील भूजलपातळी वाढण्यास मदत झाली. त्यामुळे विहिरींची पाणीपातळी वाढूली असून, उन्हाळ्यातील पाणीटंचाईची कमी होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यात 97 ठिकाणी अतिवृष्टी
प्रत्येक महिन्यात अतिवृष्टीची नोंद झाली. जून महिन्यात 8, जुलै महिन्यात 5, ऑगस्ट महिन्यात 13 तर सप्टेंबर महिन्यात 36 तर ऑक्टोबर महिन्यात 35 ठिकाणी अतिवृष्टी झाली. नगर, अकोले, श्रीगोंदा, श्रीरामपूर या तालुक्यांत एकाच महिन्यात एकाच मंडळात दोनदा अतिवृष्टी झाली आहे. शेवगाव व राहाता तालुक्यात एकाच महिन्यात दोन मंडळांमध्ये दोनदा अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे.

तालुकानिहाय एकूण पाऊस (मि.मी.)
नगर 725.5, नेवासा 722.9, श्रीगोंदा 715.3, पारनेर 655.7, , पाथर्डी 606.5, शेवगाव 732.4, संगमनेर 645.7, अकोले 1086.6, श्रीरामपूर 647.6, राहुरी 713.4, कर्जत 728.2, जामखेड 671.9, राहाता 713.3, कोपरगाव 795.5.

The post साडेचार महिन्यांत 729 मि.मी. पाऊस ; गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/17teWnZ
via IFTTT

महाराष्ट्र सरकार ने एक और बड़ी परियोजना गंवाई, आदित्य ठाकरे ने शिंदे पर बोला हमला

टाटा-एयरबस सी-295 परिवहन विमान परियोजना के गुजरात में जाने की घोषणा के साथ ही महाराष्ट्र की राजनीति में सियासी हलचल पैदा हो गई। https://ift.tt/GBvo4Fw

महाराष्ट्र में फिर छिड़ेगी सियासी महाभारत ? शिंदे के सिरदर्द बने ये दो विधायक

महाराष्ट्र में क्या फिर कुछ सियासी महाभारत छिड़ने वाली है...क्या खतरे में पड़ सकती है शिंदे गुट की सरकार,...आखिर क्या वजह है कि शिंदे गुट के ही 2 विधायक एकनाथ शिंदे की सरकार के लिए सिरदर्द का कारण बन चुक हैं https://ift.tt/GBvo4Fw

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, तर एक गंभीर जखमी

https://ift.tt/8ndJ2qA
ओतूर, पुढारी वृत्तसेवा: वेगवान फॉर्च्युनर गाडीने (एम एच ४६ बी ई ५५६६) जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील (एम एच १४ डी वाय ३०४१) एकजण उपचारापूर्वीच मृत्यू पावला असून दुचाकीवर मागे बसलेला एकजण गंभीर जखमी झाल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती ओतूर पोलीसांनी दिली.

जामखेड; पुढारी ऑनलाइन डेस्क: आष्टी तालुक्यातील चिंचपूर जवळ अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरात धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना २६ ऑक्टोबरला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील तरुण आदेश किसान काळे हा गेल्या काही वर्षांपासून पुणे येथील एका कंपनीत काम करत होता. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी तो आपल्या मित्राबरोबर भाऊबीजेच्या निमित्ताने पुण्याहून गावी जात असताना आष्टी तालुक्यातील चिंचपूर जवळील वळणावर अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरात धडक दिल्याने मोटारसायकलवरील आदेश किसन काळे (वय ३२) रा. धनेगाव ता. जामखेड हा जागीच ठार झाला.

तर नवनाथ मछिंद्र काळे (वय ३६ ) रा. मोशी, ता. हवेली, जि. पुणे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मयत आदेश काळे यांचा आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी पो.हे. कॉ. विकास राठोड यांनी पंचनामा केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदरसनाखाली राठोड करत आहेत

The post अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, तर एक गंभीर जखमी appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/m4p7Jr8
via IFTTT

अहमदनगर : पिंपळगाव येथे दुचाकी आणि टेम्पोचा भीषण अपघातात दोन तरुण ठार

https://ift.tt/3gtr1FD
अहमदनगर

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा शिवारात छोटा टेम्पो आणि दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी वरील दोन तरुण जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे.ओम राहूल पेंडभाजे (वय १९) व शुभम सदाश‍िव टेकुडे (वय १८ दोघे रा. देवगिरीवस्ती, साकूर ता. संगमनेर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.

या बाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी पिंपळगाव देपा शिवारात छोटा टेम्पो हा साकूरकडे जात होता. यावेळी अमोल पेंडभाजे व शुभम सदाश‍िव टेकुडे हे दोन तरूण दुचाकीवरून संगमनेरकडे जात असताना या वाहनांचा अपघात झाला आणि त्यामध्ये दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले.

अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्या दोघाही तरुणाना जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेतून औषधोपचारासाठी संगमनेर येथे नेण्यात आले. मात्र त्या दोघाचा उपचारा पुर्वीच मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सातपुते, प्रमोद चव्हाण, हरिश्चंद्र बांडे, संतोष फड यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान या दोन्ही तरुणांच्या अपघाती मृत्यूने साकूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून ऐन दिवाळीत या दोघा तरुणांच्या अपघाती मृत्यूने पठारभागावर शोककळा पसरली आहे.

अधिक वाचा :

The post अहमदनगर : पिंपळगाव येथे दुचाकी आणि टेम्पोचा भीषण अपघातात दोन तरुण ठार appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/CuBFqlR
via IFTTT

राहुरी : ‘मुळाखोरे’च्या माध्यमातून सहकार टिकवा, गोरक्षनाथ गाडे यांचे दूध उत्पादकांना आवाहन; सभासदांना रिबेट वाटप

https://ift.tt/bwaKYUW
Save the coopeartive sector through mulakhore Rahuri ahmednagar

राहुरी, पुढारी वृत्तसेवा: सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी मुळाखोरे खोलेश्वर दूध संस्थेचे संचालक मंडळ कटिबद्ध आहे. खासगी क्षेत्रातील दूध उद्योग व्यवसायाशी स्पर्धा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुळाखोरे खोलेश्वर दूध संस्थेने यंदाही दिवाळी सणाचे औचित्य साधत रिबेट वाटप केले आहे. दूध उत्पादकांनी सहकाराला बळकटी मुळाखोरे दूध संस्थेला दूध पुरवठा करावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गोरक्षनाथ गाडे यांनी केले.

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर मुळाखोरे खोलेश्वर दूध संस्थेच्या वतीने दूध उत्पादक शेतकर्‍यांना रिबेट वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे शिवाजीराजे पवार हे होते. बाळासाहेब मंडलिक, संजय देवकर,सुनिल मंडलिक, लक्ष्मण बाचकर, बाळासाहेब यादव मंडलिक, कैलास गाडे, मच्छिंद्र गोपाळे या दूध उत्पादकांनी सर्वाधिक रिबेट घेतले. 1 रुपयाला 75 पैसे, असे एकूण 1 रुपये 75 पैसे असे 6 लक्ष रुपयांचे रिबेट वाटप झाले.

दूध उत्पादकांना उपाध्यक्ष सुनिल मंडलिक, कैलास गाडे, विलास गाडे, दिलीप गाडे, सुधाकर पवार, रावसाहेब पवार, नुराभाई देशमुख, महेंद्र गाडे, गंगाधर गाडे, आदिनाथ कोहकडे, सोमनाथ कोहकडे, शशिकांत गाडे, किशोर भालेराव, बाबासाहेब देवकर, गोरख गोपाळे, प्रमोद ढुमणे,सुजित आघाव, आदी संचालक मंडळाच्या हस्ते दूध उत्पादकांना रिबेट वाटप झाले.

कार्यक्रमासाठी पंढरीनाथ पवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रभाकर गाडे, माजी सरपंच जयश्रीताई गाडे, सोपानराव गाडे, माजी उपसरपंच युवराज गाडे, कैलास पवार, भास्कर गाडे, दीपक पवार, रफिक इनामदार, प्रा. इजाज सय्यद, रावसाहेब मंडलिक, सचिन मंडलिक, भास्कर भालेराव आदींची उपस्थिती होती.

The post राहुरी : ‘मुळाखोरे’च्या माध्यमातून सहकार टिकवा, गोरक्षनाथ गाडे यांचे दूध उत्पादकांना आवाहन; सभासदांना रिबेट वाटप appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/JYPxHIm
via IFTTT

‘माता सुरक्षा’साठी नगरला दोन कोटी! शासनाचा निर्णय; ग्रामीण व शहरी भागासाठी एक-एक कोटींचे नियोजन

https://ift.tt/Yq4w0Kc
2 crore fund for mata surakshit tar ghar surakhshit scheme Ahmednagar

नगर, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या विशेष मोहिमेत महिलांना तपासणीसाठी नेण्याकरिता, तसेच औषधांसाठी प्रतिजिल्हा दोन कोटी रुपये निधी देण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यासाठीही दोन कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यात नवरात्री उत्सवापासून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानास सुरुवात झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभाग हे अभियान राबविले जात आहे. या अभियानास जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या मोहिमेत राज्यातील अंदाजे 4 कोटी महिलांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे. यामध्ये 18 वर्षांवरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत सुरू असणार आहे. लाभार्थ्यांना तपासणीसाठी शिबिराच्या ठिकाणी आणणे व घरी पोहचविणे यासाठी वाहतूक व्यवस्था केल्यास अभियान अधिक प्रभावीपणे राबविता येईल, हे लक्षात घेऊन वाहतुकीसाठी निधीची तरतूद करण्याचे ठरले.

त्याचप्रमाणे स्थानिक स्तरावर औषधे उपलब्ध करून देण्याची वेगळ्या निधीची तरतूद नसल्याने हा निधी देखील जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकीत्सक यांना उपलब्ध करून देण्याचे ठरले. त्यानुसार ग्रामीण भागासाठी वाहतूक आणि औषधांकरिता मिळून 1 कोटी आणि शहरी आणि महापालिका क्षेत्रासाठी 1 कोटी असे प्रत्येक जिल्ह्यासाठी 2 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या मोहिमेदरम्यान वैद्यकीय अधिकारी आणि स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत 18 वर्षावरील महिला, नवविवाहीत महिला, गरोदर माता यांची तपासणी, औषधोपचार, सोनोग्राफी आणि समुपदेशन करण्यासाठी मेडिकल, डेंटल शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जास्तीत जास्त तज्ञ तपासणीसाठी उपलब्ध होतील. यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 30 वर्षांवरील सर्व महिलांचे कर्करोग मधुमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू, कान, नाक, घसा व इतर आजारांचे निदान व आवश्यकतेनुसार उपचार व समुपदेशन करण्यात येत आहे. सदर शिबिरांमध्ये अतिजोखमीच्या मातांचे निदान करून त्यांना आवश्यकतेनुसार उपचार आणि संदर्भ सेवा देण्याचे तसेच जास्तीत महिलांची आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया होतील याचे नियोजन करण्यात येत आहे.

The post ‘माता सुरक्षा’साठी नगरला दोन कोटी! शासनाचा निर्णय; ग्रामीण व शहरी भागासाठी एक-एक कोटींचे नियोजन appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/EDGpCZq
via IFTTT

नगर: शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत; सव्वातीन लाख हेक्टरचे नुकसान; सप्टेंबर,ऑक्टोबरचे अनुदान कधी?

https://ift.tt/kYlADKC
Farmers of ahmednagar district are waiting subsidy from government

नगर, पुढारी वृत्तसेवा: जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत 1 हजार 319.5 हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील 21 हजार 119 बाधित शेतकर्‍यांना 4 कोटी 8 लाख 97 हजार रुपयांचा निधी वाटप करण्यात आला. जवळपास 96 टक्के अनुदान वितरित झाले आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत सव्वातीन लाख हेक्टर क्षेत्राला तडाखा बसला आहे. त्यामुळे लाखो बाधित शेतकर्‍यांना आता अनुदानाची प्रतीक्षा लागली आहे.

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा अधिक शेतपिकांचे नुकसान झाल्यास शासनाच्या वतीने बाधित शेतकर्‍यांना अनुदान दिले जात आहे. यंदाच्या वर्षापासून अनुदान दुपटीने वाटप केले जात आहे. यंदा जिल्ह्यातील एकूण 43 गावांतील शेतपिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. जून महिन्यात 8, जुलै महिन्यात 5 तर ऑगस्ट महिन्यात 13 वेळा अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जून महिन्यात अतिवृष्टीमुळे 109.99 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले. जुलै महिन्यात 432.82 हेक्टर तर ऑगस्ट महिन्यात 759.99 हेक्टर शेतपिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. एकंदरीत तीन महिन्यांत जिल्ह्यातील 21 हजार 440 शेतकर्‍यांच्या 1 हजार 319.5 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले.

या बाधित शेतकर्‍यांना नवीन निकषाप्रमाणे दुपटीने म्हणजे जिरायती पिकांसाठी 13 हजार 600 हेक्टर, बागायती पिकांसाठी 27 हजार तर फळबागासाठी 36 हजार हेक्टरी नुकसानभरपाई अदा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 4 कोटी 25 लाख रुपये अनुदानाची मागणी केली होती. बाधित शेतकर्‍यांना अनुदान वितरित करण्यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाला 4 कोटी 25 लाख 91 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला.

सप्टेंबर महिन्यात 1 लाख 35 हजार हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले. ऑक्टोबर महिन्यात 1 लाख 81 हजार हेक्टर पिके जमिनदोस्त झाली. नुकसान भरपाई अदा करण्यासाठी शासनाकडे 287 कोटींची मागणी करण्यात आली आहे.

कोपरगाव तालुक्यात सर्वाधिक अनुदान

कोपरगाव तालुक्यात ऑगस्टपर्यंत सर्वाधिक 490. 35 हेक्टर पिकांचे नुकसान झाले. त्यापोटी 1 हजार 36 बाधित शेतकर्‍यांच्या खात्यावर एकूण 1 कोटी 31 लाख रुपयांचे अनुदान वर्ग झाले.अकोले तालुक्यातील 432.82 हेक्टर क्षेत्राला पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे 19 हजार 317 बाधित शेतकर्‍यांना एकूण 1 कोटी 93 लाख 17 हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.राहुरीसाठी 43 लाख 99 हजार रुपयांचा निधी वितरित केला.

The post नगर: शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत; सव्वातीन लाख हेक्टरचे नुकसान; सप्टेंबर,ऑक्टोबरचे अनुदान कधी? appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/Z2nbBxz
via IFTTT

नगर: ‘त्या’आरोपींवर कठोर कारवाई करा, महसूलमंत्री विखे यांचे आदेश; रेशन प्रकरणातील जखमी तरुणाची भेट

https://ift.tt/DMbfIOq
Revenue minister radhakrishna vikhe patil asked to take strict action against who beats satish kshirsagar Ahmednagar

कुकाणा, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील भानसहिवरा येथे सरकारी रेशनचा माल पकडून देताना मारहाणीत जखमी झालेल्या सुरेशनगर येथील सतीश नानासाहेब क्षीरसागर या तरूणाची महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना यावेळी दिले.

सतीश क्षीरसागर व सुरेशनगर येथील ग्रामस्थांनी महसूलमंत्र्यांना लेखी निवेदन दिले. गावातील स्वस्त धान्य दुकानदार सुरेश दगडू उभेदळ हा स्वस्त धान्य वाहतूक ठेकेदार असून, तो स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा अध्यक्ष आहे. नेवासा तालुक्यात त्याची एवढी दहशत आहे की, हा माणूस गावात तीन-तीन महिने रेशन देत नाही. गावात अंत्योेदयच्या जास्त शिधापत्रिका आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन तो लोकांच्या घरी जाऊन लाभधारकांचे अंगठे (थम्ब) घेतो, थम्ब न दिल्यास दमदाटी करतो, मारहाण करण्याची धमकी देतो.

गावातील शिधा हा शुक्रवारी (दि.21) येथे न उतरविता भानसहिवरा येथे खासगी गोदामात उतरविण्यास विरोध केला असता, सुरेश दगडू उभेदळ, त्याचा मुलगा आणि इतरांनी लोखंडी गज, लाकडी दांडे यांनी मारहाण केली. त्यामुळे संपूर्ण गाव दहशतीखाली आहे. या माणसापासून मी व माझ्या सहकार्‍यांच्या जीवितास धोका आहे. त्यामुळे त्याचा नेवासा तालुका वाहतूक पुरवठा परवाना रद्द करावा, स्वस्त धान्य दुकान परवाना रद्द करावा आणि धान्य दुकान दुसर्‍या गावातील इतर लोकांना देऊन आमचे गाव दहशतमुक्त करावे, अशी मागणी केली आहे. निवेदनावर सतीश क्षीरसागर याच्यासह 25 ते 30 ग्रामस्थांच्या सह्या आहेत. दरम्यान, महसूलमंत्री विखे यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या. अनेक कुटुंबियांना स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य मिळत नसल्याच्या तक्रारीबाबतही कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.

The post नगर: ‘त्या’आरोपींवर कठोर कारवाई करा, महसूलमंत्री विखे यांचे आदेश; रेशन प्रकरणातील जखमी तरुणाची भेट appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/tDN8rxe
via IFTTT

नगर: बनावट एनओसीप्रकरणी हायकोर्टात याचिका! याचिकाकर्ते शेख यांची न्यायालयात धाव

https://ift.tt/MRE0Jpv
petition in high court regarding Fake NOC case Ahmednagar

नगर, पुढारी वृत्तसेवा: बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी आर्मी स्टेशन हेडक्वार्टर अहमदनगरच्या नावाने बनावट एनओसी तयार करून नगर उपविभागीय अधिकारी कार्यालयाची फसवणूक केल्याच्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

बनावट एनओसीप्रकरणात दाखल गुन्ह्यात याचिकाकर्ते शाकीर शेख यांचा जबाब नोंदवून घ्यावा. तसेच तपासासाठी त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे रेकॉर्डवर दाखल करून घ्यावीत असे आदेश न्यायालयाने तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांना दिले आहेत. न्यायमूर्ती मंगेश पाटील व अभय वाघवासे यांच्या समोर सुनावणी पार पडली.

लष्कराच्या हद्दीलगतच्या बांधकाम परवानगीसाठी उपविभागीय कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या दाखल्यांपैकी काही दाखले बनावट असल्याचे समोर आले आहे. बबन भागचंद बेरड (रा. भिंगार ता.नगर), आमीर तकी मिर्झा (रा. मुकुंद नगर) व निलेश प्रेमराज पोखर्णा व इतर 5 जणांच्या प्रकरणात बनावट कागदपत्रे सादर करून उपविभागीय कार्यालयाची फसवणूक झाल्याची फिर्याद महसूल सहाय्यक संजय गोलेकर यांनी दिली आहे. त्यानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपअधीक्षक अनिल कातकाडे याचा तपास करत आहेत. या प्रकरणी शाकीर शेख हे दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. पोलिसांकडून केवळ तीनच प्रकरणात तपास सुरू आहे. इतरही अनेक प्रकरणात बनावट एनओसी देण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, शेख यांनी उच्च न्यायालयात क्रिमिनल रीट पीटिशन दाखल केले होते. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये शाकीर शेख यांचा जबाब नोंदवून घ्यावा. त्यांच्याकडे असलेली इतर एनओसी बाबतची कागदपत्रे व पुरावे रेकॉर्डवर घेऊन त्या दृष्टीने तपास करावा, असे आदेश न्यायालयाने तपासी अधिकार्‍यांना दिले आहेत.

मूळ आरोपींपासून पोलिस दूरच?

उपविभागीय कार्यालयाकडून फिर्याद दाखल करत असताना मूळ आरोपींना वाचवून अज्ञात आरोपी विरोधात फिर्याद देण्यात आल्याप्रकरणी शाकीर शेख यांनी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या विरोधात महसूल विभागाच्या अवर सचिवांकडे तसेच विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. विभागीय आयुक्त कार्यालयाने याची दखल घेत 25 ऑक्टोबरपर्यंत स्वयंस्पष्ट अहवाल अभिप्रायासह सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.

सीबीआयकडे तक्रार

दरम्यान बनावट एनओसी संदर्भात 1.30 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे तपासात समोर आले असून, याबाबत पोलिसांकडून तपास होत नसल्याने शाकीर शेख यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे तक्रार केली आहे.

The post नगर: बनावट एनओसीप्रकरणी हायकोर्टात याचिका! याचिकाकर्ते शेख यांची न्यायालयात धाव appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/CIUe0pV
via IFTTT

चालकाला मारहाण करत ट्रक पळविला ; ट्रकमध्ये ज्वारीच्या 400 बॅगा

https://ift.tt/YsGhBrE

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  जालना येथून ज्वारीच्या 400 बॅगा भरून पुण्याकडे जाणारा मालट्रक दोन मोटारसायकलवर आलेल्या चौघांनी अडविला. त्यानंतर ट्रक चालकाला मारहाण करत धान्य भरलेला मालट्रक पळवून नेला. ही घटना नगर-औरंगाबाद महामार्गावर इमामपूर घाटाच्या वर घडली.  यासंदर्भात मारुती चंद्रकांत जाधव (रा.शिवनेरीनगर, कोंढवा, ता.हवेली, पुणे) यांनी शुक्रवारी (दि.21) सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी जाधव हे ट्रकचालक असून, ते जालना येथून ट्रकमध्ये (क्र.एमएच 12 डीटी 4433) ज्वारीच्या 400 बॅगा भरून औरंगाबाद मार्गे पुण्याकडे जात होते.

शुक्रवारी (दि.21) पहाटे 2.30 च्या सुमारास ते नगर-औरंगाबाद रोडने पांढरीपुलाच्या पुढील इमामपूर घाट चढून वर आले. त्यांच्या पाठीमागून दोन मोटारसायकलवर चार अनोळखी इसम आले. त्यांनी रोडच्या कडेला असलेल्या बाबा पेट्रोल पंपाजवळ दोन्ही मोटारसायकली आडव्या लावून ट्रक अडविला. त्यातील दोघांनी मालट्रकमध्ये चढून चालक जाधव यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यांचे डोळे, हात-पाय व तोंड कापडाने बांधून त्यांना ड्रायव्हर सिटच्या पाठीमागे ढकलून दिले.

त्यांच्या खिशातील 4 हजार 500 रुपयांची रोकड, तसेच मोबाईल काढून घेतला. एक जण ट्रक चालविण्यासाठी बसला, तर एक जण चालक जाधव यांच्या अंगावर बसला. त्यानंतर ट्रक पुन्हा पाठीमागे नेवाशाकडे नेला. नेवासा तालुक्यातील कुकाणा गावाजवळ रस्त्याच्या कडेला चालक जाधव यांना गाडीतून खाली फेकून देत, ते चोरटे ट्रक घेऊन पसार झाले. त्यानंतर काही नागरिकांच्या मदतीने ट्रक चालक मारुती जाधव हे दुपारी नगरमध्ये आले व त्यांनी सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात घडलेला प्रकार सांगून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

The post चालकाला मारहाण करत ट्रक पळविला ; ट्रकमध्ये ज्वारीच्या 400 बॅगा appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/U81nMOG
via IFTTT

ग्रहणामुळे श्रीसाईबाबा मंदिर कार्यक्रमांमध्ये बदल

https://ift.tt/nsmJdfH

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने (दि. 25) ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण (ग्रस्तास्त) असल्यामुळे श्रीसाईबाबा समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांच्या वेळेत बदल केला आहे. दुपारी 4.40 ते सायंकाळी 6.31 यावेळेत श्रींसमोर मंत्रोच्चार होईपर्यंत भाविकांना समाधी मंदिराचे सभा मंडपापासून दर्शन सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

बानायत म्हणाल्या, (दि.25) ऑक्टोबर रोजी दुपारी 4.40 ते सायंकाळी 6.31 यावेळेत खंडग्रास सूर्यग्रहण (ग्रस्तास्त) आहे. यामध्ये 4.40 वाजता श्रींचे दर्शन बंद होईल. दुपारी 4.50 वाजता समाधी मंदिरात मंत्रोच्चार सुरू होईल. सायंकाळी 6.31 वाजता मंत्रोच्चार संपल्यानंतर सायंकाळी 6.40 वा. श्रींचे मंगलस्नान होईल. यानंतर सायंकाळी 6.55 वा. श्रींची ‘शिरडी माझे पंढरपूर’ ही आरती तर 7.15 वा. श्रींची धुपारती होईल. आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी दर्शनरांगा पूर्वीप्रमाणे सुरू होतील.  ग्रहण काळात श्रींसमोर मंत्रोच्चार होईपर्यंत भाविकांना समाधी मंदिराचे सभा मंडपापासून दर्शन सुरू असेल. साईभक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन बानायत यांनी केले आहे.

The post ग्रहणामुळे श्रीसाईबाबा मंदिर कार्यक्रमांमध्ये बदल appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/6A0db9G
via IFTTT

बीजेपी ने साधा उद्धव पर निशाना, राणे ने कहा उद्धव के 4 विधायक संपर्क में

महाराष्ट्र में जुबानी जंग अब भी जारी है. राज्य में सत्ता परिवर्तन के बाद भी उद्धव गुट और भाजपा आए दिन एक दूसरे पर हमलावर रहते हैं. ऐसे में आज त्योहार के दिन भाजपा ने उद्धव ठाकरे पर हमला बोला है. https://ift.tt/y6tRfzw

अकोले: सरकारने जाहीर केलेल्या शिधा किटची अद्याप प्रतीक्षाच

अकोले, पुढारी वृत्तसेवा: गोरगरिबांची दिवाळी ही गोड व्हावी, यासाठी राज्य सरकारकडून केवळ शंभर रुपयांत डाळ, साखर, रवा आणि पामतेल प्रति एक किलो असे किट देण्याची घोषणा केली आहे. मात्र अकोले पुरवठा विभागाकडे यापैकी काही साहित्य अद्याप पोहोचले नसल्याने तालुक्यातील जनतेची दिवाळी गोड होणार की कडू असा प्रश्न जनसामान्यातून उपस्थित होत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अंत्योदय आणि … The post अकोले: सरकारने जाहीर केलेल्या शिधा किटची अद्याप प्रतीक्षाच appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SbWTPs

नगर तालुक्यात अतिवृष्टीने 97 गावे बाधित ; शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान

https://ift.tt/OvXVy13

शशिकांत पवार :  नगर तालुका : तालुक्यात चित्रा नक्षत्रात सततच्या पावसाने शेतकर्‍यांच्या कांदा, सोयाबीन व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जेऊर पट्ट्यात ढगफुटी सदृश पावसाने दररोज सीना, खारोळी नदीला पूर येत आहे. खोसपुरी, पांगरमल, उदरमल, सोकेवाडी, मजले चिंचोली या भागात गुरुवार व शुक्रवारी सलग दोन दिवस ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने परिस्थिती फारच बिकट बनली आहे. तालुक्यातील सर्वच तलाव, बंधारे तुडुंब भरले आहेत. नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. सारोळा कासार येथील पूर्वा नदी, अकोळनेर येथील वालुंबा नदी, चिचोंडी पाटील येथील केळ नदी ओसंडून वाहत आहेत.

सततच्या पावसाने कांदा, सोयाबीन व कांद्याच्या रोपांची पार वाताहत झाली आहे. नुकसानीमुळे कांदा उत्पादनात घट होणार आहे. बाजरी, मका, भाजीपाला, नवीन पेरलेली ज्वारी, नव्याने लागवड केलेल्या फळबागा यांचेही नुकसान झाले आहे. ज्वारीच्या दुबार पेरणीचे संकट आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. तालुक्यात सरासरी 138 टक्के पाऊस झाला असून सरसकट अनुदान देण्याची मागणी होत आहे.

मंडलनिहाय झालेला पाऊस (टक्के)
नालेगाव 135, सावेडी 164, कापूरवाडी 120, केडगाव 161, भिंगार 141, नागापूर 178, जेऊर 147, चिचोंडी पाटील 122, वाळकी 108, चास 114, रुईछत्तीसी 133, संपूर्ण नगर तालुका सरासरी 138 टक्के.

आदिवासींची पुनर्वसनाची मागणी
पिंपळगाव तलावातील आदिवासी समाजाच्या पालांनी पावसामुळे पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे येथील नागरिक जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत. नद्यांच्या पुरातून आलेल्या विषारी सापांचे वास्तव्य पालाशेजारीच असून, येथील चिमुरड्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. येथील आदिवासी समाजाचे पुनर्वसन करण्याची मागणी होेत आहे. आता प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहणार, याकडेही जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

 

नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येत आहेत. कोणीही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहू नये, याची दक्षता घेण्यात येत आहे. तालुक्यात नद्या, ओढे दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी.
                                                – उमेश पाटील, तहसीलदार, नगर तालुका

तालुक्यातील 119 गावांपैकी 97 गावे पावसाने बाधित झाले आहेत. महसूल, कृषी व ग्रामपंचायतींकडून संयुक्तपणे पंचनामे करण्यात येत आहेत. पंचनामे पूर्ण होण्यासाठी आठ ते दहा दिवस लागणार आहेत.
                                      पोपटराव नवले, कृषी अधिकारी, नगर तालुका

The post नगर तालुक्यात अतिवृष्टीने 97 गावे बाधित ; शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/1EHsCjM
via IFTTT

घोडेगाव कांदा मार्केट रुतलेय गाळात ! कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न मिळूनही नेवासा तालुका बाजार समितीचे अक्षम्य दुर्लक्ष

https://ift.tt/fYoAxyQ

सोपान भगत : 

कुकाणा : राज्यात कांदा विक्रीसाठी पहिल्या क्रमांकाचे असलेले घोडेगाव कांदा मार्केट अक्षरशः गाळात रूतले आहे. कोट्यवधी रूपयांचे उत्पन्न मिळत असूनही, नेवासा तालुका बाजार समितीचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. दररोज हजारो टनांची उलाढाल होत असलेल्या या परिसरात व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचे पाय चिखलात रुतत असल्याने, त्याचा परिणाम उलाढालीवर होत आहे. नेवासा बाजार समितीच्या व्यवस्थापनावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेवासा बाजार समितीचा घोडेगाव हा उपबाजार असून, या ठिकाणी 19 वर्षांपूर्वी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून कांदा मार्केट सुरू करण्यात आले. मार्केट सुरू करण्यापूर्वी येथे असलेला म्हशींचा बाजार राज्यातच नव्हे, तर देशात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी नगर जिल्ह्यासह औरंगाबाद, बीड, सोलापूर, पुणे जिल्ह्यातून शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी घेऊन येतात. या कांदा मार्केटमध्ये आठवड्यातून तीन वेळा कांद्याचे लिलाव केले जातात. प्रत्येक लिलावाच्या दिवशी येथे पाचशे ते सहाशे ट्रक कांदा शेतकर्‍याकडून उतरविण्यात येतो. एकाच दिवसात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार या मार्केटमध्ये केला जातो आणि यातूनच कोट्यवधी रुपये नफा हा बाजार समितीला देखील मिळतो.

परंतु, एवढ्या मोठ्या नफ्याच्या तुलनेने येथील बाजार समितीकडून येणार्‍या शेतकर्‍यांची कुचंबना केली जाते. या मार्केटमध्ये शेतीमाल घेऊन येणार्‍या शेतकर्‍यांचे अतिशय हाल होताना दिसतात. बाहेर गावाहून येणार्‍या शेतकर्‍यांची ना खाण्याची, ना पिण्याची, ना राहण्याची व्यवस्था केली गेली आहे. विशेष म्हणजे हे कांदा मार्केट अक्षरश: चिखलामध्ये भरते. येथील कुठल्याही दुकानात चिखल व दलदल तुडवतच जावे लागते. प्रवेशद्वारातूनच येणार्‍या शेतकर्‍याचे दलदलीने स्वागत केले जाते. चप्पल तर पायात घालण्याचा प्रश्नच येथे येत नाही. संपूर्ण परिसरात गाळ असल्याने शेतकर्‍यांना पायात घातलेली चप्पल त्याच गाळामध्ये सोडून देण्याची वेळ येते. साचलेल्या गटारीप्रमाणे या मार्केटची अवस्था झालेली आहे.

गेल्या सोळा ते सतरा वर्षांत या बाजार समितीला एवढे मोठे उत्पन्न मिळाले असताना देखील येथील परिस्थिती का सुधारली नाही, हाच खरा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. आपला घाम गाळून, कष्ट करून शेतकरी आपल्या शेतामध्ये पिकविलेला कांदा आपला संसार चालविण्यासाठी, मुलाबाळांचे शिक्षण करण्यासाठी, आपल्या फाटक्या तुटक्या कपड्याने आपला शेतीमाल विक्रीसाठी आणतो. त्याच ठिकाणी बळीराजाला मनस्ताप सहन करण्याची वेळ येते. ही गोष्ट मात्र लाजिरवाणी असल्याचे या समितीवर काम करणार्‍या व्यवस्थापनाला वाटत नाही का? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून केला जात आहे.

उपाययोजना करण्यास प्रशासक हतबल
धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार हे कार्यकारी मंडळाला असल्याने, तसेच सध्या कार्यकारी मंडळ अस्तित्वात नसल्याने कुठलेही धोरणात्मक निर्णय आपण प्रशासक या नात्याने घेऊ शकत नाही, अशी हतबलता बाजार समितीचे प्रशासक गोकुळ नांगरे यांनी व्यक्त केली. वरिष्ठांकडून तशा सूचना आल्यास त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव पाठविला
मागील काही दिवसापूर्वी नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारातील संपूर्ण परिसरात काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव पणन संचालक पुणे यांना मंजुरीसाठी पाठविला आहे. सदर प्रस्तावाच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात असून, मंजुरी मिळताच पुढील कार्यकारी मंडळ अस्तित्वात येताच काँक्रिटीकरणाच्या कामास प्रारंभ होणार असल्याचेे बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे यांनी सांगितले.

आमदारसाहेब, कांदा मार्केटकडे लक्ष द्या!
आमदार शंकरराव गडाख यांनी तालुक्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून, विकास केला आहे. त्यांनीच आता कांदा मार्केटच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्याची गरज आहे. पावसाळ्यात मार्केटमध्ये शेतकर्‍यांचे खूप हाल होतात. बाजार समिती पदाधिकारी काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव पाठविल्याचे सांगतात. परंतु, प्रत्यक्ष काम कधी होणार, असा सवाल उस्तळ खालसा येथील शेतकरी बाळासाहेब पवार यांनी केला आहे.

The post घोडेगाव कांदा मार्केट रुतलेय गाळात ! कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न मिळूनही नेवासा तालुका बाजार समितीचे अक्षम्य दुर्लक्ष appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/hY4c0Ko
via IFTTT

मनसे के दीपोत्सव कार्यक्रम में शामिल हुए शिंदे और फडणवीस, गठबंधन के दिए संकेत

मनसे की तरफ से आयोजित दीपोत्सव समारोह के लिए, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को खास तौर पर आमंत्रित किया गया था. इसके साथ ही एक बार फिर गठबंधन को लेकर अटकलें तेज हो गई. https://ift.tt/2F0RxBJ

अकोले : बनावट खतांची विक्री; कृषी केंद्र चालकावर गुन्हा

https://ift.tt/789ONkj

अकोले : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील लिंगदेव येथील कृषी केंद्रातून शेतकर्‍यास बनावट खत विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांत ‘आर्द्रतो अ‍ॅग्रो फार्मस इंडिया’ या नावाच्या कृषी सेवा केंद्राचे मालक आशुतोष ठका शेटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिंगदेव येथील आशुतोष ठका शेटे यांच्या दुकानातून शेतकरी सोमनाथ अंकुश चौधरी यांनी 10ः 26ः 26 खत घेतले. या खताबाबत त्यांना शंका आली. यासंदर्भात त्यांनी कृषी अधिकारी यांच्याकडे संशय व्यक्त केला. कृषी अधिकार्‍यांनी ते खत न वापरता तसेच ठेवण्यास सांगितले.

रविवारी (दि. 16) रोजी तालुका कृषी अधिकारी माधव हासे हे शेतकरी सोमनाथ अंकुश चौधरी यांचे घरी गेले. त्यांनी खताची गोणी पाहिली असता ते बनावट असल्याची शंका आली. कृषी अधिकार्‍यांनी चौधरी यांना खताच्या बिलाची मागणी केली. त्यावेळी त्यांनी आर्द्रतो अ‍ॅग्रो फार्मस इंडिया पी.व्ही.टी. लि. यांचे बिल दाखवले. त्या बिलावर 10ः 26ः 26 या खताचे पुढील पक्क्या बिलावर नोंद न करता पाठिमागे पेनने लिहिलेले होते. कृषी अधिकार्‍यांचा संशय बळावल्याने त्यांनी दुकानदार आशुतोष ठका शेटे यांना सोमनाथ चौधरी यांचे घरी बोलावुन घेतले. खताबाबत विचारपुस केली असता तो उडवा- उडवीचे उत्तर देवू लागला. त्यामुळे सदर खताचे गोणीचा पंचनामा केला.

खतामधून अंदाजे 400 ग्रॅम वजनाचे तपासणी करता सॅम्पल वेगवेगळे काढून गोणी सील केली. खताचे सॅम्पल पुणे येथील प्रयोग शाळेत पोस्टाने पाठवून दिले. पंचायत समितीचे तालुका कृषीअधिकारी सचिन देवराम कोष्टी यांच्या फिर्यादीवरून दुकानदार आशुतोष ठका याच्या विरोधात अत्यावश्यक वस्तु सेवा अधिनीयमाचे कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे करीत आहेत.

शेतक.र्‍यांना आवाहन
लिंगदेव येथील आर्द्रतो अ‍ॅग्रो फार्मस इंडिया या नावाच्या कृषी सेवा केंद्रात बोगस खताचे प्रकरण आढळून आले. त्यासंदर्भात रासायनिक खत आदेश 1985 तर अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकर्‍यांची कृषी सेवा केंद्राकडून फसवणूक झाल्यास कारवाई करण्यात येईल. तसेच बनावट खते, बियाणे विक्री करणार्‍यांबाबत शेतकर्‍यांनी संपर्क साधावे, असे आव्हान जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक किरण मांगडे यांनी केले आहे.

The post अकोले : बनावट खतांची विक्री; कृषी केंद्र चालकावर गुन्हा appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/bviLlht
via IFTTT

नगर :  साखर, चना, पोहोचले, पामतेल मात्र रस्त्यातच

नगर :  पुढारी वृत्तसेवा : गोरगरिबांची यंदाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी शासनाने केवळ शंभर रुपयांत एक किलो डाळ, साखर, रवा आणि एक लिटर पामतेल असे चार वस्तूंचे किट देण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली तरीही, किट गोरगरीब जनतेला उपलब्ध झाले नाहीत.  नगर जिल्ह्यासाठी बुधवारी दुपारपर्यंत 40 टक्के पुरवठा झाला. त्यात रवा, साखर … The post नगर :  साखर, चना, पोहोचले, पामतेल मात्र रस्त्यातच appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SbSVtw

कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार : आमदार रोहित पवार

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कारखाना अगोदर चालू केला म्हणून आमदार राम शिंदे यांनी माझ्या विरोधात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. शेतकरी, जनता व कार्यकर्त्यांच्या पाठिंबामुळे मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील दत्तराज दूध संकलन केंद्राचे प्रमुख दीपक भागडे यांनी दूध … The post कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार : आमदार रोहित पवार appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SbSVjm

नगर : लाच मागणार्‍या दोघांवर गुन्हा

नगर : पुढारी वृत्तसेवा :  खरेदी केलेल्या जमिनीची नोंद सातबार्‍यावर करण्यासाठी वीस हजारांच्या लाचेची मागणी करणार्‍या शेवगाव तलाठी कार्यालयातील कॉम्प्युटर ऑपरेटर विजय धनवडे व त्याचा खासगी साथीदार आरिफ पठाण (दोघेही रा.शेवगाव, जि.नगर) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. दोघांवरही शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवगाव येथील तक्रारदाराने खरेदी केलेल्या दोन गुंठे … The post नगर : लाच मागणार्‍या दोघांवर गुन्हा appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SbSVfw

नेवासा तालुक्यातील 126 गावांची दिवाळी पाणीदार ; पाणी योजनांसाठी 125 कोटी

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  नेवासा, शेवगाव, पाथर्डी या तीनही तालुक्यांसाठी जीवनदायनी ठरणार्‍या मुळा उजवा कालवा व वितरिका यांच्या दुरुस्तीसाठी 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर, नेवासा तालुक्यातील घोगरगावसह 4 गावांमध्ये नवीन वीज उपकेंद्र व कार्यरत असलेल्या 8 उपकेंद्रांच्या क्षमता वाढीसाठी व देखभाल दुरुस्तीसाठी 69 कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. तसेच, गेल्या … The post नेवासा तालुक्यातील 126 गावांची दिवाळी पाणीदार ; पाणी योजनांसाठी 125 कोटी appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SbSVdw

दिघोळ येथे अंगावर वीज पडल्याने जखमी, विजांच्या कडकडाट सह जोरदार पाऊस

जामखेड पुढारी वृतसेवा :  तालुक्यातील दिघोळ येथे विकास राजेंद्र आटकरे आईवडीला बरोबर शेतात काम करत असताना जोरदार पाउस सुरु झाला पाऊसासोबत विजांचा कडकडाट सुरु झाला, धोधो पाउस सुरु झाल्याने निवारा शोधत विकास हा चिंचेच्या झाडाखाली थांबला आणि तेवढ्यात वीज कोसळली पण दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावला पण पाठीला व पायाला जखम झाली आहे. ग्रामस्थांच्या मदतीने … The post दिघोळ येथे अंगावर वीज पडल्याने जखमी, विजांच्या कडकडाट सह जोरदार पाऊस appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SbSVb8

‘मुळा’चा विसर्ग 15 हजार क्यूसेक

https://ift.tt/cE9edKj

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात जोरदार पावसाने धुमाकूळ घातल्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे. 15 हजार क्यूसेकने मुळा नदीचा प्रवाह वाहता झाला आहे. यंदाच्या मान्सून हंगामात विक्रमी 22 हजार दलघफू इतके पाणी जायकवाडी धरणाला मुळातून सोडण्यात आले. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्राकडून आवक एक हजार 100 क्यूसेक इतकी अत्यल्प आहे; परंतु म्हैसगाव, शेरी चिखलठाण, साकूर, मांडवे, पारनेर हद्दीतील भाळवणी, काळू प्रकल्प, मांडओहोळसह मुळानगर व परिसरातील जोरदार पावसाने धरणाच्या पाणी साठ्यात भरमसाठ वाढ होत असल्याने मुळा धरण पाटबंधारे विभागाने तत्काळ धरणाचे दरवाजे अधिक प्रमाणात वर उचलले. पूर्वी धरणाच्या 11 दरवाज्यातून 45 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू होता.

दरम्यान, रात्रभर पावसाने झोडपून काढल्यानंतर गुरुवारी पहाटे सहा वाजता विसर्ग आठ हजार क्यूसेक इतका वाढविण्यात आला. मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील व उपअभियंता शरद कांबळे यांच्या मार्गदर्शनामध्ये मुळातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. पावसाचा जोर सुरूच असल्याचे पाहून सकाळी आठ वाजता 10 हजार क्यूसेकने विसर्ग वाढविण्यात आला. दरम्यान, पावसाच्या पाण्याची आवक वाढतच असल्याने अखेर दुपारी तीन वाजता धरणाच्या दरवाज्यातून 15 हजार क्यूसेक इतका विसर्ग वाढविण्यात आला.

पूर नियंत्रण कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी आवक व विसर्गाचे नियंत्रण साधत आहेत. मुळा धरणातून जायकवाडी धरणाला यंदाच्या वर्षी 22 हजार दलघफू इतके उच्चांकी पाणी सोडले गेले आहे. यंदाच्या हंमागाम मुळा धरणाला 43 हजार दलघफू इतके नव्याने पाणी लाभले.

The post ‘मुळा’चा विसर्ग 15 हजार क्यूसेक appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/kOWF12g
via IFTTT

नगर :  साखर, चना, पोहोचले, पामतेल मात्र रस्त्यातच

https://ift.tt/NJRpqFj

नगर :  पुढारी वृत्तसेवा : गोरगरिबांची यंदाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी शासनाने केवळ शंभर रुपयांत एक किलो डाळ, साखर, रवा आणि एक लिटर पामतेल असे चार वस्तूंचे किट देण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली तरीही, किट गोरगरीब जनतेला उपलब्ध झाले नाहीत.  नगर जिल्ह्यासाठी बुधवारी दुपारपर्यंत 40 टक्के पुरवठा झाला. त्यात रवा, साखर व चणाडाळ आली, पण पामतेलचा पत्ताच नाही. पामतेलच्या गाड्या नगरच्या दिशेने निघाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हाभरात ‘दिवाळी किट’चे शुक्रवारपासून वाटप सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले.

शिंदे-फडणवीस सरकारने अंत्योदय आणि अन्न सुरक्षा तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील रेशनकार्डधारकांना एक किलो साखर, रवा व चणाडाळ तसेच 1 लिटर पामतेलाचे दिवाळी किट अवघ्या शंभर रुपायात देण्याची घेषणा केली. त्यासाठी एका फेडरेशनला पुरवठा करण्याचा ठेका दिला. जिल्ह्यातील एकूण 6 लाख 92 हजार रेशनकार्डधारकांना दिवाळी किटची प्रतिक्षा लागली. मात्र, दिवाळी दोन दिवसांवर आली तरीही स्वस्तधान्य दुकानांत शासनाचे कीट काही दिसेनासे झाले. त्यामुळे यंदाची दिवाळी साजरी होणार की नाही अशी शंका निर्माण झाली.

दरम्यान, बुधवारी दुपारपर्यंत जिल्ह्यासाठी रवा, साखर व चणाडाळ या तीन जीन्साचा 40 टक्के पुरवठा उपलब्ध झाला, पण त्यात पामतेलाचा अद्याप पत्ताच नाही. उर्वरित किट जिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकानांवर दिवाळी सणापूर्वी पोहोचेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.पोहचलेला माल स्वस्तधान्य दुकानांना पोहोच होऊन शुक्रवारपासून वाटप सुरु होणार आहे. दिवाळी किटचे वाटप करण्यासाठी स्वस्तधान्य दुकाने दिवाळी सुट्टीतही खुली राहाणार आहेत.

 

The post नगर :  साखर, चना, पोहोचले, पामतेल मात्र रस्त्यातच appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/eVME7tW
via IFTTT

आज या, उद्या त्या गटात कोलांट्याउड्या ! जेऊर ग्रामपंचायतीत सगळे अलबेल

https://ift.tt/OzxQihH
ग्रामपंचायत

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  जेऊर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून गावातील राजकारणाचा खेळखंडोबा झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. कोण विरोधक अन् कोण सत्तेत, हे ग्रामस्थांनाच काय? खुद्द ग्रामपंचायत सदस्यांनाही समजायला तयार नाही. अशी विदारक परिस्थिती जेऊरमध्ये पहावयास मिळतेय. ग्रामपंचायत सदस्य सदस्यांमध्ये गट पडत असून, तरी ते कोणत्याही एका गटा सोबत कधीच एकनिष्ठ दिसून आले नाही. आज एका गटात, तर उद्या दुसर्‍या गटात असा कोलांट्याउड्या मारण्याचा कार्यक्रम ग्रामपंचायत सदस्यांमध्ये दिसून येतो.

नगर तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतमध्ये अजब कारभार सुरू असून, ग्रामपंचायत सदस्यांमध्ये उदासीनता आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडून होणार्‍या कामाची अपेक्षा करणे सोडून दिल्याने ग्रामपंचायत कार्यालय सुनेसुने झाले. जेऊर ग्रामपंचायतमध्ये सुरू असलेला अलबेल कारभार हा चव्हाट्यावर आला असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत राजकारणाचा विचित्र प्रकार पाहावयास मिळाला. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या गटाविरोधात निवडणूक लढविणार्‍या गाव नेत्यांमध्ये निवडणुकीपूर्वीच वितुष्ट निर्माण झाले. निवडणुकीत तीन गट पडले अन् त्यातच जेऊर ग्रामस्थांनी कोणालाही स्पष्ट बहुमत न दिल्याने परिस्थिती अजूनच बिघडली. कर्डिले गटाला 17 पैकी आठ जागा मिळाल्या.

सत्ता स्थापनेसाठी एक जागा कमी पडली होती. त्याच क्षणी विद्यमान उपसरपंच श्रीतेश पवार यांनी कर्डिले गटात सामील होत त्यांना पाठिंबा दिला. कर्डिले गटाने सत्ता स्थापनेचा आकडा पूर्ण केला होता. परंतु, माजी मंत्री कर्डिले यांनी त्यापुढे जात विरोधात निवडून आलेल्या उमेदवारांना आपल्या गटात सामील करून घेत सरपंचपद बहाल केले. सरपंच राजश्री मगर, उपसरपंच श्रीतेश पवार वास्तविक कर्डिले गटाच्या विरोधात निवडून आलेले. कर्डिलेंनी काही स्थानिक नेत्यांचे मतही विचारत घेतले व मगच निर्णय घेतला. कर्डिलेंची राजकीय खेळी यशस्वी होऊन संपूर्ण गाव एक होईल अशी अपेक्षा होती; परंतु सरपंच-उपसरपंच निवड झाल्यानंतर लगेच कर्डिलेंच्या कट्टर समर्थकांनी उघड-उघड नाराजी व्यक्त केली.

कर्डिलेंच्या मनात काय?
निवडणुकीपूर्वी कर्डिले यांच्या विरोधात बोलणारे, विरोध करणारे ठराविक स्थानिक नेते कर्डिले यांच्यासोबत दिसून आले; परंतु ते मनातून कोणाचे कार्यकर्ते आहेत, हा संशोधनाचा विषय. दोन महिन्यापूर्वी ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावले होते. यावरून ग्रामपंचायतच्या कारभाराची जाणीव होते. कर्डिले राजकारणातील मुरब्बी नेते म्हणून समजले जातात. त्यामुळे जेऊर गावातील चालू असलेल्या या कुरघोडीबाबत ते अनभिज्ञ निश्नितच नसणार; परंतु त्यांच्या मनात काय चालले? हे येणारा काळच ठरवेल.

‘माजी मंत्र्यांनी लक्ष घालावे’
माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना राजकारणातील मुरब्बी नेते म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील राजकारणात त्यांचा चांगलाच दबदबा आहे. जेऊर गाव त्यांचा बालेकिल्ला समजला जातो. येथील जवळजवळ सर्वच ज्येष्ठ नेते कर्डिलेंचा शब्द टाळत नाहीत. त्यामुळे कर्डिलेंनीच जेऊर ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या कारभाराबाबत लक्ष घालून ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

The post आज या, उद्या त्या गटात कोलांट्याउड्या ! जेऊर ग्रामपंचायतीत सगळे अलबेल appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/lCDiVRS
via IFTTT

संगमनेर : म्हाळुंगीचा पूल वाहतुकीसाठी बंद ; परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल

https://ift.tt/0lzBxHe

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  म्हाळुंगी नदी पात्रातून सतत होणारा वाळू उपसा आणि त्यातच नदीपात्राच्या कडेने सांडपाणी वाहून नेण्यासाठी खोदलेल्या चरामुळे हा पूल काहीसा खचला आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पूल बंद झाल्याने साईनगर, घोडेकर मळा आणि पम्पिंग स्टेशन या परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिरापासून साईमंदिराकडे जाणारा म्हाळुंगी नदीवरील पूल अचानक उत्तरेकडील बाजूने खचला असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून संगमनेर नगर परिषद प्रशासनाने म्हाळुंगी नदीच्या खचलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेट्स लावून रस्ता वाहतुकीसाठी आणि पायी जाणार्‍या येणार्‍यांसाठी बंद केला आहे.

म्हाळुंगे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे पूल दुरुस्त करण्याचे काम करणे सध्यातरी अवघड बनले आहे. त्यामुळे साईनगर, घोडेकर मळा आणि पंपिंग स्टेशन या परिसरात राहणार्‍या नागरिकांना संगमनेर शहरात येण्यासाठी जवळचा असणारा मार्ग बंद झाला आहे. वरील परिसरातील नागरिकांना मालपाणी हेल्थ क्लब मार्गे संगमनेर शहरात यावे लागत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.

संगमनेर शहरातील चव्हाणपुर्‍याकडून वेताळ मळ्याकडे जाण्यासाठी पालिकेने नदीपात्रात सिमेंटचे पाईप टाकून केलेला कच्चा पूलही पावसाळ्यात म्हाळुंगी नदीस जास्त प्रमाणात पाणी आल्यामुळे तोही वाहून गेला आहे. त्यामुळे साईनगर, पंपिंग स्टेशन, घोडेकर मळा, हिरे मळा, वेताळ मळा, गंगामाई परिसरात राहणार्‍या नागरिकांसह दिगंबर गणेश सराफ विद्यालय व डॉ. देवेंद्र ओहरा कनिष्ठ महाविद्यालयाकडे जाणार्‍या विद्यार्थ्यांना पूल बंद झाल्याच्या दिवसापासून मालपाणी हेल्थ क्लब या कासारवाडी रस्त्याचा वापर करावालागत आहे. नेमक या नदीचे पाणी कधी संपेल आणि या पुलाची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग कधी करेल, याकडे या भागातील नागरिकांची लक्ष लागून आहे.

पाणी कमी होईपर्यंत काम करणे अशक्य
म्हाळुंगी नदीला सध्या मोठ्या प्रमाणात पाणी सुरू आहे. त्यामुळे नेमके त्या पुलाचे किती पिलर तुटले आहेत, हे काही कळणे अवघड झाले आहे. नदीत तात्पुरत्या स्वरूपाचा बंधारा घालण्याचे काम हाती घेण्यात येणार होते. परंतु भोजापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे जोपर्यंत नदीचे पाणी कमी होत नाही, तोपर्यंत खचलेल्या पुलाचे दुरुस्तीचे कामकरणे शक्य नाही. असे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी ‘पुढारी’ शी बोलताना सांगितले.

The post संगमनेर : म्हाळुंगीचा पूल वाहतुकीसाठी बंद ; परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/4lvBS9a
via IFTTT

नगर : 65 शाळांच्या क्रीडांगण विकासासाठीचं टेंडर ‘काय-द्याय’च्या कचाट्यात!

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा परिषदेच्या सुमारे 65 शाळांच्या क्रीडांगण विकासासाठी मंजूर 4 कोटींचा निधी खर्च करण्यात क्रीडा आणि शिक्षण विभागाला अपयश आले आहे. क्रीडांगण कामांची टेंडर प्रक्रिया, शाळांच्या मुख्याध्यापकांना अंधारात ठेवून ठराविक ठेकेदाराला वाटलेली कामे, हाच मुळात वादाचा मुद्द ठरला. त्यामुळे आता मुदतीत ही कामे न झाल्यास कोट्यवधींचा निधी शासनाला मागे करण्याची नामुष्की … The post नगर : 65 शाळांच्या क्रीडांगण विकासासाठीचं टेंडर ‘काय-द्याय’च्या कचाट्यात! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SbPGWm

रेडी नदीत टेम्पो गेला वाहून ; गाडीतील चारजण सुदैवाने बचावले;

भातकुडगाव : पुढारी वृत्तसेवा : भातकुडगाव फाटा ते दहिगावने या रस्त्यावरील बक्तरपूर येथील रेडी नदीला मोठा पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत होते. या पाण्यातून चालकाने घातलेला टेम्पो प्रवाहाबरोबर वाहत जाऊ लागल्याने एकाने उडी मारून जीव वाचवला. तर टेम्पोतील अन्य तिघांना तेथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी वाचविले. शेवगाव, नेवासा तालुक्यात सोमवारी रात्री सर्वदूर झालेल्या जोरदार पावसाने परिसरातील … The post रेडी नदीत टेम्पो गेला वाहून ; गाडीतील चारजण सुदैवाने बचावले; appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SbPGQH

गर्भगिरी डोंगरावर ढगफुटी ; लागवड केलेला कांदा गेला पुरात वाहून

मढी : पुढारी वृत्तसेवा :  मायंबा डोंगरावर सोमवारी रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने मढी परिसरातील तलाव, बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. गर्भगिरी डोंगरातील पवनागिरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक शेतकर्‍यांच्या शेतात पाणी घुसून लागवड केलेला कांदा पुरात वाहून गेला. शेतात पीकच राहिले नाही, तर ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये कशाचे फोटो अपलोड करायचे, असा प्रश्न … The post गर्भगिरी डोंगरावर ढगफुटी ; लागवड केलेला कांदा गेला पुरात वाहून appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SbPGMV

नगर : मनपात साचला जुन्या वस्तूंचा ढीग ; महापौरांच्या तोंडी आदेशाला केराची टोपली

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेला स्वच्छ भारत अभियानांतर्गत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, मनपातच दर्शनी भागात भंगाराचा ढीग साचला आहे. राजमाता जिजाऊ सभागृहाच्या समोरील जिन्यात जुन्या वस्तूंचा ढीग असून, त्या महासभेसाठी येणार्‍या नगरसेवकांचे तो स्वागत करणार आहे, असे चित्र मनपात आहे. मनपाला स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कारांच्या निधीतून मनपा हद्दीत अनेक … The post नगर : मनपात साचला जुन्या वस्तूंचा ढीग ; महापौरांच्या तोंडी आदेशाला केराची टोपली appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SbPGLy

‘वृद्धेश्वर’ गुणवत्तापूर्ण गळीत हंगाम यशस्वीतेसाठी प्रयत्नशील : राहुल राजळे

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  वृद्धेश्वर साखर कारखान्याने यावर्षीच्या गाळप हंगामात साडेसहा लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, साडेसात लाख क्विंटल साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. गुणवत्तापूर्ण हंगाम यशस्वीतेसाठी वृद्धेश्वरचे प्रयत्न राहणार आहेत, कार्यक्षेत्रात यावर्षी पूरक उसाची उपलब्धता आहे. मशिनरीत अद्ययावत सुधारणा केल्याने प्रतीदिन गाळपाचा वेग वाढणार आहे, असे प्रतिपादन संचालक राहुल राजळे … The post ‘वृद्धेश्वर’ गुणवत्तापूर्ण गळीत हंगाम यशस्वीतेसाठी प्रयत्नशील : राहुल राजळे appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SbPGDt

48 हजार शेतकर्‍यांना पावसाचा तडाखा ; शेतकर्‍यांचे 90 कोटी गेले पाण्यात

https://ift.tt/G9lY4w8

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील तब्बल 48 हजार शेतकर्‍यांना पावसाच्या तडाख्याने नुकसान झाल्याची नोंद शासकीय पंचनाम्यात नमूद आहे. 32 हजार 600 हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीच्या तडाख्यात वाहून गेल्याने शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून कोणतीही मदत जाहीर होत नसल्याने ऐन दिवाळी सणातच शेतकर्‍यांचे दिवाळे निघाले आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा व तत्काळ मदतीची घोषणा करीत दिलासा देण्याची मागणी होत आहे.

राहुरी परिसरात मान्सून हंगामाने त्रस्त शेतकर्‍यांना परतीच्या पावसानेही यथेच्छ झोडपले. शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचत तहसीलदार फसियोद्दिन शेख व तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले. कृषी सेवक, तलाठी यांच्या पथकाने पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करीत झालेल्या नुकसानीची माहिती वरिष्ठांना दिली.

दरम्यान, राहुरी परिसरात सर्वाधिक नुकसान हे कापूस पिकाचे झाले आहे. 16 हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस पीक पावसाच्या पाण्याखाली आल्याने मोठे नुकसान झाले. अनेक शेतकर्‍यांच्या कापूस पिकाचे बोंड काळवंडले, तर बहुतेक ठिकाणी कापूस पीके पाण्यात वाहून गेल्याचे निदर्शनास आले. यासह सोयाबीन पिकालाही मोठा फटका बसला आहे. राहुरी हद्दीत तब्बल 11.5 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याची नोंद शासकीय दरबारी झाली आहे. यासह बाजरी, चारा पिकांसह भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. एकूण 32 हजार 600 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीमुळे राहुरी परिसरातील 48 हजार शेतकर्‍यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे.

नुकसानीबाबत तहसीलदार शेख व तालुका कृषी अधिकारी ठोकळे यांच्या माध्यमातून नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यामध्ये शेतकर्‍यांचे अंदाजे 90 कोटी रुपये पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे.
मान्सून हंगामात पावसाने यथेच्छ झोडपल्याने पूर्वीच शेतकर्‍यांचे वाभाडे निघाले होते. अनेक शेतकर्‍यांनी कांद्याची साठवणूक करून दिवाळी सणासाठी नियोजन केले होते. परंतु अतिपावसाने शेतकर्‍यांच्या साठवणूक केलेल्या कांद्याचेही मोठे नुकसान केले. कांद्याचा पडलेला दर तर दुसरीकडे सडत चाललेला कांदा पाहता शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आले. दिवाळी सणाला कापूस पिकाचे उत्पादनातून खर्च भागविता येईल, अशी अपेक्षा लागली होती. परंतु परतीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घासही हिरावून घेतला. कापूस पिकासह सोयाबीन पिकाला ऐन काढणीतच पावसाचा मारा सहन करावा लागला. अनेक ठिकाणी वाहत्या नदीप्रमाणे पावसाचे पाणी वाहत असल्याने शेतकर्‍यांचे पिकेही पाण्यात वाहून गेली.

एकीकडे लम्पी आजाराने थैमान घातल्याने गोधन वाचविण्यासाठी शेतकर्‍यांना पराकाष्ठा करावी लागली. वाढत्या आजाराने शेतकर्‍यांना जनावरांवर मोठ्या प्रमाणात औषधोपचाराचा खर्च करावा लागला. त्यामुळे दुग्धधंद्यातही अवकळा आली. दूधउत्पादन घटलेले असताना दुसरीकडे शेतमालाचीही दैना झाली आहे. शेतकर्‍यांनी ‘जगावे की मरावे’ अशी अवस्था झालेली असताना सर्व भिस्त शासकीय मदतीवर अवलंबून आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतील, अशी अपेक्षा लागलेली आहे. दिवाळी सणाला शासनाची मदत न झाल्यास शेतकर्‍यांच्या दिवाळी सणावर काळोख पसरणार आहे.

ओला दुष्काळ जाहीर कराच : अतुल तनपुरे
रासायनिक खतांच्या दरात भरमसाठ वाढ झाली. केंद्र व राज्य शासनाने शेतकरी विरोधी धोरण पत्कारले. शेतीचे जोडधंद्यातही नुकसान झाले. शेतकरी पूर्वीच कोरोनाने त्रस्त असताना दूध धंद्यालाही लम्पी आजाराने नुकसानीत लोटले. सोयाबीन आयात केल्यानंतर शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच आली. कापूस पिकालाही अपेक्षित दर मिळत नसताना अतिवृष्टीच्या तडाख्याने शेतकर्‍यांचे पिके होत्याचे नव्हते केले आहे. शेतकर्‍याला जगविण्यासाठी तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून निधी द्यावा, अशी मागणी मराठा महासंघाचे तालुका प्रमुख अतुल तनपुरे यांनी केली.

The post 48 हजार शेतकर्‍यांना पावसाचा तडाखा ; शेतकर्‍यांचे 90 कोटी गेले पाण्यात appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/ljePaZD
via IFTTT